शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-चीन सीमेवर दाेन्ही सैन्य माघारीस सुरुवात; २८-२९ ऑक्टाेबरपर्यंत प्रक्रिया हाेणार पूर्ण!
2
आजचे राशीभविष्य: ३ राशींना अनुकूल, आर्थिक लाभ संभवतात; सुखाचा, शांततेचा दिवस
3
घोळ संपेना! मविआचा नवा फॉर्म्युला, तिघांना प्रत्येकी ९० जागा; १८ जागा मित्र पक्षांना
4
मस्का की मस्करी? जगाला ऊठसूट लोकशाही मूल्यांचा डोस देणाऱ्या अमेरिकेत चाललंय काय?
5
मिलिंद देवरा यांना शिंदेसेनेकडून उमेदवारी? वरळीतून आदित्य ठाकरेंच्या विरोधात रिंगणात
6
विशेष लेख: वाट्टेल ते करून लग्न करा, मूल जन्माला घाला! जन्मदर वाढविण्यासाठी नवीन टूम!
7
भ्रष्टाचार निर्मूलन: संवेदनशील सत्यनिष्ठा हवी! काम लवकर होण्यासाठी 'किड' वाढवू नका!
8
ठाण्यात मनसे-महायुती छुपी युती? ठाणे, कल्याण, डोंबिवलीत निवडणूक लढण्याची शक्यता धूसर
9
१३८ कोटींचे सोने पकडले; विशेष चारचाकी वाहनावर पुण्यात कारवाई; कायदेशीर प्रक्रिया सुरू
10
भाजप, शिंदेसेनेच्या तीव्र विरोधामुळे नवाब मलिक यांना अद्याप तरी उमेदवारी नाहीच!
11
विधानसभा निवडणूक: पोलिसांच्या नाकाबंदीत खालापूर टोल नाक्यावर दहा कोटींची चांदी जप्त
12
३६ जागांवर महायुती अन् मविआचेही ‘वेट अँड वॉच’; एकमेकांच्या उमेदवारांची प्रतीक्षा
13
राजकारणातील सर्वच पुतण्यांचा DNA एकसारखाच, अडचणीत आणाल तर...- छगन भुजबळ
14
राहुल नार्वेकरांच्या मालमत्तेत चार कोटींची वाढ; पाच वर्षात आशिष शेलारांची संपत्तीत किती वाढली?
15
रांगोळीवरही निवडणुकीचा रंग! पालघरमधील सफाळेत मतदान जनजागृतीचे अनोखे आवाहन
16
जयश्री थोरातांवर बोलताना भाजपा नेत्याची जीभ घसरली; संगमनेरमध्ये तणाव, वाहनांची तोडफोड
17
तुला नाउमेद करणार नाही; उद्धव ठाकरेंचा नाराज सुधीर साळवींना शब्द, शिवडीतील बंड थंड
18
IND vs AUS: ऑस्ट्रेलिया विरूद्धच्या कसोटी मालिकेसाठी भारताचा संघ जाहीर, पाहा कुणाला संधी?
19
काँग्रेसला कमी जागा मिळाल्याने राहुल गांधी नाराज; नाना पटोलेंनी सांगितले बैठकीत काय झालं?
20
इन आँखो की मस्ती में... बॉलिवूड गाजवणाऱ्या मराठमोळ्या मृणाल ठाकूरचं 'रॉयल' फोटोशूट (Photos)

"सत्तेविना यांचा जीव होतो कायम कासावीस... घराणेशाही वाचवायला महागठबंधनची तजवीज"

By ऑनलाइन लोकमत | Published: September 03, 2023 4:05 PM

BJP4Maharashtra slams INDIA Opposition Alliance : आघाडीवरून भाजपाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे.

इंडिया आघाडीत संयोजक कोण? हा कळीचा मुद्दा ठरत असल्याने अखेर समन्वय समितीने त्यावर तोडगा काढण्यात आला. लोकसभा निवडणुकीची रणनीती १४ जणांची समिती ठरवणार आहे. या समितीत  काँग्रेसकडून ज्येष्ठ नेते के.सी. वेणुगोपाल यांची, तर राष्ट्रवादी काँग्रेसकडून अध्यक्ष शरद पवार यांची निवड करण्यात आली असून शिवसेना ठाकरे गटाकडून संजय राऊत यांना स्थान देण्यात आले आहे. आगामी निवडणुका लक्षात घेता ही समिती देशभराचा दौरा करून पुढील रणनीती ठरविणार आहे. 

आघाडीवरून भाजपाने पुन्हा एकदा निशाणा साधला आहे. "बेरोजगार घराणेशाही वाचवण्यासाठी तयार झाली घमंडीया आघाडी" असं म्हणत हल्लाबोल केला आहे. तसेच "सत्तेविना यांचा जीव होतो कायम कासावीस... घराणेशाही वाचवायला महागठबंधनची तजवीज..." म्हणत भाजपाने खोचक टोला लगावला आहे. भाजपा महाराष्ट्रने आपल्या ट्विटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केलं आहे. यासोबत उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे, सोनिया गांधी आणि राहुल गांधी, शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचे फोटो देखील पाहायला मिळत आहेत. 

इंडिया आघाडीच्या लोगोचे अनावरण अखेर लांबणीवर पडले. आघाडीत नवीन पक्ष आल्याने त्यांचेही या लोगोवर एकमत होणे आवश्यक असल्याने अनावरण पुढे ढकलण्यात आल्याचे समजते. एक-दोन दिवसात लोगोचे अनावरण दिल्लीत होईल, असे शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी सांगितले. लोगोसाठी एकूण पाच ते सात पर्याय आहेत. हे सर्व लोगो नव्याने आलेले पक्ष आणि समितीसमोर ठेवले जातील, त्यानंतर यावर अंतिम निर्णय होईल.  

घमेंडिया कोण हे देश बघतोय -  शरद पवारइंडिया आघाडीचा उल्लेख भाजपाचे नेते ‘घमेंडिया आघाडी’ असा करतात. मात्र, आम्ही केवळ एकत्र येण्याची चर्चा केली तरी त्यावर भाजपाचे नेते टीका करतात. आम्ही भेटलो तर त्यावरही टीका करतात. यावरून असे दिसते की, १० वर्ष देशाची सत्ता भोगूनही हे जमिनीवर नाहीत. यावरून घमेंडिया कोण आहे हे दिसते. आमच्यावर कितीही टीका केली तरी आता आम्ही थांबणार नाही. 

आम्ही विरोधक नाही, तर देशप्रेमी - उद्धव ठाकरे परिवारवाद म्हणून आमच्यावर टीका केली जाते. पाटण्याच्या बैठकीत मी सांगितले होते की, भारत माझा परिवार आहे. त्यासाठीच आम्ही एकत्र आलो आहोत. आम्ही विरोधक नाही तर देशप्रेमी आहोत. देशाला वाचविण्यासाठी आम्ही एकत्र आलो आहेत. मुंबईतील बैठकीत इंडियाची ताकद वाढली. दिवसेंदिवस इंडिया मजबूत होत आहे. त्यामुळे एनडीएच्या मनात भीती वाढली आहे.  

टॅग्स :BJPभाजपाINDIA Opposition Allianceइंडिया आघाडीPoliticsराजकारण