शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL Auction 2025: ७२ खेळाडूंना मिळाला खरेदीदार, ४६७ कोटींची उलाढाल! कोणता खेळाडू कुठल्या संघात? पाहा यादी
2
IPL Auction 2025: डेव्हिड वॉर्नर ते पियुष चावला... 'हे' खेळाडू राहिले UNSOLD! सर्वच संघांनी फिरवली पाठ
3
IPL Auction 2025: पहिल्या दिवसात ७२ खेळाडूंची विक्री, पाहा कोण ठरले Top 10 महागडे शिलेदार
4
TATA IPL Auction 2025 Live: ७२ खेळाडूंचं 'शॉपिंग'; ४६७.९५ कोटींची बोली... पहिल्या दिवशी भारतीय खेळाडूंचा बोलबाला
5
"प्रिय बंधु-भगिनींनो... सप्रेम नमस्कार..."! देवेंद्र फडणवीस यांचं जनतेला पत्र; सांगितले विजयाचे 4 'खरे शिल्पकार'
6
IPL Auction 2025 : RR च्या नाकावर टिच्चून MI नं खेळला मोठा डाव; ६२ धावांच्या 'त्या' इनिंगमुळे हा खेळाडू रात्रीत 'करोडपती'
7
IPL Auction 2025: तब्बल ५ तासांनी Mumbai Indians ने विकत घेतला पहिला खेळाडू, १२.५० कोटींना कोण आलं संघात?
8
'ज्यांनी मला त्रास दिला ते सगळे साफ झाले', अशोक चव्हाणांची थोरात-देशमुखांवर बोचरी टीका
9
IPL Auction 2025: मुंबई इंडियन्सने सोडलेला जोफ्रा आर्चर अखेर राजस्थान रॉयल्समध्ये गेला, किती मिळाली किंमत?
10
शिवसेना मुख्यमंत्री पदावर अडीच वर्षासाठी दावा करणार? केसरकर स्पष्टच बोलले...!
11
'तरुण नेतृत्व उभारणार, घरी बसणार नाही', पराभवानंतर शरद पवार नव्या जोमाने कामाला लागले
12
"सर्वेक्षण करा, जी ज्याची जागा असेल त्याला देऊन टाका..."; संभल जामा मशीद प्रकरणावर काय म्हणाले राकेश टिकैत?
13
IPL Auction 2025 : MI नं दिला नाही भाव; Ishan Kishan साठी काव्या मारन यांनी लावली एवढ्या कोटींची बोली
14
IPL Auction 2025 : बिग सरप्राइज! SRK च्या KKR नं रिलीज केलेल्या खेळाडूसाठी मोजली मोठी किंमत, अनेकांच्या भुवया उंचावणारी बोली
15
IPL Auction 2025: 'अनुभवी' अश्विनसाठी दोन जुने संघ भिडले, अखेर CSK ने RR ला दिली मात, कितीला विकत घेतलं?
16
IPL Auction 2025: Gujarat Titans ची शांतीत क्रांती! ३ मॅचविनर खेळाडूंना 'गपचूप' घेतलं ताफ्यात, पाहा कोण?
17
"योगी आदित्यनाथांच्या 'त्या' घोषणेमुळे...";'बटेंगे तो कटेंगे'वर शरद पवारांचे महत्त्वाचे विधान
18
"...त्यामुळे महिलांनी आमच्या विरोधात मतदान केलं"; निकालानंतर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया
19
IPL 2025 Auction : १८ कोटींच पॅकेज नाकरणाऱ्या KL Rahul साठी DC नं किती कोटी मोजले ?

भाजपाच्या प्रकल्पाला सेनेचा खो

By admin | Published: July 15, 2017 2:04 AM

शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करून भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुंग लावण्याचे मनसुबे आखले आहेत.

