शहरं
Join us  
Trending Stories
1
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
2
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
3
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
4
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
5
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
6
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
7
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
8
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
9
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
10
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
11
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
12
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
13
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
14
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
15
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
16
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी
17
६ लाख मोबाईल फोन बंद, ६५ हजार URLs ब्लॉक... सायबर फ्रॉड रोखण्यासाठी सरकारची मोठी कारवाई
18
जयंत पाटलांचं अजित पवारांना नवं चॅलेंज; "मोदींकडून एवढं काम करून घेतलं, तर..."
19
जोगेश्वरी पूर्व विधानसभा मतदारसंघावरून शिवसेना शिंदे गट आणि भाजपात रस्सीखेच
20
"आम्हा तिघांनाही CM व्हायचंय, पण निर्णय हायकमांडचा", रणदीप सुरजेवालांनी केले मोठे वक्तव्य

भाजपाचे साई शेलार बिनविरोध

By admin | Published: April 06, 2017 3:54 AM

केडीएमसीच्या कांचनगाव-खंबाळपाडा प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेले चारही अर्ज बुधवारच्या छाननी प्रक्रियेत वैध ठरले.

डोंबिवली : केडीएमसीच्या कांचनगाव-खंबाळपाडा प्रभागात होणाऱ्या पोटनिवडणुकीसाठी दाखल झालेले चारही अर्ज बुधवारच्या छाननी प्रक्रियेत वैध ठरले. डमी अर्ज दाखल केलेले सिद्धार्थ शेलार यांनी माघार घेतली. त्यामुळे भाजपाचे अधिकृत उमेदवार स्नेहल ऊर्फ साई शेलार यांची निवडणुकीपूर्वीच बिनविरोध निवड झाली. त्यामुळे १९ एप्रिलची निवडणूक टळली आहे. निवडणूक आयोगाच्या मान्यतेनंतरच साई यांच्या बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा होणार आहे.कांचनगाव-खंबाळपाडाचे भाजपाचे नगरसेवक शिवाजी शेलार यांचे निधन झाल्याने त्यांच्या प्रभागात पोटनिवडणूक जाहीर झाली होती. या निवडणुकीसाठी शिवाजी यांचे सुपुत्र स्नेहल ऊर्फ साई शेलार यांना भाजपाने उमेदवारी दिली. रविवारी साई यांनी, तर सोमवारी त्यांचे बंधू सिद्धार्थ यांनीही डमी म्हणून उमेदवारी अर्ज भरला होता. त्यांनी प्रत्येकी दोन अर्ज भरले होते. बुधवारी चारही अर्जांची छाननी झाली. त्यात ते सर्व अर्ज वैध ठरले. त्यानंतर, सिद्धार्थ यांनी त्यांचा उमेदवारी अर्ज मागे घेतला. शुक्रवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा अंतिम दिवस होता. परंतु, तत्पूर्वी सिद्धार्थ यांनी अर्ज मागे घेतल्याने साई यांची बिनविरोध निवड झाली.दरम्यान, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने निवडणूक न लढवण्याचा निर्णय घेतल्याने साई यांचा बिनविरोध निवडून येण्याचा मार्ग सुकर झाला होता. (प्रतिनिधी)आयोगाच्या मान्यतेनंतर अधिकृत घोषणाशुक्रवारनंतर याबाबतचा अहवाल निवडणूक निर्णय अधिकारी देविदास टेकाळे यांच्याकडून निवडणूक आयोगाला पाठवला जाईल. त्यांच्या मान्यतेनंतरच बिनविरोध निवडीची अधिकृत घोषणा केली जाणार आहे.