'कुटुंबप्रमुखाला जनतेचा आवाजच ऐकू येत नाही', बलात्काराच्या वाढत्या घटनांवरुन चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 05:34 PM2021-09-24T17:34:12+5:302021-09-24T17:37:47+5:30

Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray: 'ही वेळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्याची आहे.'

BJP state president Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray over crime against women in state | 'कुटुंबप्रमुखाला जनतेचा आवाजच ऐकू येत नाही', बलात्काराच्या वाढत्या घटनांवरुन चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

'कुटुंबप्रमुखाला जनतेचा आवाजच ऐकू येत नाही', बलात्काराच्या वाढत्या घटनांवरुन चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

Next

मुंबई: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आधी मुंबईतील साकीनाका आणि नंतर डोंबिवलीमध्ये सामुहिक बलात्काराच्या घटना घडल्या. त्यानंतर आता कल्याणमध्ये एका 8 वर्षाच्या मुलीवर आणि महाबळेश्वरमध्येही एका मुलीवर आत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

शास्त्रज्ञ पहिल्यांदाच उतरले लाखो वर्षे जुन्या 'नरकाच्या खड्ड्यात', आढळल्या 'या' विचित्र गोष्टी

मुंबईतील साकीनाका आणि नंतर डोंबिवलीमध्ये सामुहिक बलात्काराच्या घटना घडल्या. या घटनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. पण, त्यानंतरही कल्याण आणि महाबळेश्वरमध्ये अशाच घटना घडत आहेत. यावरुन चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय.

ट्विटरवर चंद्रकांक पाटील म्हणाले, 'कल्याणमध्ये अवघ्या 8 वर्षांच्या मुलीवर तर महाबळेश्वरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे.'

'आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षांपासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही', असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

तसंच 'आज महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर अशाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अशावेळी या सरकारकडून, विशेषतः गृहमंत्र्यांकडून ठोस पाऊले उचलण्यासाठी दाखवला जाणारा हा निष्काळजीपणा म्हणजे गुन्हेगारांना दिलेले प्रोत्साहन समजावे का?', असा प्रश्नही पाटलांनी केला.

शिष्याने आणून दिली नायलॉनची दोरी, त्याच दोरीने महंत नरेंद्र गिरी यांनी घेतला गळफास


बलात्कारांच्या घटनांमुळे राज्यात खळबळ
डोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर गेल्या आठ महिन्यांपासून 33 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या बॉयफ्रेंडने अतिप्रसंग करुन घटनेचा व्हिडिओ केला आणि ब्लॅकमेल करुन इतर नराधकांनी आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली. यानंतर, कल्याणमध्येही एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकानं अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनांनी राज्यात खळबळ माजली आहे.

Web Title: BJP state president Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray over crime against women in state

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.