मुंबई : भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी आज प्रदेश कार्यकारिणीची घोषणा केली. १५ उपाध्यक्ष, पाच सरचिटणीसांचा समावेश आहे. मंत्रिपदासाठी इच्छुक असलेल्या अनेकांना पक्षसंघटनेत सामावून घेऊन त्यांना परस्पर संकेत देण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. नूतन कार्यकारिणी अशी, प्रदेशाध्यक्ष - रावसाहेब दानवे, उपाध्यक्ष - आ. चैनसुख संचेती, मंगल प्रभात लोढा, आ. सुभाष देशमुख, आ. सुधाकर देशमुख, माजी खासदार भास्करराव खतगावकर, खा. नाना पटोले, खा. अमर साबळे, आ. डॉ. सुनील देशमुख, नीता केळकर, बाळासाहेब गावडे, गोविंदराव केंद्रे, डॉ. भागवत कराड, वसंत गिते, सुनील बागूल, वीरेंद्र बक्षी.सरचिटणीस - सुजितसिंह ठाकूर, अतुल भातखळकर, आ. संभाजी पाटील निलंगेकर, रामदास आंबटकर, सरचिटणीस (संघटन) - रवींद्र भुसारी. चिटणीस - विनय नातू, डॉ. नरेंद्र पवार, अतुल भोसले, आ. अनिल सोले, माया इवनाते, आ. स्मिता वाघ, राजन तेली, अर्चना वाणी, संजय उपाध्याय, उमा खापरे, प्रवीण दरेकर, लक्ष्मण सावजी, आ. किसन कथोरे, मनोज पांगारकर, अविनाश घाटे, धीरज घाटे, मुंबई प्रभारी - प्रतापभाई आशर, कार्यालय मंत्री - मुकुंद कुलकर्णी, सहकार्यालय मंत्री - शरद चव्हाण, भरत राऊत. महिला मोर्चा - अॅड, माधवी नाईक, भाजपा युवा मोर्चा - आ. योगेश टिळेकर अनुसूचित जाती मोर्चा - सुभाष पारधी, आदिवासी मोर्चा - हरिश्चंद्र भोये, अल्पसंख्याक मोर्चा - जमाल सिद्दिकी, किसान मोर्चा - ज्ञानोबा मुंडे. (विशेष प्रतिनिधी)
भाजपाची प्रदेश कार्यकारिणी जाहीर
By admin | Published: March 31, 2016 12:42 AM