पुणे : राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेविका मोहिनी देवकर यांनी भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत मुळीक लॉन्स येथे झालेल्या भाजपा पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात हा प्रवेश झाला. पालिकेच्या मावळत्या सभागृहात देवकर प्रभाग क्रमांक ७४ मधून (धनकवडी, बालाजीगर) निवडून आल्या होत्या. दरम्यान, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसमधून आणखी काही नगरसेवक भाजपात प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा राजकीय वर्तुळात आहे. मनसेच्या एका नगरसेवकाचा प्रवेश भाजपाच्या विद्यमान पदाधिकाऱ्यांचा विरोध असल्यामुळे थांबून राहिला आहे. उपनगरात राष्ट्रवादीच्या नगरसेवकांच्या गराड्यातही मागील निवडणुकीत काँग्रेसचा झेंडा टिकवून ठेवलेल्या एका नगरसेवकाचा प्रवेशही चर्चेत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या देवकर यांच्याशिवाय आणखी एक-दोन नगरसेवक भाजपाचे दार ठोठावत असल्याचे बोलले जात आहे.
भाजपाकडची आवक सुरूच
By admin | Published: January 24, 2017 2:51 AM