Vidhan Sabha 2019: विदर्भात शिवसेनेच्या बाणाला भाजपची ताण, विरोधी आघाडीत पुन्हा मानापमान, वंचितला हवाय सन्मान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2019 03:18 AM2019-09-22T03:18:42+5:302019-09-22T03:19:32+5:30

विदर्भात रंगणार थेट सामना; ७५ टक्क्यांवर जागा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती

BJP stresses Shiv Sena's arrow in Vidarbha, re-honors in opposition front | Vidhan Sabha 2019: विदर्भात शिवसेनेच्या बाणाला भाजपची ताण, विरोधी आघाडीत पुन्हा मानापमान, वंचितला हवाय सन्मान

Vidhan Sabha 2019: विदर्भात शिवसेनेच्या बाणाला भाजपची ताण, विरोधी आघाडीत पुन्हा मानापमान, वंचितला हवाय सन्मान

googlenewsNext

- दिलीप तिखिले

नागपूर : विदर्भात गेल्या विधानसभा निवडणुकीत ६२ पैकी ४४ म्हणजेच ७० टक्क्यांहून अधिक जागा जिंकणाऱ्या भाजपने यावेळी ७५ टक्क्यांहून अधिक जागा जिंकण्यासाठी रणनिती आखली आहे. शिवसेनेची युती होण्याची चिन्हे असली तरी विदर्भात शिवसेनेचा बाण किती ताणायचा हेदेखील भाजपच्याच हाती असल्याचे चित्र आहे.

दुसरीकडे आघाडीत जागावाटप ठरविताना काँग्रेस-राष्ट्रवादीमध्ये गटबाजी व पक्षांतर्गतच मानापमान नाट्य सुरू झाले आहेत. लोकसभेत सपशेल अपयशी ठरलेली वंचित बहुजन आघाडी यावेळी सन्मानजनक निकाल देण्यासाठी कामाला लागली आहे. लोकसभा निवडणुकीत १० पैकी फक्त चंद्रपूरची जागा काँग्रेसला जिंकता आली. ९० टक्के मतदारसंघात भाजप- सेनेने आघाडी घेतली होती. शिवाय देवेंद्र फडणवीस व केंद्रीय मंत्री नितीन गडकरी हे मंत्र्यांची फौज घेऊन ताकदीने मैदानात उतरले असल्यामुळे काँग्रेस- राष्ट्रवादीचा आपल्या यात्रा पूर्ण करायलाही कस लागत आहे. एकमेव आमदार असलेली राष्ट्रवादीची अस्तित्वासाठी तर दोन अंकी आकडा गाठून मातोश्रीवर ताठ मानेने जाण्यासाठी शिवसेनेच्या नेत्यांची धडपड सुरू आहे. काँग्रेस-राष्टÑवादीकडे विदर्भात सक्षम नेतृत्वच नाही. माणिकराव ठाकरे, शिवाजीराव मोघे त्यांच्या मतदारसंघात अडकून पडले आहेत, तर माजी केंद्रीय मंत्री प्रफुल्ल पटेल सध्या कुठेच दिसत नाहीत. त्यामुळे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार आणि नाना पटोले हे काँग्रेसला जीवदान मिळवून देतात का, याकडे सर्वांचे लक्ष लागून आहे.

प्रचारात मुद्दे काय?
बेरोजगारी, महागाई व कर्जमाफी हे कळीचे मुद्दे विरोधक लावून धरतील. काँग्रेस व राष्ट्रवादीच्या यात्रेतही यावरच अधिक भर देण्यात आला आहे.
भाजप विकास कामांवर ही निवडणूक लढण्याची शक्यता आहे. समृद्धी महामार्ग, रस्ते, यासह विविध प्रकल्प मार्गी लागले. कोट्यवधीचा निधी विदर्भाचा खेचून आणला याचे भांडवल भाजप करेल.
देशात व राज्यातील सक्षम नेतृत्वाच्या बळावर भाजप निवडणुकीला सामोरे जाणार आहे. दुसरीकडे काँग्रेस- राष्ट्रवादीत पडझड सुरू आहे. सक्षम नेतृत्वाचा अभाव दिसत आहे. याचा मतदारांवर काही प्रमाणात परिणाम होऊ शकतो. विदर्भाचा असमतोल विकास हा मुद्दा विरोधक प्रचारात आणू शकतात.
 

विदर्भातील सध्याचे बलाबल
एकूण जागा- ६२
भाजप-४४
शिवसेना-४
काँग्रेस-१०
राष्ट्रवादी-१
इतर-३

Web Title: BJP stresses Shiv Sena's arrow in Vidarbha, re-honors in opposition front

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.