लोकमत न्यूज नेटवर्कमुंबई : मुंबईच्या विकासाचा आराखडा मंजुरीसाठी शेवटच्या टप्प्यात असताना शिवसेनेने आपली भूमिका जाहीर करून भाजपाच्या महत्त्वाकांक्षी प्रकल्पाला सुरुंग लावण्याचे मनसुबे आखले आहेत. मुंबईतील उद्याने, क्रीडांगणे आणि मनोरंजन मैदाने यांना नवीन विकास आराखड्यात धक्का लागू देणार नाही, तर आरे कॉलनीतील मेट्रोसाठीच्या आरक्षणाला विरोध दर्शविण्यात आला आहे. त्यामुळे शिवसेना व भाजपामध्ये पुन्हा एकदा जुंपणार आहे.२०१४-२०३४ या २० वर्षांचा मुंबईचा विकास आराखडा पालिका महासभेमध्ये लवकरच मंजूर होणार आहे. या मंजुरीनंतर राज्य सरकारच्या नगरविकास खात्याकडे आराखड्याचा मसुदा पाठवण्यात येणार आहे. राज्य सरकारच्या मंजुरीनंतर याची अंमलबजावणी महापालिकेच्या माध्यमातून केली जाणार आहे. त्यामुळे महापौर महाडेश्वर यांनी शुक्रवारी तातडीने पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेची भूमिका जाहीर केली. औद्योगिकीकरण आणि लोकसंख्येमुळे आधीच मुंबईकरांचा श्वास कोंडत असताना त्यांच्यावर आणखी अन्याय होऊ देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले. मुंबईतील मोकळ्या जागा, खेळाची मैदाने, उद्याने ही मुंबईकरांची फुप्फुसे आहेत. ती वाचली पाहिजेत. शिवसेनेची बांधिलकी ही मुंबईकरांशी आहे. त्यामुळे त्यांच्या हिताबाबत कोणतीही तडजोड शिवसेना करणार नाही, असा भाजपाला त्यांनी अप्रत्यक्ष इशारा दिला आहे. यासंदर्भात इतर पक्षांतील नगरसेवकांकडून अर्ज येण्याची शक्यता असल्याचे भाजपाचे नाव न घेता महापौरांनी सूचित केले. यामुळेच शिवसेनेने प्रथम भूमिका मांडल्याचे त्यांनी सांगितले.>आरे कारशेडचा वाद कायमगोरेगाव पूर्व येथील आरे कॉलनीमध्ये प्रस्तावित मेट्रो कारशेडबाबत शिवसेना कोणतीही तडजोड करणार नाही. मेट्रो कारशेडचा प्रस्ताव सुधार समिती आणि सभागृहातही नामंजूर केल्याचे निदर्शनास आणत भाजपाला एकप्रकारे शिवसेनेने आव्हानच दिले आहे.>मेट्रो कारशेडचा प्रस्ताव रखडलाकुलाबा-वांद्रे-सीप्झ या मेट्रो तीन प्रकल्पाच्या कारशेडसाठी आठ जागांमधून आरे वसाहतीची निवड करण्यात आली. त्यानुसार गोरेगाव पूर्व येथील आरे वसाहतीतील प्रजापूर आणि वेरावली येथील ३३ हेक्टर्स भूखंड निश्चित करण्यात आला आहे.तसेच प्रस्तावित विकास आराखड्यात या भूखंडावर कारशेडचे आरक्षण सुचविण्यात आले. मात्र आराखडा रखडल्यामुळे मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनने मागणी करताच या भूखंडाला ना विकास क्षेत्रातून वगळण्यासाठी भाजपाची धावपळ सुरू झाली. पालिका निवडणुकीच्या काळात वचननाम्यात या प्रकल्पाचे आश्वासन भाजपाने मुंबईकरांना दिले आहे.त्यामुळे हा भाजपाचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प लवकरात लवकर साकार करण्याचे आव्हान भाजपा नेत्यांसमोर आहे. मात्र आरे कॉलनीतील जागा मेट्रो प्रकल्प तीनच्या कारशेडसाठी सोडण्यास सेनेचा विरोध आहे. हा प्रस्ताव पुन्हा नामंजूर झाल्याने नियमांनुसार आता तीन महिन्यांनंतरच हा विषय प्रशासन पटलावर आणू शकेल. यामुळे मेट्रो प्रकल्पाला आणखी विलंब होण्याची चिन्हे आहेत.पालिका निवडणुकीच्या काळात वचननाम्यात या प्रकल्पाचे आश्वासन भाजपाने मुंबईकरांना दिले आहे.>परवडणारी घरे परवडतील काय?मिठागरांवरील जमिनीवर आरक्षणे टाकून तेथे गरिबांसाठी ‘परवडणारी’ घरे उपलब्ध करून देण्याचे प्रशासनाने जाहीर केले होते. परवडणारी घरे ही नेमकी संकल्पना काय आहे, हे पाहावे लागेल. घरे बांधल्यानंतर त्याची किंमत जर सर्वसामान्यांच्या आवाक्याबाहेरची असेल तर या योजनेचा उपयोग होणार नाही, असे मत महाडेश्वर यांनी व्यक्त केले.