मुंबई : राज्यातील शिक्षणाधिकारी कार्यालयांमार्फत शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना अतिरिक्त ठरविण्यात येत असल्याच्या विरोधात भाजपाप्रणित शिक्षक संघटना असलेल्या शिक्षक परिषदेचे कार्याध्यक्ष व शिक्षक आमदार नागो गाणार यांनी सरकारविरोधात दंड थोपटले आहेत. सत्ता असतानाही अतिरिक्त शिक्षकांचा प्रश्न सुटत नसल्याने गाणार यांनी हिवाळी अधिवेशनाच्या सुरुवातीपासून आमरण उपोषणाचा इशारा देत सरकारला घरचा आहेर दिला आहे.शिक्षणाधिकाऱ्यांनी संच निर्धारण नुकतेच केले आहे. या संच निर्धारणामुळे राज्यात हजारोंच्या संख्येने शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी अतिरिक्त ठरले आहेत. (प्रतिनिधी)
भाजपा शिक्षक आमदाराचा उपोषणाचा इशारा
By admin | Published: December 05, 2014 4:03 AM