मुंबई: प्रसिद्ध गीतकार, लेखक, कवी जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघ (RSS), विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल यांच्या संदर्भात केलेल्या विधानावरून नवीन वादाला तोंड फुटले आहे. जावेद अख्तर यांनी केलेल्या वक्तव्यानंतर त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. भाजप कार्यकर्त्यांनी त्यांच्या घरासमोर आंदोलन करत माफी मागावी, अशी मागणी केली आहे. जावेद अख्तर यांच्या घराबाहेरील पोलीस बंदोबस्तही वाढवण्यात आला आहे. यातच पुन्हा एकदा भाजपने जावेद अख्तर यांच्यावर टीकास्त्र सोडले असून, देशाच्या संदर्भात जावेद अख्तर यांची भूमिका नेहमीच संशयास्पद राहिलेली आहे, असा मोठा आरोप यावेळी करण्यात आला आहे. (bjp sudhir mungantiwar criticizes javed akhtar about rss and vhp statement)
जे वक्तव्य जावेद अख्तर यांनी भारतात केले ते वक्तव्य त्यांनी तालिबानमध्ये केले असते, तर त्यांना तालिबाननं चौकात फटके मारले असते, असे भाजप नेते सुधीर मुनगंटीवार यांनी म्हटले आहे. भाजपाच्या काही नेत्यांनी जावेद अख्तर यांना माफी मागण्याबाबत थेट अल्टिमेटही दिलेला आहे.
“जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तानात जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावं”; भाजपचा पलटवार
देशाच्या संदर्भात त्यांची भूमिका नेहमीच संशयास्पद
मला असे वाटत हा एक अयशस्वी प्रयत्न आहे. नेहमीच देशाच्या संदर्भात त्यांची भूमिका ही संशयास्पद राहिलेली आहे. हेच वाक्य तालिबानमध्ये जाऊन, त्यांनी अशा पद्धतीचं एखादं वाक्य वापरलं असतं तर चौकात त्यांना तालिबानी लोकांनी फटके मारले असते. या ठिकाणी जर या संस्था आणि संघटना या तालिबान्यांसारख्या वागल्या असत्या, तर जसे अफगाणिस्तानच्या एखाद्या चौकात उभा राहून तालिबान्यांना शिव्या दिल्यानंतर, काय हाल होता हे तुम्ही पाहिले असेल. तसे हाल इथे झाले नसते का, असा सवाल करत, पण इथे त्यांच्या या वक्तव्याची काही लोकांनी, मीडियामध्ये मोठ्या प्रमाणावर नोंद घेतली. याचा अर्थ इथे देशात ज्यांची सत्ता आहे, ते रामराज्य आणण्याची कल्पना करणारे लोक आहेत. त्यांच्या मनात बजरंग किंवा राम भक्ताबद्दलची जी काही असुया आहे, ती अप्रत्यक्ष व्यक्त झाली. अशी कोणतीही घटना देशात झाली नाही. त्यांच्या घरावर कुणी लोक गेले नाहीत किंवा केंद्राने पोलीस पाठवले नाहीत. त्यांना अटक करत कायद्याचा गैरवापर केला नाही, असे सुधीर मुनगंटीवार म्हणाले. ते एबीपी माझाशी बोलत होते.
“अनिल देशमुख गायब का आहेत? राष्ट्रवादी काँग्रेसने खुलासा करावा”; भाजपची मागणी
जावेद अख्तर यांनी तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे
प्रख्यात गीतकार आणि पटकथा लेखक जावेद अख्तर यांनी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबद्दल केलेले विधान निषेधार्थ आहे. जावेद अख्तर यांनी अफगाणिस्तान येथे जाऊन तालिबानी अतिरेक्यांसोबत राहावे. म्हणजे त्यांना या अतिरेकी संघटनेबद्दल वस्तुस्थिती लक्षात येईल. राष्ट्रीय स्वंयसेवक संघ ही संघटना देशप्रेमाची, सेवाभावाचे संस्कार रुजविणारे विद्यापीठ आहे. समाजातील शेवटच्या घटकाच्या, वंचितांच्या कल्याणासाठी काम करणारी ही संघटना आहे. जावेद अख्तर यांनी हे वादग्रस्त विधान मागे घावे, अशी मागणी भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली आहे.
ममता दीदींविरोधात निवडणूक लढवण्यासाठी BJP कडून ‘ही’ ६ नावे चर्चेत; काँग्रेसमध्ये दोन गट नेमकं काय म्हणाले जावेद अख्तर?
ज्या पद्धतीने तालिबानी हे मुस्लिम राष्ट्र निर्माण करण्यासाठी हिंसक प्रयत्न करत आहेत. त्याच पद्धतीने आपल्याकडे काहीजण हिंदू राष्ट्राची संकल्पना मांडतात. हे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबानी हिंसक आहेत. रानटी आहेत. पण RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दल या संघटनांचे समर्थन करणारे लोकही त्याच मानसिकतेचे आहेत. तालिबान आणि त्यांच्यासारखे वागण्याची इच्छा ठेवणाऱ्यांमध्ये एक साम्य आहे, असे जावेद अख्तर यांनी एनडीटीव्ही वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत म्हटले आहे.