सर्व्हेमुळं भाजपमधील आवक वाढली; सेनेत गेलेल्यांना चिंता ?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2019 06:28 PM2019-07-29T18:28:13+5:302019-07-29T18:36:00+5:30

दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे.

BJP's first choice for Ayaram; Concerned about the Army? | सर्व्हेमुळं भाजपमधील आवक वाढली; सेनेत गेलेल्यांना चिंता ?

सर्व्हेमुळं भाजपमधील आवक वाढली; सेनेत गेलेल्यांना चिंता ?

Next

मुंबई - लोकसभा निवडणुकीत बलाढ्य ठरलेल्या भारतीय जनता पक्षाने आपलं इरादे स्पष्ट करण्यास सुरुवात केली आहे. लोकसभा निवडणुकीतच शिवसेनेसोबत विधानसभा निवडणुकीसाठीची युती निश्चित करणाऱ्या भाजपला स्वबळावर लढून सत्ता मिळण्याचे, संकेत मिळाले आहे. त्यातच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस संपूर्ण ऑगस्ट महिना महाराष्ट्राच्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्याचा सहाजिकच भाजपला फायदा होणार असून दिग्गज नेत्यांच्या इनकमिंगमुळे देखील भाजपची ताकत शिवसेनेपेक्षा कित्येक पटीने वाढली आहे. त्यामुळे आयारामांची पहिली पसंती, भाजपलाच असल्याचे दिसून येते.

पक्षाच्या अंतर्गत सर्व्हेत स्वबळावर लढल्यास भाजपला १६० जागा दाखविण्यात आल्या आहेत. तर शिवसेनेला ९० जागा आणि आघाडीला ३८ जागा मिळण्याचा अंदाज आहे. तर शिवसेना भाजप एकत्र लढल्यास दोघांना २३० जागा मिळण्याचा अंदाज आहे. त्यामुळे सहाजिकच राज्यात भाजपच मोठा पक्ष ठरणार हे निश्चित आहे. त्यातच भाजपकडून कार्यकर्त्यांना स्वबळावर लढण्याची तयारी करण्यासंदर्भात सूचना मिळत असून त्यामुळे शिवसेनेचे टेन्शन वाढणार आहे.

राज्यात भाजपची सत्ता येणार या विचाराने अनेक नेत्यांनी प्रवेश केला. तर शिवसेना-भाजप युती राहणार हे ठरवून काहींनी शिवसेनेत प्रवेश केला. राष्ट्रवादी काँग्रेसमधील तब्बल २० हून अधिक नेत्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला असून १० हून अधिक नेते तयारीत आहे. तर जयदत्त क्षीरसागर आणि सचिन अहिर यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे. परंतु, भाजपची वाढलेली ताकत, शिवसेनेत गेलेल्या नेत्यांना पुनर्विचार करायला लावणारी आहे.

सध्या राजकारणात उगवत्या सूर्याला नमस्कार करण्याची चढाओढ लागल्याचे वक्तव्य शिवसेना नेते संजय राऊत यांनी केले आहे. तसेच आम्ही नेत्यांना पारखूनच सेनेत प्रवेश देत असून त्यांना कुठलाही शब्द देत नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

दरम्यान सर्व्हेत भाजपला बहुमत दाखविण्यात आल्यामुळे शिवसेनेत जाणाऱ्यांचे भवितव्य काय, असा प्रश्न उपस्थित होत आहे. राऊत यांच्या वक्तव्यामुळे सेनेत प्रवेश करणाऱ्या नेत्यांना उमेदवारीची खात्री देण्यात येत नसल्याने आयारामांची चिंता वाढणार आहे. तसेच शिवसेनेत प्रवेश करू इच्छिणारे नेते वेट ऍन्ड वॉचच्या भूमिकेत गेले आहे. 

Web Title: BJP's first choice for Ayaram; Concerned about the Army?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.