भाजप सर्वांत भ्रष्ट पक्ष : पृथ्वीराज चव्हाण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 3, 2018 09:29 PM2018-05-03T21:29:18+5:302018-05-03T21:29:18+5:30

सांगली : स्वच्छ प्रतिमेचे ढोंग करीत भाजपने देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या भ्रष्ट कारभाराची नोंद केली आहे. देशातील सर्वांत भ्रष्ट पक्ष म्हणून आता भाजपची ओळख होऊ लागली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री

BJP's most corrupt party: Prithviraj Chavan | भाजप सर्वांत भ्रष्ट पक्ष : पृथ्वीराज चव्हाण

भाजप सर्वांत भ्रष्ट पक्ष : पृथ्वीराज चव्हाण

Next
ठळक मुद्देसांगलीत काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरात टीकास्त्र

सांगली : स्वच्छ प्रतिमेचे ढोंग करीत भाजपने देशाच्या इतिहासातील सर्वांत मोठ्या भ्रष्ट कारभाराची नोंद केली आहे. देशातील सर्वांत भ्रष्ट पक्ष म्हणून आता भाजपची ओळख होऊ लागली आहे, अशी टीका माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी बुधवारी सांगलीतील काँग्रेसच्या कार्यकर्ता शिबिरात केली.
कोल्हापूर रोडवरील आचार्य आदिसागर सांस्कृतिक सभागृहात काँग्रेसचे कार्यकर्ता शिबिर पार पडले. यावेळी पक्षाचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण, विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील, महाराष्ट्राचे प्रभारी मोहन प्रकाश, माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील, माजी मंत्री हर्षवर्धन पाटील, माजी खासदार भालचंद्र मुणगेकर, ज्येष्ठ पत्रकार मधुकर भावे, शरद रणपिसे, युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष विश्वजित कदम, महिला आघाडीच्या प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील, जयश्रीताई पाटील, सत्यजित देशमुख, आदी प्रमुख नेते उपस्थित होते.
पृथ्वीराज चव्हाण म्हणाले की, जर्मन सरकारने त्यांच्याकडील बँकांमधील भारतीय गुंतवणूकदारांची यादी सरकारला दिली होती. त्या यादीचे सरकारने काय केले? पनामा पेपर्सने विदेशात काळा पैसा ठेवणाऱ्या जगातील मोठ्या लोकांची नावे जाहीर केली. याच यादीचा आधार घेत पाकिस्तानमध्ये नवाज शरीफ यांच्यावर कारवाई केली; मात्र भाजप सरकारने ही यादीच सोयीस्करपणे बाजूला केली. त्यानंतर पॅराडाईज पेपर्सच्या माध्यमातून अशाच नावांची आणखी एक यादी प्रसिद्ध झाली. त्यावरही भाजपने मौन बाळगले. फ्रान्सकडून राफेल विमान खरेदीचा निर्णय पूर्वी काँग्रेसने घेतला होता. त्याची किंमत साडेसहाशे कोटी रुपये होती. भाजप सत्तेवर आल्यानंतरच लगेचच त्यांनी याच विमान खरेदीसाठी प्रयत्न चालविले आणि त्यांनी ही विमान खरेदी तिप्पट दराने म्हणजेच १७२५ कोटी रुपये दराने केली. या घोटाळ्याबाबत वारंवार काँग्रेसने आवाज उठविला. तरीही भाजप याविषयी अवाक्षरही काढण्यास तयार नाही. मोहन प्रकाश म्हणाले, इंदिरा गांधींनी बँकिंग व्यवस्था मजबूत केली. मात्र, मोदी सरकारच्या काळात बँकेत भ्रष्टाचार करून उद्योजक देश सोडून पळून जात आहेत.

, तर दुसरीकडे शेतकरी आत्महत्या करत आहेत.
हर्षवर्धन पाटील म्हणाले, भाजपच्या नेत्यांना भविष्यातील परिणामांचे संकेत मिळाले आहेत. त्यामुळेच मुख्यमंत्रीसुद्धा ताळतंत्र सोडून टीका करीत सुटले आहेत.

पक्षापेक्षा कोणी मोठे समजू नये!
पृथ्वीराज पाटील म्हणाले, सांगली जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला होता. मात्र, याच बालेकिल्ल्यातील सध्याची स्थिती चांगली नाही. जिल्हा पुन्हा कॉँग्रेसचा बालेकिल्ला बनवायचा असेल तर गटबाजीची कीड बाजूला केली पाहिजे. गुणवत्तेवर आधारित उमेदवारीचा नांदेड फॉर्म्युला राबविला तरच मोठे यश मिळेल. त्यामुळे पक्षापेक्षा कुणी स्वत:ला मोठे समजू नये.
भावे असूनही कॉँग्रेसकडे!
मधुकर भावे म्हणाले की, काही महिन्यांपूर्वी माझी भेट नितीन गडकरी यांच्याशी झाली. त्यांनी मला अजब प्रश्न केला. ‘तुम्ही भावे असूनही भाजपच्या विरोधात कसे बोलता?’ या त्यांच्या प्रश्नावर मी त्यांना योग्य ते उत्तर दिले. देशात कॉँग्रेससारखी विचारधारा मोडीत निघाली तर जाती-धर्मात युद्ध होऊन देशाचे तुकडे पडतील. त्यामुळे यापुढे ‘भाजपला अडवा, भाजपची जिरवा’ हा मंत्र घेऊन सर्वांनी वाटचाल करावी.

Web Title: BJP's most corrupt party: Prithviraj Chavan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.