शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राचे बेस्ट मुख्यमंत्री कोण? अजित पवारांनी घेतले या नेत्याचे नाव, म्हणाले...'युती-आघाडीच्या युगात...'
2
मौलाना सज्जाद नोमानींनी जारी केली यादी; मुंबईतील ३६ जागांवर कुणाला दिला पाठिंबा?
3
बंडखोर उमेदवारांमुळे मतविभाजनाची भीती; भाजप, ठाकरेंच्या शिवसेनेसमोर आव्हान
4
आगीचा भडका, किंकाळ्या, चेंगराचेंगरी, पालकांचा आक्रोश...; मन हेलावून टाकणारा Video
5
दुसऱ्या मतदारसंघात उभा असतो तर निवडून आलो असतो; अजित पवारांचे बारामतीत महत्वाचे वक्तव्य
6
पुन्हा बाबा झाल्याचा आनंद! रोहित शर्मानं पत्नी रितिकाला टॅग करत शेअर केला खास फोटो
7
वाढत्या महागाईत व्हिलेन बनताहेत भाज्या; टोमॅटो, कांदा, बटाट्याच्या वाढत्या किंमतींनी बिघडवलं किचनचं बजेट
8
"...म्हणून अशोक चव्हाण आपल्याकडे आले, त्यांनी बाबासाहेबांचं म्हणणं ऐकलं"; नेमकं काय म्हणाले एकनाथ शिंदे?
9
Priyanka Gandhi : "महाराष्ट्राच्या धरतीने नेहमीच देशाला दिशा दिली"; प्रियंका गांधींकडून जय भवानीचा जयघोष
10
"युतीचे सरकार आल्यावर उद्धव ठाकरेंना जेलमध्ये टाकू"; अब्दुल सत्तार यांचा ठाकरेंवर प्रतिहल्ला
11
अबब! मतदानाच्या ४ दिवस आधी मुंबईत मोठी कारवाई; ८४७६ किलो चांदी पाहून अधिकारी हैराण
12
Sankashti Chaturthi 2024: संकष्टीने सुरु होणारा आठवडा बाराही राशींसाठी ठरणार लाभदायी!
13
'या' १८ जिल्ह्यांमध्ये आता हॉलमार्किंगशिवाय सोन्याचे दागिने विकले जाणार नाहीत
14
'स्विंग इज किंग'! हा भारतीय खेळाडू ठरू शकतो IPL मेगा लिलावातील सर्वात महागडा गोलंदाज
15
पुढील वर्षी १० वंदे भारत स्लीपर ट्रेन सुरू करण्याची तयारी, मार्ग आणि फीचर्स जाणून घ्या...
16
IPO च्या समुद्रात उतरणार अमन गुप्ता यांची 'boAt', काय आहे कंपनीचा प्लान?
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024:'व्होट जिहादची भाषा होणार असेल तर महायुतीने बांगड्या भरलेल्या नाहीत'; आशिष शेलारांचा इशारा
18
Maharashtra Election 2024: "तुमची हिंमत असेल, तर माझी जागा पाडून दाखवा"; नवाब मलिकांचं भाजपला चॅलेंज
19
Maharashtra Election 2024 Live Updates: PM मोदींची स्मरणशक्ती गेलीय, राहुल गांधींचा घणाघात
20
जामनेरमध्ये 'विकासा'च्या मुद्याची चर्चा; गिरीश महाजन यांचा डोअर टू डोअर प्रचारावर भर

मराठा क्रांती मोर्चा : भाजपाच्या आशिष शेलारांना आझाद मैदानात येण्यास मज्जाव

By ऑनलाइन लोकमत | Published: August 09, 2017 10:52 AM

भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानावर धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. आशिष शेलार यांना मराठा कार्यकर्त्यांकडून आझाद मैदानात येण्यास मज्जाव करण्यात आला.

मुंबई, दि. 9 - भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांना आझाद मैदानावर धक्काबुक्की करण्यात आल्याचे वृत्त समोर आले आहे. आशिष शेलार यांना मराठा कार्यकर्त्यांकडून आझाद मैदानात येण्यास मज्जाव करण्यात आला. 'आधी आरक्षण द्या, त्यानंतर मोर्चामध्ये सहभागी व्हा', अशी मागणी करत आक्रमक झालेल्या आंदोलनकर्त्यांनी आशिष शेलार यांना मैदानात येण्यास मज्जाव केला. आशिष शेलार यांनी मात्रे ही बाब फेटाळून लावली आहे.  

