ऑनलाइन लोकमत
जालना, दि. २४ - भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष, खासदार रावसाहेब दानवे यांना जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. एका ई-मेलद्वारे दानवे यांना ही धमकी देण्यात आली आहे. ' दानवे यांनी प्रदेशाध्यक्षपद आणि खासदारकीचा राजीनामा दिला नाही तर त्यांना गोळ्या घालून जीवे मारु” अशी धमकी त्या ई-मेलमध्ये देण्यात आली आहे.
याप्रकरणी दानवेंचे स्वीय सहाय्यक राजेश जोशी यांनी विलास देशमुख या व्यक्तीविरोधात कदीम जालना पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली असून पोलिसांनी तपास सुरु केला आहे.