शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : अमित शाहांच्या विधानावरुन नवा वाद,संभाजीराजे छत्रपतींनी घेतला आक्षेप; नेमकं प्रकरण काय?
2
उद्धव ठाकरेंची मशाल घराघरांत-समाजासमाजात आग लावणारी; CM एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल
3
"कॉम्प्रोमाईज करणारा पुढे यशस्वी होतो"; मुख्यमंत्रीपदाबाबत बोलताना अजितदादा म्हणाले, "आमचं टार्गेट..."
4
आवडत्या जागी फिल्डिंग न दिल्याने रुसून बसला; मग 'मुंबई इंडियन्स'च्या माजी खेळाडूला संघाने 'बसवला'
5
चंद्रचूड यांचा लास्ट वर्किंग डे संपला! सर्वांना वाकून नमस्कार करत म्हणाले, दुखावला असाल तर माफ करा...
6
सीएम सुक्खूंना मागविलेले समोसे सुरक्षा रक्षकांना वाटले गेले; CID चौकशी लावली, रिपोर्ट आला...
7
"प्रत्येक गड-किल्ल्यावर मशीद असायला हवी..."; काँग्रेस खासदाराची राज ठाकरेंवर टीका
8
शिवरायांचा भगवा झेंडा दरोडेखोरांच्या हातात शोभून दिसत नाही; उद्धव ठाकरे कडाडले
9
मनीषा कोईरालाने 'हीरामंडी 2' बद्दल दिलं अपडेट, दुय्यम भूमिका करण्याविषयी म्हणाली...
10
रामटेकच्या गडावरून कडेलोट कुणाचा? चौकसे, किरपान, मुळक यांनी वाढविले टेन्शन!
11
"तुमचा शत्रू जमिनीच्या मार्गाने येतोय"; राज ठाकरेंनी कुणाला दिला इशारा?
12
महायुतीचा मुख्यमंत्री कोण?, अमित शाहांनी दिले संकेत; एका विधानानं चर्चांना उधाण
13
Maharashtra Election 2024: "माफी मागा, अन्यथा...", डी के शिवकुमार यांचा महायुतीच्या नेत्यांना इशारा
14
बहिणीच्या लग्नात अनन्या पांडेने का घातला आईचा २१ वर्ष जुना ड्रेस? समोर आलं कारण
15
पृथ्वी शॉचा 'संघर्ष' कायम! मुंबईनेही दाखवला बाहेरचा रस्ता; ऑस्ट्रेलियन दिग्गजाने पत्राद्वारे दिला धीर
16
'महायुतीचे सरकार बनवायचे, देवेंद्र भाऊंना विजयी करायचे'; अमित शाहांनी पहिलीच सभा गाजवली, विरोधकांवर तोफ डागली
17
नजरेत क्रूरता, आवाजात निष्ठूरता.., 'संगीत मानापमान'मधील उपेंद्र लिमयेचं मोशन पोस्टर रिलीज
18
बाबो! 'पुष्पा २' साठी अल्लू अर्जुनने घेतले ३०० कोटी, रश्मिका अन् फहाद फाजिलला मिळाले फक्त...
19
"जातीजातीत समाज विखुरला जावा; SC, ST, OBC समाज एकजूट राहू नये हा काँग्रेसचा डाव"; मोदींचा हल्लाबोल
20
G-NCAP मध्येही खळबळ उडाली! मारुतीच्या नवी डिझायरला ५ स्टार सेफ्टी रेटिंग; टाटाला मोठा धक्का

'कुटुंबप्रमुखाला जनतेचा आवाजच ऐकू येत नाही', बलात्काराच्या वाढत्या घटनांवरुन चंद्रकांत पाटलांचे टीकास्त्र

By ऑनलाइन लोकमत | Published: September 24, 2021 5:34 PM

Chandrakant Patil criticizes CM Uddhav Thackeray: 'ही वेळ मुख्यमंत्री आणि गृहमंत्र्यांनी गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्याची आहे.'

