शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

भाजपाच्या 'त्या' नेत्यांनी फोन करून दिली होती ऑफर; जितेंद्र आव्हाडांचा गौप्यस्फोट

By ऑनलाइन लोकमत | Published: February 02, 2023 5:32 PM

कोण कोणाला भेटला, रात्री कुठे बैठक झाली याला काही महत्त्व नसते असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. 

ठाणे - मी गेल्या ३५ वर्षापासून राजकारणात आहे. ३५ वर्षात दोनदा अशा घटना घडल्यात त्याचा आज मी पहिल्यांदा खुलासा करतो. एकदा मला सकाळी साडे सात वाजता गोपीनाथ मुंडेंचा फोन आला होता. जितेंद्र, तुला आमदार करायचं ठरवलंय, तु तुझ्या बायकोशी बोलून घे आणि मला काय तो निरोप दे, प्रमोदशी(प्रमोद महाजन) माझं बोलणं झालंय, तो संध्याकाळी बाळासाहेबांना भेटून तुझी उमेदवारी फिक्स करेल असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी नेते जितेंद्र आव्हाडांनी केला आहे. 

जितेंद्र आव्हाड म्हणाले की, गोपीनाथ मुंडे यांनी मला खूप म्हणजे खूपच मदत केलीय. त्यांचे उपकार आहेत. माझ्या बायकोने मुंडेंना फोन केला. तुमच्याबद्दल आदर आहे. तुमचे खूप उपकार आहेत. परंतु तो शरद पवारांना सोडू शकत नाही. हा त्याचा विक पॉईंट आहे असं सांगितले. तेव्हा ठीक आहे काही हरकत नाही. तो टॅलेंटेड आहे. त्याला पटकन संधी देऊन टाकली असती. ती माझ्या हातात आहे असं मुंडेंनी म्हटलं होतं. त्यानंतर जेव्हा जेव्हा गोपीनाथ मुंडे मला भेटले ते तेवढ्याच प्रेमाने बोलायचे असं त्यांनी सांगितले. 

नजीब मुल्ला कुठेही जाणार नाही नजीब मुल्ला असा माणूस आहे जो सगळ्यांना वेगवेगळ्या हवेवर घेऊन जातो आणि शेवटी त्याला पाहिजे तिथेच लॅन्ड होतो. त्याने शरद पवारांची भेट घेतली. दोन तीन दिवसांपूर्वी अजित पवारांची भेट घेतली. कालच्या नगरसेवक बैठकीत अजित पवारांनी स्वत: सांगितले. मला नजीबचा फोन आला होता. तो दिल्लीत एका कामानिमित्त आहे. नजीब कुठेही जाणार नाही हे त्यांनी स्पष्ट केलेय. कोण कोणाला भेटला, रात्री कुठे बैठक झाली याला काही महत्त्व नसते असं जितेंद्र आव्हाडांनी सांगितले. 

राज्यभर दौरा करणार गेल्या काही दिवसांपासून महापुरुषांचं, इतिहासाचं विद्रुपीकरण सुरू आहे. हा एक कट आहे. सातत्याने महाराष्ट्रातील महापुरुषांबद्दल उपाहात्मक बोलायचं. तुलना करायची. दर तीन दिवसांनी नवी वाद निर्माण करायचा. त्यामुळे महाराष्ट्राला खरा इतिहास सांगण्यासाठी आम्ही बाहेर पडतोय. मी, सुषमा अंधारे, संभाजी भगत, वैशाली डोळस आम्ही सर्वजण महाराष्ट्र दौरा करणार आहोत. आवाज बहुजनांचा, सन्मान महाराष्ट्राचा महाराष्ट्र सन्मान परिषद राज्यभरात फिरणार आहोत अशी माहिती जितेंद्र आव्हाडांनी दिली.  

टॅग्स :Jitendra Awhadजितेंद्र आव्हाडBJPभाजपाGopinath Mundeगोपीनाथ मुंडे