ऑनलाइन लोकमतपणजी, दि. ११ : आम्ही संघ सोडलेला नसून आपद्काल परिस्थितीमुळे सामाजिक कामाच्याआड येणारी यंत्रणे ठोकरली आहेत. मातृभाषेचा घात करणाऱ्या भाजप सरकारला निवडणुकीत धडा शिकवूनच मूळ संघात परत जाणार असे गोवा प्रदेश संघचालक सुभाष वेलिंगकर यांनी स्पष्ट केले. कुजिरा - बांबोळी येथे पार पाडलेल्या प्रदेश संघाच्या पहिल्याच मेळाव्यात २ हजार कार्यकर्त्यांनी उपस्थिती लावली होती.
संघाचे काम स्वयंसेवक स्वयंप्रेरणेने करतात. त्यामुळे संघात जुना संघ आणि नवीन संघ असे काहीच नाही. विशिष्ठ परिस्थितीत जे निर्णय घ्यावे लागतात आणि तेच नेमके स्वयंसेवकांनी केलेले अहे. शिक्षणाचे माध्यम हे मातृभाषेतून असावे हे तत्व संघाच्या धोरणाला अनुसरून आहे आणि त्याच धोरणाचे अनुकरण स्वयंसेवक करीत आहेत. त्यासाठी संघातील प्रचलीत यंत्रणे जर अडसर ठरत असतील काही काळासाठी ही यंत्रणे झुगारूनही स्वयंसेवक काम करतात. त्यासाठी सशर्त पाठिंबा हे कोंकण प्रांताचे धोरण हास्यास्पद आहे. मातृभाषा रक्षणासाठी सशर्त पाठिंबा नव्हे तर बिनशर्त व सक्रीय पाठिंबा द्यावा लागतो. आंदोलनाच्या अनुशंगाने संघाची कॉंग्रेस सरकारच्यावेळी एक भुमिका आणि भाजप सरकारच्यावेळी दुसरी भुमिका असू शकत नाही. संघ हा सामाजिक संवेदनांपासून वेगळा नाही. मातृभाषेचा घात करणाऱ्या भाजपचा पाडाव करण्यासाठी कार्यकत्यांना काम करण्याचे आवाहन त्यांनी केले. या मेळाव्यात वेलिंगकर यांच्या बरोबर रामदास सराफ, राजु सुकेरकर, प्रवीण नेसवणकर व इतर नेत्यांचा समावेश होतानाना बेहरेची मुलगीही मेळाव्यातकोंकण प्रांताने गोवा विभागाचे संघचालक म्हणून नियुक्त केलेले नाना बेहरे यांची मुलगी व जावई या दोघांनीही कुजिरा येथील प्रदेश संघ मेळाव्यात सहभाग घेतला होता. वेलिंगकर यांना भेटून त्यांनी नमस्कारही केला. भाषा मंचाच्या आंदोलनास संघाचा पाठिंबा असल्याचे बेहरे यांनी सूत्रे हाती घेतल्यानंतर म्हटले होते. अल्पसंख्याक आयोगाला विरोधसमान नागरी कायदा नांदत असलेल्या गोव्यात मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील सरकारने अल्पसंख्याक आयोग आणण्याच्या प्रयत्नांनाही गोवा प्रदेश संघ विरोध करीत असल्याचे वेलिंगकर यांनी सांगितले. प्रतापसिंग राणे मुख्यमंत्री असताना त्यांनी गोव्यात सर्व लोकांना समान अधिकार असल्यामुळे अल्पसंख्याक आयोगाची गरज नाही असे तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांना सांगितले होते त्याची आठवणही वेलिंगकर यांनी करून दिली. तसेच दुहेरी नागरिकत्व, आणि फॉन्ताइनेस फॅस्ताच्या उधात्तीकरणालाही संघाचा विरोध असल्याचे त्यांनी सांगितले.