गोपीचंद पडळकरविरुद्ध अजित पवार संघर्ष संपेना; राष्ट्रवादी नेत्याच्या आव्हानाला प्रतिआव्हान

By ऑनलाइन लोकमत | Published: September 22, 2023 02:47 PM2023-09-22T14:47:51+5:302023-09-22T14:50:27+5:30

Ajit Pawar Vs Gopichand Padalkar: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याने केलेल्या टीकेला प्रत्युत्तर देताना भाजपने प्रतिआव्हान दिल्याचे सांगितले जात आहे.

bjp vidya tamkhade and dhangar leader sharada padhare replied on ncp prashant pawar criticism on gopichand padalkar | गोपीचंद पडळकरविरुद्ध अजित पवार संघर्ष संपेना; राष्ट्रवादी नेत्याच्या आव्हानाला प्रतिआव्हान

गोपीचंद पडळकरविरुद्ध अजित पवार संघर्ष संपेना; राष्ट्रवादी नेत्याच्या आव्हानाला प्रतिआव्हान

googlenewsNext

Ajit Pawar Vs Gopichand Padalkar: भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांनी उपमुख्यमंत्री अजित पवारांवर केलेल्या टीकेवरून नवा संघर्ष पेटला आहे. राष्ट्रवादीतील अजित पवार समर्थकांनी पडळकर यांच्याविरोधात आक्रमक पवित्रा घेत पडळकरांना भरचौकात जोड्याने मारून काळे फासेल त्याला १ लाख रुपये देण्याची घोषणा केली आहे. यानंतर आता राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला भाजपच्या उत्तर रायगड जिल्हा चिटणीसांनी प्रतिआव्हान दिले आहे. 

अजित पवार गटातील नागपूर शहराध्यक्ष प्रशांत पवार म्हणाले की, जिथे पडळकर दिसेल तिथे भरचौकात त्यांना जोड्याने मारा, काळे फासा आणि नागपूरात येऊन १ लाख रुपये घेऊन जा असं आवाहन मी राष्ट्रवादीच्या नेत्यांना आणि कार्यकर्त्यांना करतोय. जोपर्यंत गोपीचंद पडळकर यांना त्यांची जागा दाखवणार नाही तोपर्यंत ते सुधारणार नाही. परंतु त्यांना पडळकरांना अखेरचे सांगायला हवे जर यानंतर ते बडबडले तर पक्षातून काढायला हवे. नागपूरमध्ये गोपीचंद पडळकर आले तर त्यांना सोडणार नाही. नागपूरला येऊ नका, नागपूरला आल्यावर मार खाल्ल्याशिवाय राहणार नाही, अशा शब्दांत प्रशांत पवार यांनी बोचरी टीका केली. यावर भाजप उत्तर रायगड जिल्हा चिटणीस विद्या तामखेडे यांनी प्रतिआव्हान दिले आहे. 

गोपीचंद पडळकर हे महाराष्ट्राचा बुलंद आवाज असून, एक चारित्र्यसंपन्न नेतृत्व आहे. खंडणी बहाद्दर, टेंडर बहाद्दर अशा लोकांनी पडळकरांवर बोलू नये. प्रशांत पवार खंडणी बहाद्दर राष्ट्रवादीचा नेता आहे. त्यांच्यावर बायकोला मारल्याचा खटला सुरू आहे, असा दावा करत, प्रशांत पवारला चपलेने मारणाऱ्याला गोपीचंद पडळकर यांच्यासोबत सेल्फी काढण्याची संधी दिली जाईल, असे प्रतिआव्हान विद्या तामखडे यांनी दिले. 

दरम्यान, मल्हार नवयुवक सेनेच्या पदाधिकारी आणि धनगर नेत्या शारदाताई पाढरे यांनीही गोपीचंद पडळकर यांच्याबाबत बोलणाऱ्या राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्याला सुनावले. मी मेंढपाळ पाड्यावर जाते, मेंढपाळांना भेटते, तेव्हा तेथे विचारले जाते की, गोपीचंद पडळकर आमच्या वाड्यावर कधी येतील, त्या सर्वांसाठी आनंदाची बातमी आहे की, राष्ट्रवादी काँग्रेसचा शहराध्यक्ष प्रशांत पवार याला जो मेंढपाल चपलांच्या जोड्याने मारेल, त्याच्या वाड्यावर साहेब फक्त भेट द्यायला नाहीतर जेवायला येतील, आता सर्वप्रथम कोणाचा नंबर लागतोय, ते पाहू, या शब्दांत शारदाताईंनी पडळकरांवर झालेल्या टीकेवर प्रतिक्रिया दिली.


 

Web Title: bjp vidya tamkhade and dhangar leader sharada padhare replied on ncp prashant pawar criticism on gopichand padalkar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.