हिंगोली : जिल्हा परिषदेत अनपेक्षितपणे भाजपाने मुसंडी मारली असून वसमत तालुक्यात या पक्षाने घवघवीत यश मिळविले आहे. तर आघाडी करूनही काँग्रेस-राष्ट्रवादी बहुमतापासून दूर राहिली. आता अपक्षांच्या हाती सत्तेची चावी राहणार आहे.काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीचे संख्याबळ २0 वरून २४ वर गेले आहे. तर सेना २७ वरून १५ वर आली. भाजपाने शून्यावरून १0पर्यंतचा आकडा गाठला. शिवसेनेला नेत्यांतील बेबनाव भोवला. वसमत तालुक्यात तर सेनेचे आ.जयप्रकाश मुंदडा यांना मतदार व कार्यकर्त्यांनी चांगलाच हिसका दाखविला. जि.प.ची एकही जागा नाही अन् पं.स.ची सत्ता गमावली. वसमतला भाजपाने शिवाजी जाधव यांच्या नेतृत्वात पं.स. ताब्यात घेत सहा जागा आणल्या. कळमनुरीत माजी आ.गजानन घुगे यांची नाराजी भोवली. त्यामुळे काँग्रेसचे संख्याबळ वाढले. हिंगोली विधानसभेतही आघाडीच्या नेत्यांतील बेबनावाचा फटका उमेदवारांना बसला. तरीही काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेतृत्वहीन उमेदवारांनी बरी झुंज दिली. हिंगोली पंचायत समिती काँग्रेस-राकाँकडून सेना-भाजपाने हिसकावून घेतली. औंढा पं.स.त १२ जागा जिंकून सेनेने वर्चस्व राखले. सेनगाव पं.स.त काँग्रेस-राष्ट्रवादीे १0 जागा जिंकून सत्तेसमीप आहे. आघाडीचे नेते खा.राजीव सातव, आ.संतोष टारफे, आ.रामराव वडकुते, माजी आ.जयप्रकाश दांडेगावकर यांचे प्रयत्न बहुमतासाठी अपुरे पडले. (प्रतिनिधी)हिंगोलीपक्षजागाभाजपा१0शिवसेना१५काँग्रेस१२राष्ट्रवादी१२इतर0३
भाजपाची मुसंडी, सेनेची पीछेहाट
By admin | Published: February 24, 2017 4:50 AM