शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: कोल्हापूर उत्तरमधील काँग्रेसचा उमेदवार ठरला; सतेज पाटलांसमोर शाहू महाराजांची घोषणा
2
IPL २०२५ च्या मेगा लिलावाचे शहर ठरले; या तारखांना सौदीत २०४ खेळाडू निवडले जाणार
3
Uddhav Thackeray: शिंदेंना वाटले तर चिन्ह द्या, पण शिवसेना माझीच राहणार; उद्धव ठाकरेंचे मोठे वक्तव्य
4
मावळात राज ठाकरेंनी मोठा निर्णय घेतला; अजित पवार गटाच्या बंडखोर उमेदवाराला पाठिंबा जाहीर
5
गुजरातच्या आणंदमध्ये बुलेट ट्रेनचा पूल कोसळला; दोन मजुरांचा मृत्यू, एक जखमी
6
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : "महायुतीची लाडकी बहीण योजना तात्पुरती, आम्ही योजना कायम ठेवणार"; विश्वजीत कदमांचा विरोधकांवर हल्लाबोल
7
महाराष्ट्रापूर्वी झारखंडमध्ये इंडिया आघाडीचा जाहीरनामा; ७ गॅरंटी, महिलांना पैसे देणार
8
पॅरिस ऑलिम्पिकमध्ये महिला बॉक्सरकडून फसवणूक; गोल्ड जिंकलं पण पुरुष असल्याचे उघड झालं
9
कोल्हापूर उत्तरमधून अपक्ष उमेदवार राजेश लाटकर अर्ज मागे घेणार होते, तितक्यात...
10
महाराष्ट्रात कुठे कोणाची ताकद? मुंबई, विदर्भ, मराठवाड्याचे राजकीय समीकरण काय? पाहा...
11
शाहू महाराज खासदारकीचा राजीनामा देणार? सतेज पाटलांनी अपमान केल्याच्या अफवांवर छत्रपतींचे निवेदन...
12
उत्तर महाराष्ट्रातील ११ मतदारसंघात काट्याची लढत; कुठे कुठे बंडखोरांचं आव्हान?
13
ओडिशात धावत्या ट्रेनवर गोळीबार; प्रवाशांमध्ये प्रचंड घबराट, पाहा व्हिडिओ
14
"...तर हार्ट द्या!"; राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीला सुरुवात होताच चर्चेत आली इवांका; काय घडलं?
15
Maharashtra Election: राजघराण्यातील तीन व्यक्ती पहिल्यांदाच निवडणुकीच्या रिंगणात आमने-सामने
16
देशातील अशी 'ही' १४ गावं; जिथले ५००० मतदार महाराष्ट्र अन् तेलंगणातही करतात मतदान
17
धक्कादायक! तांत्रिकाच्या सांगण्यावरून संपूर्ण कुटुंब उद्ध्वस्त; वाराणसीत चार जणांच्या हत्येनंतर आत्महत्या
18
राहुल गांधी उद्या महाराष्ट्रात; काँग्रेस विधानसभा प्रचाराचे रणशिंग फुंकणार, मविआच्या सभा
19
भयंकर! यूट्यूबवर Video पाहून गर्भवती महिलेचं केलं ऑपरेशन; महिलेचा मृत्यू होताच डॉक्टर फरार
20
मधुरिमाराजेंनी अर्ज घेतला मागे; संभाजीराजे म्हणाले, "तसं घडायला नको होतं, पण..."

संघाच्या पावलावर भाजपाचे पाऊल, पूर्णकालीन विस्तारकांची नेमणूक 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 28, 2017 12:02 AM

घरदार सोडून संघटनेसाठी पूर्णवेळ झोकून देणा-या प्रचारकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा सर्वदूर प्रसार झाला. संघाच्या या प्रणालीचा आता भारतीय जनता पक्षानेदेखील अवलंब केला

नागपूर : घरदार सोडून संघटनेसाठी पूर्णवेळ झोकून देणा-या प्रचारकांमुळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्याचा सर्वदूर प्रसार झाला. संघाच्या या प्रणालीचा आता भारतीय जनता पक्षानेदेखील अवलंब केला असून विधानसभा क्षेत्रनिहाय पूर्णकालीन विस्तारकांची नेमणूक केली आहे. पक्षाचा प्रचार-प्रसार प्रभावी पद्धतीने करण्याची त्यांच्याकडे जबाबदारी राहणार असून राज्यभरात हे मॉडेल राबविण्यात येणार आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली.

