शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाला काय विचारावं हे पण उद्धव ठाकरेंना माहिती नाही"; राज ठाकरेंची बोचरी टीका
2
काँग्रेसची पाकिस्तानची भाषा, पीएम मोदींचा पुण्यातून हल्लाबोल; शरद पवारांवर एक शब्दही नाही
3
"माझा मुलगा हॉस्पिटलमध्ये असताना हा माणूस विकला गेला"; राज ठाकरे दिलीप लांडेंवर भडकले
4
अमित शाहांचा मुंबईकरांना शब्द; म्हणाले, "बांगलादेशी, रोहिग्यांना वेचून वेचून बाहेर काढणार"
5
"फूट पडली तर काँग्रेस तुमचं आरक्षण हिरावून घेईल..."; मोदींनी विरोधकांवर त्यांचाच डाव उलटवला!
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'माझी बॅग तुझ्याकडेच देतो, घेऊन येत जा,मात्र त्यातील कपडे चोरू नको'; उद्धव ठाकरेंनी एकनाथ शिंदेंना डिवचले
7
"भाजपसाठी काश्मीर सत्तेपेक्षा प्रिय, उद्धव ठाकरेंनी सांगावं की..."; अमित शाहांचा मविआवर हल्लाबोल
8
महायुतीला किती जागा मिळतील? CM शिंदेंनी थेट आकडाच सांगितला; म्हणाले, “जनतेचा विश्वास...”
9
"जेव्हा-जेव्हा हिंदूंमध्ये फूट पडली, तेव्हा-तेव्हा देशाचा एक भाग वेगळा झाला"; 'बटेंगे तो कटेंगे'वर शेखावत थेटच बोलले
10
"मुख्यमंत्री केलं तर वरचढ होईल म्हणून अजित पवारांना पण...; भुजबळांचा शरद पवारांविषयी गौप्यस्फोट
11
भाजपच्या सभेत मिथुन चक्रवर्तींचे पाकिट चोरले; स्थानिक नेत्यांची चोराला अपील, व्हिडिओ व्हायरल
12
"५ वर्षापूर्वी अमित शाह, शरद पवार अन् गौतम अदानी..."; अजित पवारांचा गौप्यस्फोट
13
“उद्धव ठाकरेंच्या बॅगेत असे काय आहे? एवढी आगपाखड करायचे कारण काय?”; शिंदे गटाने डिवचले
14
"समजूत काढायला गेले अन् तिथेच बसले"; येवल्यात भुजबळांवर शरद पवारांचा हल्लाबोल
15
Shocking! एक कार शेकडोंच्या गर्दीत घुसली; 35 जणांचा मृत्यू, ४३ जखमी, ड्रायव्हर कोमात
16
डोनाल्ड ट्रम्प यांनी कुणाला बनवलं NSA? नाव जाणून पाकिस्तानलाही धढकी भरेल; भारतासाठी आहेत खास!
17
किरकोळ महागाई RBI च्या हाताबाहेर गेली; रेपो रेटमध्ये कपात होणे शक्य नाही?
18
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : मुख्यमंत्रिपदावरुन महाविकास आघाडीमध्ये वाद? उद्धव ठाकरेंनी एका शब्दात विषयच संपवला
19
महाराष्ट्रातील निवडणुकीसाठी काँग्रेसचा 'मेगा प्लॅन'! पुढच्या ६ दिवसांत काय करणार? २ गोष्टींवर असेल सर्वधिक फोकस
20
“मविआ सत्तेत आल्यास शेतकरी कर्जमाफी, महिलांना खटाखट ३ हजार देऊ”; राहुल गांधींची गॅरंटी

भाजपाचे लोढा सर्वात श्रीमंत, तर मंत्री बावनकुळे गरीब!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2018 5:24 AM

