शहरं
Join us  
Trending Stories
1
"तुम्ही मंगळावर जा, तेथे ना EC आहे ना EVM...!"; संबित पात्रा यांनी कुणाची खिल्ली उडवली?
2
94 वर्षांच्या उद्योगपतीनं दान केले ₹10000Cr...; सांगितलं, मृत्यूनंतर अब्जावधीच्या संपत्तीच काय होणार? कोण असणार उत्तराधिकारी?
3
"सच्चा शिवसैनिक..., आज मोठा गैरसमज त्यांनी दूर करून टाकला"; केसरकर यांच्याकडून CM शिंदेंचं मुक्त कंठानं कौतुक
4
एकनाथ शिंदेंची स्पष्ट भूमिका, भाजपाचा CM होण्याचा मार्ग मोकळा; फडणवीसांची पहिली प्रतिक्रिया
5
हिवाळी अधिवेशनात गदारोळ: अदानी समूहाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये खडाजंगी
6
₹35 चा शेअर खरेदी करण्यासाठी गुंतवणूकदारांची झुंबड, दुसऱ्या दिवशीही लागलं अप्पर सर्किट
7
ISRO ने हाती घेतली नवीन मोहिम; भारताचे यान थेट शुक्र ग्रहावर जाणार, सर्व गुपिते उघड होणार...
8
अजमेर दर्ग्यात शिव मंदिर? न्यायालयानं याचिका स्वीकारली, सर्व पक्षकारांना नोटीस पाठवली!
9
IND vs AUS : Rohit Sharma ला दुसऱ्या कसोटीत मोठी संधी, Virat Kohli शी साधणार बरोबरी? पाहा खास आकडेवारी
10
हिवाळी अधिवेशनात वक्फ दुरुस्ती विधेयक मांडले जाणार नाही; कारण काय? जाणून घ्या...
11
विजय शंकरचा जबरदस्त थ्रो! हार्दिक पांड्याच्या तुफानी खेळीला लागला ब्रेक, पण... (VIDEO)
12
IPL मध्ये लागली ३० लाखांची बोली अन् पुढच्याच सामन्यात Arjun Tendulkar ने केली खराब कामगिरी, संघाच्याही पराभवाची हॅटट्रिक
13
३० तारखेपर्यंत शपथविधी व्हायला हवा, अडीच वर्षांपूर्वीची परिस्थिती वेगळी, आताची वेगळी; अजित पवारांचे मुख्यमंत्रीपदावर वक्तव्य
14
काँग्रेसचे ठरले! ‘मतपत्रिकेवर निवडणुकी’साठी ‘भारत जोडो’सारखी राहुल गांधींची देशव्यापी यात्रा
15
नव्या सरकारमध्ये तुमचे स्थान काय असेल? उपमुख्यमंत्री की गृहमंत्री? एकनाथ शिंदेंचे सूचक विधान
16
बागेश्वर बाबासमोर 'द ग्रेट खली'नं साधूला केसाने पकडून एका हातात उचलले, व्हिडिओ व्हायरल...
17
'मिटकरींनी पक्षाचे आमदार असूनही पक्षविरोधी भूमिका घेतली...'; पार्थ पवारांचे धक्कादायक ट्विट
18
“मी मोदींना फोन केला, म्हटलं माझा कुठलाही अडसर नसेल!”; एकनाथ शिंदेंनी CM पदावरचा दावा सोडला
19
भरघोस पगार वाढ! IPL मध्ये या चौघांना मिळालं कोहलीपेक्षाही तगडं पॅकेज
20
शिंदेंनी बंडखोरी केली नसती तर भाजपा सत्तेत आली नसती; महायुतीच्या जुन्या सहकाऱ्याचे वक्तव्य

भाजपाच्या फ्लेक्सबाजीचा निषेध

By admin | Published: June 21, 2016 12:36 AM

भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आल्याच्या निमित्ताने शहरभर बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभारून शहराचे विद्रूपीकरण करण्यात

पुणे : भारतीय जनता पक्षाच्या राज्य कार्यकारिणीची बैठक पुण्यात आयोजित करण्यात आल्याच्या निमित्ताने शहरभर बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभारून शहराचे विद्रूपीकरण करण्यात आल्याप्रकरणी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांनी मुख्य सभेत सोमवारी आंदोलन केले. पालिकेची परवानगी न घेता लाखो रुपयांचे उत्पन्न बुडविणाऱ्या भाजपा नेत्यांच्या कार्यालयासमोर बॅण्डबाजा वाजवून त्याची वसुली करण्याची मागणी या वेळी नगरसेवकांकडून करण्यात आली.महापालिकेत मुख्य सभेला सुरुवात होताच राष्ट्रवादी काँग्रेस व काँग्रेसच्या नगरसेवकांनी ‘भाजपाचे नेते आले आणि शहर विद्रूप करून गेले’ असे लिहिलेले फलक फडकाविले. भाजपाकडून शहरात बेकायदेशीरपणे करण्यात आलेल्या फ्लेक्सबाजीच्या विरोधात या वेळी घोषणा देण्यात आल्या. उपमहापौर मुकारी अलगुडे, सभागृहनेते बंडू केमसे, विरोधी पक्षनेते अरविंद शिंदे, कमल व्यवहारे, दिलीप बराटे, अविनाश बागवे यांच्यासह अन्य नगरसेवक या आंदोलनात सहभागी झाले. या वेळी बोलताना रिपाइंचे गटनेते सिद्धार्थ धेंडे म्हणाले, ‘‘महापुरुषांच्या जयंतीनिमित्त एखादा फ्लेक्स शहरात लावायचा असेल तर प्रशासनाकडे विनंत्या कराव्या लागतात. दुसरीकडे भाजपाकडून सर्रास बेकायदेशीरपणे फ्लेक्स उभारले तरी त्यावर कारवाई होत नाही. भाजपाकडून सुरू असलेल्या व्यक्तिपूजेला पायबंद घातला पाहिजे.’’अरविंद शिंदे म्हणाले, ‘‘पार्टी विथ डिफरन्स असे म्हणणाऱ्या भाजपाकडून बेकायदेशीर फ्लेक्सबाजी होणे योग्य नाही. त्यांनी फ्लेक्स लावावेत मात्र त्यासाठी परवानगी घ्यावी. गणेश मंडळावर बेकायदा फ्लेक्स लावल्याप्रकरणी गुन्हे दाखल केले आहेत. त्यानुसार भाजपाच्या कार्यकर्त्यांवरही याबाबत गुन्हे दाखल करण्यात यावेत.’’ सभागृह नेते बंडू केमसे म्हणाले, ‘‘भाजपाचे नेते नितीन गडकरी यांनी नुकताच ‘जेवढे पचेल तेवढेच खा’ असा कार्यकर्त्यांना सल्ला दिला आहे. मात्र भाजपाचे लोक नुसचे खा... खा करत आहेत.’’