शहरं
Join us  
Trending Stories
1
आता महाराष्ट्राला महिला मुख्यमंत्री मिळालेली पाहण्याची माझी इच्छा; शरद पवारांचे पुण्यात मोठे वक्तव्य
2
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
3
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
4
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
5
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
6
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
7
हाय हाय मिर्ची, उफ़ उफ़ मिर्ची... चहल वहिनींचा वेगळाच तोरा, पाहा धनश्रीचे 'सुपरहॉट' Photos
8
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
9
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
10
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
11
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
12
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
13
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
14
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
15
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
16
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
17
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
18
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
19
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
20
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई

युतीसाठी उत्सुक भाजपाने सेनेच्या लोकसभा क्षेत्रांत तयारी केली सुरू

By यदू जोशी | Published: December 23, 2018 7:14 AM

शिवसेनेशी आमची युती होईलच, असे भाजपाचे नेते विश्वासाने सांगत असले तरी शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने उमेदवार शोधण्यापासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे.

ठळक मुद्देशिवसेनेशी आमची युती होईलच, असे भाजपाचे नेते विश्वासाने सांगत असले तरी शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने उमेदवार शोधण्यापासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपा-सेनेमध्ये २०१४ साली युती होती. त्या वेळी शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सर्वच लोकसभा मतदारसंघांत भाजपाने स्वबळावर लढण्याची चाचपणी करून, यंत्रणाही कामाला लावली आहे.

- यदु जोशीमुंबई : शिवसेनेशी आमची युती होईलच, असे भाजपाचे नेते विश्वासाने सांगत असले तरी शिवसेनेचे खासदार असलेल्या मतदारसंघांमध्ये भाजपाने उमेदवार शोधण्यापासून निवडणुकीची जोरदार तयारी सुरू केली आहे. भाजपा-सेनेमध्ये २०१४ साली युती होती. त्या वेळी शिवसेनेच्या वाट्याला आलेल्या सर्वच लोकसभा मतदारसंघांत भाजपाने स्वबळावर लढण्याची चाचपणी करून, यंत्रणाही कामाला लावली आहे.मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी चार दिवसांपूर्वी घेतलेल्या बैठकीत आमदारांना सर्वच लोकसभा मतदारसंघांत करावयाच्या कार्यक्रमांची यादी आमदारांना दिली. त्यात शिवसेनेकडील मतदारसंघांचाही समावेश आहे. अमरावतीमध्ये शिवसेनेचे आनंदराव अडसूळ खासदार आहेत. पण पिंपरी-चिंचवडमधील भाजपाच्या नगरसेविका सीमा सावळे सध्या अमरावतीत कार्यक्रम घेत आहेत. हा मतदारसंघ अनुसूचित जातींसाठी राखीव आहे. सावळे यांचे माहेर बडनेराचे आहे. त्यामुळेच त्यांनी जोरदार मोर्चेबांधणी चालविली आहे.युती न झाल्यास रामटेकमधून शिवसेना खासदार कृपाल तुमाने यांना भाजपात आणून उमेदवारी देण्याच्या हालचाली सुरू आहेत. यवतमाळ-वाशिम लोकसभा मतदारसंघात बंजारा मतांवर डोळा ठेवून आ. नीलय नाईक किंवा पी. बी. आडे असे दोन पर्याय भाजपाने तयार ठेवले आहेत. विरोधी पक्षाने बंजारा समाजातील उमेदवारी दिल्यास भाजपाने मराठा नाव पुढे करण्याचे ठरवले आहे. काँग्रेस-राष्ट्रवादीतील मराठा-कुणबी समाजातील दोन बडी नावेही भाजपाने हेरून ठेवली असल्याचे समजते. उस्मानाबादेत शिवसेनेचे रवींद्र जाधव खासदार आहेत. तेथे शिवसेनेतून भाजपात गेलेले सुधीर पाटील तसेच परभणीचे सेना आ. राहुल पाटील यांचे बंधू प्रतापसिंह पाटील, आ. सुजितसिंह ठाकूर अशी नावे भाजपाने तयार ठेवल्याचे समजते. औरंगाबादमध्ये शिवसेनेचे चंद्रकांत खैरे सातत्याने जिंकत आले आहेत. युती न झाल्यास आ. अतुल सावे, माजी महापौर भागवत कराड, राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया रहाटकर हे पर्याय भाजपाने तयार ठेवले आहेत. उदयनराजेंच्या भूमिकेकडे लक्षकोल्हापूर, हातकणंगले व सातारा या तिन्ही जागी गेल्या वेळी सेनेचे उमेदवार होते. सातारामध्ये उदयनराजे भोसले राष्ट्रवादीबाबत काय भूमिका घेतात, याकडे भाजपाचे लक्ष आहे. नाशिकमध्ये शिवसेनेचे हेमंत गोडसे खासदार आहेत, पण तेथे भाजपाकडून माजी आमदार माणिकराव कोकाटे तयारीला लागले आहेत. पक्षाने अप्रत्यक्षपणे त्यांना बळ दिले आहे.शिवसेनेचे संजय (बंडू) जाधव खासदार असलेल्या परभणीतून मंत्री बबनराव लोणीकर आपला मुलगा राहुल यांना दिल्लीत पाठविण्यास उत्सुक असल्याचे कळते. काँग्रेसमधून भाजपात आलेले माजी आ. रामप्रसाद बोर्डीकरही मुलगी मेघना हिला लोकसभेत पाठवू इच्छितात. भाजपाचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांचे त्यांना पाठबळ असल्याचे म्हटले जाते.

टॅग्स :BJPभाजपाShiv Senaशिवसेना