दरम्यान, आशिष शेलार सकाळी 10.15 वाजण्याच्या सुमारास मुख्य प्रवेशद्वाराने चार पोलिसांच्या सुरक्षा कवचात आझाद मैदानात दाखल झाले होते. यावेळी आरक्षणाची मागणी करत आक्रमक झालेल्या काही कार्यकर्त्यांनी त्यांना प्रवेशद्वारावरच अडवले व तुम्ही परत माघारी फिरा, असे सांगत त्यांना मैदान परिसरात येण्यास रोखले. यावेळी जमावाचा रोष पाहून शेलार यांनी आझाद मैदानातून निघून जाणेच योग्य असल्याचे समजले व तेथून ते निघाले. 

मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात 

दरम्यान, मुंबईतून मराठा क्रांती मोर्चाला सुरुवात झाली आहे. राज्यभरातून लाखो मोर्चेकरी मुंबईत दाखल झालेत. त्यामुळे ‘एकच चर्चा, मराठा मोर्चा’ असे वातावरण निर्माण झाले आहे. समन्वय समितीने मोर्चाचे सुयोग्य नियोजन केले आहे. आंदोलकांच्या चहा-नाश्तापासून पिण्याचे पाणी, शौचालय, आदी सोयींसह मार्गदर्शनासाठी ६ हजार स्वयंसेवक सज्ज आहेत. त्यांना विशेष टी-शर्ट आणि ओळखपत्रे वितरित करण्यात आली आहेत.शाळांना सुटी : दक्षिण मुंबईतील शाळा बंदचा निर्णय घेण्यात आला आहे.२० हजार पोलीसमोर्चासाठी २० हजार पोलिसांचा फौजफाटा रस्त्यावर उतरले आहेत.  पोलीस आयुक्त दत्ता पडसळगीकर यांच्यासह पाचही सहआयुक्तही येथे आहेत.जड वाहनांना बंदीमुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर गुरूवारी सकाळपर्यंत जड वाहनांना बंदी आहे.चेंबूरपासून वळवा वाहनेभायखळ्यापर्यंत पोहोचण्यासाठी मराठा क्रांती मोर्चाच्या समन्वय समितीने, चेंबूर सर्कलपासूनच सर्व वाहनांना वळण दिले आहे. मोर्चात सामील होण्यासाठी येणारी वाहने चेंबूर सर्कलपासून वळण घेऊन बीपीटी सिमेंट यार्डच्या दिशेने रवाना. तिथून अवघ्या एक किलोमीटरवर कॉटनग्रीन किंवा रे रोड मार्गे मोर्चाच्या ठिकाणी जाता येणार आहे.‘दादर ते जे.जे. अन्य वाहनांना बंद’डॉ. बाबासाहेब आंबेडकर रोडवरील दादर फायर ब्रिगेड जंक्शन ते जे.जे. उड्डाणपूल ज्या ठिकाणी सुरू होतो, त्या ठिकाणापर्यंत दक्षिण वाहिनी सर्व प्रकारच्या वाहनांसाठी बंद आहे. जे.जे. उड्डाणपुलावरून सीएसटीएम जंक्शनपर्यंत दक्षिण व उत्तर मार्ग वाहतुकीसाठी बंद आहेत.प्रश्न तत्काळ सोडवा : राणेमराठा समाजाचा आरक्षणाचा मुद्दा न्यायालयात प्रलंबित असला तरी तिथे प्रतिज्ञापत्र सादर करताना राज्य सरकारने मराठा समाजाची ठाम भूमिका मांडावी. आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा, म्हणजे मोर्चे काढण्याची वेळ या समाजावर येणार नाही, असे मत माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांनी व्यक्त केले.वैद्यकीय सुविधा सज्जछत्रपती शिवाजी महाराज मेडिकोस असोसिएशन (मराठा मेडिकोस असोसिएशन)चे डॉक्टर्स मोर्चातील आंदोलकांना वैद्यकीय सुविधा पुरवण्यासाठी सज्ज आहेत. त्यासाठी सर्व डॉक्टर्सना चार ते पाच गटांत विभागले आहे.

टॅग्स :Maratha Kranti Morchaमराठा क्रांती मोर्चा