मुंबई: गेल्या काही दिवसांत महाराष्ट्रात अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झालेली पाहायला मिळत आहे. आधी मुंबईतील साकीनाका आणि नंतर डोंबिवलीमध्ये सामुहिक बलात्काराच्या घटना घडल्या. त्यानंतर आता कल्याणमध्ये एका 8 वर्षाच्या मुलीवर आणि महाबळेश्वरमध्येही एका मुलीवर आत्याचार झाल्याची घटना समोर आली आहे. यावरुन आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे.

शास्त्रज्ञ पहिल्यांदाच उतरले लाखो वर्षे जुन्या 'नरकाच्या खड्ड्यात', आढळल्या 'या' विचित्र गोष्टी

मुंबईतील साकीनाका आणि नंतर डोंबिवलीमध्ये सामुहिक बलात्काराच्या घटना घडल्या. या घटनानंतर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी प्रकरणाचा तपास फास्ट ट्रॅक कोर्टात चालवण्याचे आदेश दिले आहेत. पण, त्यानंतरही कल्याण आणि महाबळेश्वरमध्ये अशाच घटना घडत आहेत. यावरुन चंद्रकांत पाटलांनी सरकारवर निशाणा साधलाय.

ट्विटरवर चंद्रकांक पाटील म्हणाले, 'कल्याणमध्ये अवघ्या 8 वर्षांच्या मुलीवर तर महाबळेश्वरमध्ये एका अल्पवयीन मुलीवर अत्याचार झाल्याचे उघडकीस आले आहे. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांना माझे एकच सांगणे आहे. ही वेळ गायब होण्याची नव्हे, तर अत्याचाराचे हे दुष्टचक्र थांबवण्यासाठी ठोस पाऊले उचलण्याची आहे.'

'आपल्या माता-भगिनींवर ही वेळ ओढवलेली असताना कुठला कुटुंबप्रमुख इतर राज्यांमधली परिस्थिती दाखवेल ? हा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे. स्वतःला महाराष्ट्राचे कुटुंबप्रमुख म्हणवणाऱ्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना गेल्या दीड वर्षांपासून दुर्दैवाने जनतेचा आवाजच ऐकू येत नाही', असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला.

तसंच 'आज महाराष्ट्रात सत्तेत बसलेल्या महाविकास आघाडी सरकारमधील काही नेत्यांवर अशाच प्रकरणांमध्ये गुन्हे दाखल आहेत. अशावेळी या सरकारकडून, विशेषतः गृहमंत्र्यांकडून ठोस पाऊले उचलण्यासाठी दाखवला जाणारा हा निष्काळजीपणा म्हणजे गुन्हेगारांना दिलेले प्रोत्साहन समजावे का?', असा प्रश्नही पाटलांनी केला.

शिष्याने आणून दिली नायलॉनची दोरी, त्याच दोरीने महंत नरेंद्र गिरी यांनी घेतला गळफास

बलात्कारांच्या घटनांमुळे राज्यात खळबळडोंबिवलीत एका अल्पवयीन मुलीवर गेल्या आठ महिन्यांपासून 33 नराधमांनी सामूहिक बलात्कार केल्याची घटना घडली आहे. पीडितेच्या बॉयफ्रेंडने अतिप्रसंग करुन घटनेचा व्हिडिओ केला आणि ब्लॅकमेल करुन इतर नराधकांनी आळीपाळीने पीडितेवर बलात्कार केल्याची माहिती समोर आली. यानंतर, कल्याणमध्येही एका शिकवणी चालविणाऱ्या शिक्षकानं अवघ्या 8 वर्षाच्या चिमुकलीवर लैंगिक अत्याचार केल्याची धक्कादायक घटना घडली. या घटनांनी राज्यात खळबळ माजली आहे.

टॅग्स :chandrakant patilचंद्रकांत पाटीलUddhav Thackerayउद्धव ठाकरेBJPभाजपाShiv SenaशिवसेनाNCPराष्ट्रवादी काँग्रेसcongressकाँग्रेसMumbaiमुंबई