शहरं
Join us  
Trending Stories
1
राहुल गांधींचे नागरिकत्व रद्द होणार का? केंद्र सरकार १९ डिसेंबरला उच्च न्यायालयाला निर्णय कळविणार
2
तिसऱ्या महायुद्धात अण्वस्त्रांचा वापर, एक तृतीयांश लोकसंख्या मारली जाणार; सिडनीच्या बिशपची भविष्यवाणी 
3
"हे फक्त शब्द नाहीत, इशारा आहे"; चिमुकलीवरील अत्याचाराच्या घटनेनंतर अमित ठाकरे संतापले
4
महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीतील महायुतीच्या विजयानंतर, काँग्रेसची मोठी घोषणा; देशभरात खास मोहीम चालवणार 
5
"तुम्ही जिंकता तेव्हा ईव्हीएम चांगले अन् पराभूत झाले, तर..."; सुप्रीम कोर्टाने पिळले कान
6
Numerology: ‘या’ ६ मूलांक होतील मालामाल, धनलाभाचे योग; नोव्हेंबरची सांगता होईल खास!
7
अपघातानंतर पहिल्यांदाच कश्मिरा शाहने शेअर केला Video; नाकाला झालेली दुखापत
8
Neha Bhasin : "अंधाऱ्या खोलीत बसते, माझं वजन १० किलोने वाढलं"; नेहा भसीन देतेय गंभीर आजाराशी झुंज
9
OLA चा धमाका! लॉन्च केली नवीन EV स्कूटर रेंज; किंमत फक्त ₹39,999 पासून सुरू...
10
लोकप्रिय म्युझिक बँडच्या लाईव्ह कॉन्सर्टमध्ये प्रिया बापटचा परफॉर्मन्स, अनुभव शेअर करत म्हणाली...
11
धुळ्यात काँग्रेसच्या कुणाल पाटलांना शून्य मतं मिळाल्याचा दावा; निवडणूक आयोगाने दिलं स्पष्टीकरण
12
"३० नोव्हेंबरपर्यंत मुख्यमंत्रीपदाचे नाव निश्चित होईल"; रावसाहेब दानवेंनी सांगितला फॉर्म्युला
13
"उद्धव ठाकरेंची अवस्था शोलेमधील असरानीसारखी’’, चंद्रशेखर बावनकुळेंची टीका 
14
राखी सावंतने केली Bigg Boss विजेत्याची भविष्यवाणी; म्हणाली, "नाही जिंकला तर पंख्याला लटकेन..."
15
स्टार ऑलराउंडर ठरला महागडा! ३ चेंडूत दिल्या ३० धावा; नेटकऱ्यांनी केला फिक्सिंगचा आरोप
16
झारखंडमध्ये निवडणूक जिंकूनही काँग्रेसची झोळी रिकामी, झाली जम्मू-काश्मीरसारखी अवस्था
17
राज्यसभेच्या सहा जागांसाठी निवडणूक अधिसूचना जारी; २० डिसेंबरला होणार मतदान
18
TV, OTT, AI सगळं एकाच ठिकाणी; टीव्हीसोबतच मिळणार सगळ्याचं 'सबस्क्रिप्शन'
19
'इंडिया आघाडीला मजबूत नेत्याची गरज', TMC ने राहुल गांधींच्या क्षमतेवर उपस्थित केला प्रश्न
20
'ते फोन उचलत नव्हते, म्हणून कान उघडले...', लॉरेन्स टोळीने चंदीगड बॉम्बस्फोटाची जबाबदारी घेतली, रॅपर बादशाहला दिली धमकी

भाजपाची मुसंडी; काँग्रेसला हादरा

By admin | Published: October 20, 2014 5:08 AM

काँग्रेसला मागे सारत भाजपाने मराठवाड्यात मारलेल्या मुसंडीचा जोर एवढा जबरदस्त आहे की, आजवर काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या मराठवाड्यात काँग्रेसला जबर पराभवाला सामोरे जावे लागले

सुधीर महाजनकाँग्रेसला मागे सारत भाजपाने मराठवाड्यात मारलेल्या मुसंडीचा जोर एवढा जबरदस्त आहे की, आजवर काँग्रेस आणि शिवसेना यांचे प्रभावक्षेत्र असलेल्या मराठवाड्यात काँग्रेसला जबर पराभवाला सामोरे जावे लागले, तर सेनेचा प्रभाव कमी करीत त्यांना रोखून ठेवले. या निवडणुकीचे विशेष म्हणजे औरंगाबाद आणि नांदेड या दोन प्रमुख शहरांमध्ये मजलिस-ए-इत्तेहादुल मुसलमिन (एमआयएम) या पक्षाचा होत असलेला मराठवाड्यातील उदय. या पक्षाने औरंगाबादेत एक जागा जिंकली आणि नांदेडमध्येही जोरदार टक्कर दिली. ही घटना म्हणजे औरंगाबाद शहराच्या राजकारणाचा पोत बदलण्याची चिन्हे आहेत. याचे परिणाम चार महिन्यांनी होणाऱ्या महापालिका निवडणुकीत ठळकपणे जाणवतील. औरंगाबाद पूर्व आणि मध्य या दोन मतदारसंघांमध्ये मुस्लिमांच्या मतांचे ध्रुवीकरण स्पष्टपणे दिसून आले. ही गंभीर बाब आहे. काँग्रेसने लातूर, तर राष्ट्रवादीने उस्मानाबादमधील आपला प्रभाव कायम ठेवला. बीडमधील राष्ट्रवादीचा प्रभाव संपुष्टात आला आहे, तर जालन्यात भाजपाचे कमळ फुलले. औरंगाबाद मध्यची शिवसेनेच्या दृष्टीने प्रतिष्ठेची असलेली जागा एमआयएमने खेचून घेतली. हिंगोली, परभणी या दोन जिल्ह्यांच्या प्रभावामध्ये बदल झाला आहे. नांदेडमध्ये नरेंद्र मोदींनी सभा घेऊनही लोहा-कंधारची जागा शिवसेनेचे प्रताप पाटील चिखलीकरांनी जिंकली. लातूर व उस्मानाबादमध्ये शिवसेनेची पीछेहाट झाली. मराठवाड्यात मोदींचा प्रभाव दिसून आला. त्यामुळे भाजपाला अपेक्षेपेक्षा जास्त जागा मिळाल्या.