शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीसांची भर पावसात सभा; म्हणाले- "पावसात सभा घेतली की सीट निवडून येतेच..!"
2
Raj Thackeray: राज ठाकरे भाषण न करताच भिवंडीतून परतले; प्रकृती अस्वास्थ्यामुळे घेतला निर्णय
3
जाना था जापान, पहुंच गए चीन...! पंकजा मुंडेंसोबत असेच घडले, हेलिकॉप्टर सिडकोऐवजी सायखेड्याला पोहोचले
4
दोन 'गुलाब'रावांच्या हायव्होल्टेज लढतीत विजयाचा 'गुलाल' कोण उडवणार?
5
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या प्लेनमध्ये तांत्रिक बिघाड, देवघर एअरपोर्टवर थांबलं विमान
6
तंत्रज्ञानाची कमाल! WhatsApp चं चॅटिंग मजेशीर करणाऱ्या 'या' सीक्रेट ट्रिक्स माहितीहेत का?
7
उद्धव ठाकरेंचा मनसेला मोठा धक्का; राज ठाकरेंचा नाशिकमधील विश्वासू शिलेदार फोडला
8
पाकिस्तानात शी जिनपिंग यांना चीनी सैन्य का करायचे आहेत तैनात?; भारतासाठी चिंताजनक
9
हिंगोलीत निवडणूक अधिकाऱ्यांकडून अमित शाहांच्या बॅगांची तपासणी;म्हणाले, "लोकशाहीसाठी आपण..."
10
Maharashtra Election 2024: महायुतीतील मैत्रीपूर्ण लढतीच्या साठमारीत अपक्ष करणार का 'विक्रम'?
11
अब्दुल सत्तारांच्या पराभवासाठी सिल्लोडमध्ये उद्धव ठाकरेंची भाजपला साद
12
Ajay Gupta : कल्पकतेला सॅल्यूट! व्हीलचेअरवर असतानाही मानली नाही हार; उभं केलं १०० कोटींचं साम्राज्य
13
कर्नाटकच्या विरोधी पक्षनेत्याला हनीट्रॅपमध्ये अडकवून HIV बाधित करण्याचा होता प्लॅन? पोलीस निरीक्षकाला अटक
14
महाराष्ट्रात योगी आदित्यनाथ यांनी खरंच बुलडोझरवर चढून प्रचार केला का? जाणून घ्या सत्य
15
भाषण करताना सुरू झाला पाऊस, निवडणुकीचा निकाल चांगला लागणार, शरद पवारांचं विधान
16
Maharashtra Election 2024 Live Updates: भिवंडीतील राज ठाकरेंची सभा झाली, पण भाषण झाले नाही
17
"...अन् दुसऱ्याच दिवशी भाजपात गेले"; शरद पवारांनी सांगितला संजय पाटलांचा इतिहास
18
गुजरातच्या पोरबंदर किनाऱ्यावर 700 किलो ड्रग्ज जप्त, NCB आणि नौदलाची मोठी कारवाई
19
Mumbai Metro 3 Fire BREAKING: मेट्रो-३ च्या बीकेसी स्टेशनला आग, सर्व फेऱ्या रद्द; प्रवासी सुखरुप
20
“राहुल गांधींच्या सभांना प्रचंड प्रतिसाद, PM मोदींचं रिकाम्या खुर्च्यांना संबोधन”: चेन्नीथला

श्रीमंतीसह गुन्हेगारीमध्येही भाजपाचीच आघाडी

By admin | Published: May 30, 2017 4:16 AM

पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता मिळविणारा भाजपा श्रीमंतीसह गुन्हेगारीमध्येही आघाडीवर आहे. निवडणूक जिंकलेल्या