आमदारांचे वार्षिक सरासरी उत्पन्न ४३ लाख: लक्ष्मीशी सरस्वतीचे दूरचे नाते

मुंबई : गेल्या निवडणुकीत महाराष्ट्र विधानसभेवर निवडून गेलेल्या आमदारांचे स्वघोषित सरासरी वार्षिक उत्पन्न प्रत्येकी ४३.४ लाख रुपये एवढे आहे. देशाचा विचार केला आमदारांचे सरासरी वार्षिक उत्पन्न २४.४९ लाख रुपये आहे. भाजपाचे आ. मंगलप्रभात लोढा यांचे वार्षिक उत्पन्न सर्वाधिक म्हणजे ३३ कोटींवर असून, सर्वात कमी उत्पन्न असणाऱ्यांमध्ये भाजपाचे सुरेश खाडे (३८ हजार रुपये) तर ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे (६३ हजार रुपये) हे आहेत.महाराष्ट्रातील आमदार अन्य राज्यांच्या तुलनेत जवळपास दुप्पट श्रीमंत आहेत. महाराष्ट्रातील आमदारांचा श्रीमंतीमध्ये कर्नाटकखालोखाल क्रमांक लागतो. कर्नाटकमधील आमदारांचे वार्षिक सरासरी उत्पन्न १ कोटी ११ लाख रुपये आहे. देशभरातील ४,०८६ पैकी ३,१४५ विद्यमान आमदारांनी उमेदवारी अर्जांसोबत सादर केलेल्या स्वघोषित उत्पन्नाचे ‘नॅशनल इलेक्शन वॉच’ व ‘असोसिएशन फॉर डेमोक्रॅटिक रिफॉर्म््स’ यांनी विश्लेषण करून हा अहवाल प्रसिद्ध केला. महाराष्ट्रातील २८८ पैकी २५६ आमदारांचे मिळून एकूण उत्पन्न १११.१५ कोटी रुपये आहे. यावरून प्रत्येक आमदाराचे सरकारी वार्षिक उत्पन्न ४३.४ लाख रुपये येते. यात आमदाराच्या पत्नी/ पतीचे वा कुटुंबातील अन्य सदस्यांचे उत्पन्न धरलेले नाही. देशातील ९४१ आमदारांनी उत्पन्नाची माहिती जाहीर न केल्याने या विश्लेषणात ती यात नाही. महाराष्ट्रातील २५ आमदारांनी उत्पन्न जाहीर केले नसून, त्यापैकी १३ भाजपाचे आहेत. काँग्रेस व राष्ट्रवादीचे प्रत्येकी चार असून, इतर पक्षांचे पाच आहेत.देशातील श्रीमंत २० आमदारांमध्ये महाराष्ट्रातील चारक्रमांक २- मंगलप्रभात लोढा मलबार हिल, भाजपा. उत्पन्न :३३.२४ कोटी रु. व्यवसाय : नोकरीक्रमांक ६- दिलीप गंगाधर सोपल बाशी, राष्ट्रवादी. उत्पन्न : ९.८५ कोटी रु. व्यवसाय : वकिली, शेतीक्रमांक १७- प्रशांत ठाकूर, पनवेल, भाजपा. उत्पन्न : ५.४१ कोटी व्यवसाय : शेती व यंत्रसामुग्री भाड्याने देणेक्रमांक २०- पृथ्वीराज चव्हाण, कराड (दक्षिण). काँग्रेस. उत्पन्न: ४.३४ कोटी रु. व्यवसाय : शेतीशिक्षण व उत्पन्नाचे व्यस्त गुणोत्तरअशिक्षित : सरासरी उत्पन्न ९.३१ लाख रु.पाचवी ते १२ वी पास : सरासरी उत्पन्न ३१.३ लाखआठवी पास : सरासरी उत्पन्न ८९.८८ लाखपदवीधर वा अधिक : सरासरी उत्पन्न २०.८७ लाख

टॅग्स :Chandrasekhar Bavankuleचंद्रशेखर बावनकुळेMangalprabhat Lodhaमंगलप्रभात लोढाPrithviraj Chavanपृथ्वीराज चव्हाणcongressकाँग्रेसBJPभाजपा