गेल्या लोकसभा व विधानसभा निवडणूकांमध्ये भाजपाला एकहाती यश मिळाले होते. राज्यातील अनेक महानगरपालिका निवडणूकांत तर पक्षाला रेकॉर्ड यश मिळाले. मात्र तरीदेखील पक्षाने कुठलाही धोका न पत्करता संघटनात्मक बांधणी व जनसंपर्कावर भर देण्याचा संकल्प केला आहे. याअंतर्गतच २ जूनपासून नागपुरात ह्यबूथ विस्तारकह्ण योजनेची सुरुवात झाली. राज्यात इतरही ठिकाणी ही योजना राबविण्यात आली. एकट्या नागपुरात या माध्यमातून १९०० बूथवर थेट गृहसंपर्क अभियान राबविण्यात आले.

मात्र राष्ट्रीय अध्यक्ष अमित शाह यांच्या सूचनेनुसार पक्षाने यापुढे जात आता पूर्णकालीन विस्तारकांची नेमणूक केली आहे. विधानसभा क्षेत्रनिहाय ही नियुक्ती आहे, अशी माहिती सूत्रांनी दिली. मुंबईत यासंदर्भात सखोल बैठकदेखील झाली. या बैठकीला महाराष्ट्रासह पश्चिम क्षेत्रातील पाच राज्यांतील पदाधिकारी उपस्थित होते. भाजपाचे राष्ट्रीय संघटनमंत्री रामलाल, सहसंघटनमंत्री शिवप्रकाश, व्ही सतीश, विनय सहस्रबुद्धे याला प्रामुख्याने उपस्थित होते. राज्य सरचिटणीस रामदास आंबटकर यांच्याकडे राज्य संयोजक म्हणून जबाबदारी देण्यात आली आहे. विस्तारक योजनेचे विदर्भ संयोजक म्हणून देवेंद्र दस्तुरे हे काम पाहतील.भाजपाचे विदर्भावर विशेष लक्षयासंदर्भात विदर्भ संयोजक देवेंद्र दस्तुरे यांच्याशी संपर्क केला असता त्यांनी या वृत्ताला दुजोरा दिला. राज्याचे सात विभाग करण्यात आले असून विदर्भाचा एक संपूर्ण विभाग आहे. विदर्भात पक्ष संघटना आणखी मजबूत करण्याचा पक्षाचा मानस आहे. सद्यस्थितीत विस्तारकांची नेमणूक सहा महिने ते एक वर्षापर्यंत करण्यात आली आहे. विदर्भाचे संघटनमंत्री डॉ.उपेंद्र कोठेकर यांच्या मार्गदर्शनात विस्तारकांच्या कामावर लक्ष राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. नागपुरात सहा विस्तारकांची नेमणूक झाल्याचेदेखील त्यांनी स्पष्ट केले. दरम्यान, राज्यातील कार्यप्रणालीसंदर्भात रामदास आंबटकर यांच्याशी संपर्क होऊ शकला नाही.वेळोवेळी पाठवावा लागणार अहवालपूर्णकालीन विस्तारकांवर पक्षाच्या प्रचार-प्रसाराची जबाबदारी राहणार आहे. पक्षातील पदाधिकारी, कार्यकतर््ीे यांच्याकडून विधानसभा क्षेत्रात विविध प्रचार-प्रसार योजना राबविणे, शासनाची कामे-योजना तसेच पक्षाची भूमिका जनतेपर्यंत पोहोचविणे आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे पक्षसंघटनेचा आणखी विस्तार करणे ही जबाबदारी या विस्तारकांवर राहणार आहे. वेळोवेळी विस्तारकांना वरिष्ठ पातळीवर कार्यअहवाल पाठवावा लागणार आहे

टॅग्स :BJPभाजपाRSSराष्ट्रीय स्वयंसेवक संघ