नामदेव मोरे/लोकमत न्यूज नेटवर्कनवी मुंबई : पनवेल महापालिका निवडणुकीमध्ये एकहाती सत्ता मिळविणारा भाजपा श्रीमंतीसह गुन्हेगारीमध्येही आघाडीवर आहे. निवडणूक जिंकलेल्या ६० पैकी ४० कोट्यधीश त्यांचेच असून, गुन्हे दाखल असलेल्या १७ पैकी १५ नगरसेवक भाजपाचेच असल्याचे सर्वेक्षणामध्ये स्पष्ट झाले आहे. काँगे्रसच्या मंजुळा कातकरी या सर्वात कमी संपत्ती असलेल्या नगरसेविका असल्याचेही महाराष्ट्र इलेक्शन वॉच व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म संस्थेने केलेल्या सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे. महापालिकेच्या निवडणुकीमध्ये सर्वपक्षीय उमेदवारांनी प्रचंड पैसा खर्च केल्याचे निदर्शनास आले होते. पनवेलमधील काही प्रभागामध्ये एका मतासाठी २ ते ४ हजार रुपयांचे वाटप केल्याची चर्चा आहे. याशिवाय काही ठिकाणी रॅली व नियमित प्रचाराला येणाऱ्यांनाही आर्थिक मोबदला देण्यात येत होता. उमेदवारी देतानाही संबंधितांची पैसे खर्च करण्याची तयारी तपासून पाहिली जात होती. निकालामध्येही आर्थिकदृष्ट्या सक्षम असलेले उमेदवार जिंकल्याचे स्पष्ट झाले आहे. या ७८ पैकी तब्बल ६० उमेदवार हे कोट्यधीश आहेत. उर्वरित १८ पैकी ९ उमेदवारांची संपत्ती ५० लाखपेक्षा जास्त आहे. चार जणांची ४० लाखापेक्षा जास्त व तिघांची १५ ते २५ लाखापर्यंत संपत्ती आहे. काँगे्रसच्या मंजुळा गजानन कातकरी यांची सर्वात कमी ६ हजार एवढीच संपत्ती आहे. त्यांच्याबरोबर भाजपाच्या आरती नवघरे व महादेव मधे यांची अनुक्रमे १ लाख ९२ हजार व २ लाख ८३ हजार एवढी संपत्ती आहे. श्रीमंत नगरसेवकांमध्येही भाजपाचीच आघाडी आहे. ६० कोट्यधीशांपैकी ४० भाजपाचे नगरसेवक असल्याचे स्पष्ट झाले आहे. शेतकरी कामगार पक्षाचे १७, राष्ट्रवादीचे २ व काँगे्रसचा १ उमेदवार कोट्यधीश आहे.शिक्षणाला गौण स्थानगुन्हेगारीमध्येही भाजपाच्याच नगरसेवकांचा अग्रक्रमांक आहे. निवडून आलेल्या १७ जणांवर गुन्हे दाखल असून, त्यामध्ये १५ जण भाजपाचे आहेत. उर्वरित दोन शेकापचे आहेत. महापालिका निवडणुकीमध्ये मतदारांनीही शिक्षणाला गौण स्थान दिले असल्याचेही महाराष्ट्र इलेक्शन वॉच व असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्मच्या पाहणीमध्ये स्पष्ट झाले.गुन्हे दाखल असलेले उमेदवारपक्षसंख्याटक्केवारीभाजपा१५२९शेकाप२९इतर००पक्षनिहाय कोट्यधीश उमेदवारपक्षसंख्याटक्केवारीभाजपा४०७८शेकाप१७७४राष्ट्रवादी२१००काँगे्रस१५०सर्वाधिक श्रीमंत उमेदवारनावपक्षसंपत्ती (कोटी)परेश ठाकूरभाजपा९५.४७रामजी बेराभाजपा२७.३९प्रीतम म्हात्रेशेकाप२६.७१मनोज भुजबळभाजपा२२.५४राजेंद्रकुमार शर्माभाजपा२१.९५चंद्रकांत सोनीभाजपा१४.८४राजश्री वावेकरभाजपा१२.९९अरविंद म्हात्रेशेकाप११.७१अजीज पटेलशेकाप११.२१शीतल केणीशेकाप१०.२४सर्वात कमी उत्पन्न (एकूण मालमत्ता)नावपक्षउत्पन्नमंजुळा कातकरीकाँगे्रस६ हजारआरती केतन नवघरेभाजपा१ लाख ९२ हजारमहादेव मधेभाजपा२ लाख ८३ हजार वयोगटाप्रमाणे जिंकलेले उमेदवारवयोगटउमेदवार२५ ते ३०११३१ ते ४०३८४१ ते ५०२१५१ ते ६०७६१ ते ७०१शैक्षणिक पात्रताशिक्षणसंख्यापाचवी८आठवी१८दहावी७बारावी१९पदवी१३पदव्युत्तर६इतर४माहिती ३उपलब्ध नाहीउमेदवारांपैकी पाचवी पास झालेले ८, आठवी पास १८ व दहावीपर्यंत शिक्षण झालेले ७ जण जिंकून आले आहेत. ७८ पैकी १९ जण पदवी व पदव्युत्तर शिक्षण घेतलेले आहेत.