शहरं
Join us  
Trending Stories
1
बारामतीच्या दोन मुलींना हडपसरमध्ये दारु पाजली, मित्राच्या खोलीत चौघांकडून सामुहिक बलात्कार
2
हे चार राज्यांच्या निवडणुका एकत्र घेऊ शकले नाहीत; वन नेशन, वन इलेक्शनवरून संजय राऊतांचा मोदींना टोला
3
Vidhan Sabha Election: मुंबईतील 'या' सहा मतदारसंघावरून महाविकास आघाडीत तिढा?
4
रक्ताच्या थारोळ्यात पडला होता भाजपा नेता; पोलिसाने लुटली सोन्याची चेन, ४ अंगठ्या, २ मोबाईल
5
Bajaj Housing Finance Ltd: लिस्टिंगच्या ३ दिवसांत १७०% चा नफा; आता 'हा' शेअर विकण्यासाठी रांगा; ₹१५६ वर आला भाव
6
महायुती अन् महाविकास आघाडीला टक्कर देण्यासाठी 'महाशक्ती'; विधानसभेत तिहेरी सामना?
7
पिता-पुत्रांचा षडाष्टक योग: ८ राशींना संमिश्र, अखंड सावध राहावे; सूर्य-शनीची वक्र दृष्टी!
8
रिकाम्या सीटवर बसण्याठी धावला अन् रेल्वेतून खाली पडला; सात वर्षाच्या मुलाचा मृत्यू
9
Sanjay Roy : "२ दिवसांनी संजय रॉयचे कपडे..."; CBI ने केला पोलिसांवर निष्काळजीपणाचा गंभीर आरोप
10
Who is Hasan Mahmud : कोण आहे हसन महमूद? ज्याच्यासमोर टीम इंडियाचे ३ शेर झाले ढेर
11
शेतकऱ्यांसाठी खुशखबर! पीएम किसान योजनेनंतर सरकार १००० कोटींचे 'हे' काम करणार!
12
Andheri Lokhandwala Fire: अंधेरीत लोखंडवाला येथे भीषण आग, दोन बंगले जळून खाक
13
लिस्ट होताच IPO प्राईजच्या खाली आला शेअर; विकण्यासाठी रांग, ₹८२ वर आला भाव, पहिल्याच दिवशी... 
14
PM मोदींच्या अपमानाची आठवण, भाजपानं सुनावलं; जे.पी नड्डांचं खरगेंना खरमरीत पत्र
15
दिव्या भारतीच्या निधनाच्या ३१ वर्षांनंतरही कोणतीच अभिनेत्री तोडू शकली नाही तिचा हा रेकॉर्ड
16
रेल्वे स्थानकांवरही सुरू होणार एक्झिक्युटिव्ह लाउंज, फक्त दोन रुपयांत मिळू शकते एंट्री!
17
7 तास झोप घेत नसाल तर तुम्ही डेंजर झोनमध्ये आहात! अकाली मृत्यू, हार्ट अटॅक, नैराश्य येण्याची भीती
18
भारताने पाकिस्तानला बजावली नोटीस; दहशतवाद, पर्यावरण बदलांमुळे सिंधू जलकराराचा फेरआढावा घ्या
19
Pitru Paksha 2024: पितृ पक्षात मिळणारे शुभ संकेत 'असे' ओळखा आणि भविष्याची आखणी करा!
20
Pitru Paksha 2024: पितृपक्षात दान केले नाही तर काय घडते? रामायणात दिले आहे स्पष्टीकरण!

Maharashtra Politics: बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देणार का? सुधीर मुनगंटीवार स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Published: February 09, 2023 4:03 PM

Maharashtra Politics: महात्मा गांधींची काँग्रेस विसर्जित होण्याच्या मार्गावर आहे, अशी टीका सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

Maharashtra Politics: काँग्रेसमध्ये गेल्या काही दिवसांपासून  अंतर्गत गटबाजी सुरू असल्याचे समोर आले आहे. विधान परिषदेच्या निवडणुकीपासून काँग्रेसमध्ये सत्यजित तांबे यांच्या उमेदवारीवरुन गोंधळ सुरू झाला. काँग्रेसचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब थोरात हे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यावर नाराज असून, पक्षाच्या विधीमंडळ पक्षनेते पदाचा राजीनामा दिला असल्याची जोरदार चर्चा आहे. यानंतर बाळासाहेब थोरात भाजपमध्ये जाणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याबाबत भाजप नेते आणि मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी थेट भाष्य केले आहे. 

भाजपच्या दिवंगत आमदार मुक्ता टिळक यांच्या निधनानंतर कसबा पेठ येथे पोटनिवडणूक होत आहे. भाजप नेते हेमंत रासने विरुद्ध काँग्रेसचे नेते रवींद्र धंगेकर यांच्यात प्रमुख लढाई होण्याची शक्यता आहे. हेमंत रासने यांच्या प्रचाराचा नारळ फुटला. भाजपने केसरीवाड्यातून प्रचारासाठी प्रचार यात्रा काढली. यावेळी सुधीर मुनगंटीवार, पुण्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील आदी उपस्थित होते. मीडियाशी बोलताना सुधीर मुनगंटीवार बाळासाहेब थोरात यांच्या नाराजीसंदर्भात प्रतिक्रिया दिली. 

बाळासाहेब थोरातांना भाजपमध्ये येण्याची ऑफर देणार का?

बाळासाहेब थोरात यांच्यासारख्या अनुभवी नेत्याला आता भाजप प्रवेशाची ऑफर मिळते का आणि मिळाली तर थोरात ती स्वीकारणार का, याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे. यावर बोलताना, काँग्रेसमधील वादाचा आम्ही फायदा घेणार नाहीत. बाळासाहेब थोरात यांना आम्ही आमच्या रस्त्यावर आणणार नाहीत. त्यांनी कुठे जायचेय, हा निर्णय त्यांनी स्वतःच घ्यायचा आहे. पण काँग्रेस आता अधःपतनाला लागली आहे. महात्मा गांधी यांची काँग्रेस विसर्जित होण्याच्या मार्गावर आहे, अशी घणाघाती टीका मुनगंटीवार यांनी केली. 

दरम्यान, उद्धव ठाकरे यांच्या पत्रकार परिषदा भावनेवर आधारीत असतात. मुंबई तोडणार, असा लोकांमध्ये फक्त भ्रम निर्माण केला जात आहे. पण प्रत्यक्षात मुंबई तोडण्याची हिंमत कुणाच्या बापामध्ये नाही. शिवसेना आणि उद्धव ठाकरे यांच्या हातातून सर्वकाही निसटलेय, त्यामुळे ते अशी निराशाजनक वक्तव्ये करतात, अशी प्रतिक्रिया सुधीर मुनगंटीवार यांनी दिली. 

सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"

टॅग्स :Sudhir Mungantiwarसुधीर मुनगंटीवारBalasaheb Thoratबाळासाहेब थोरात