शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलसोबत युद्ध सुरू असतानाच इराणचं मोठं विधान; म्हणाला- नेतन्याहू या शतकातील 'नवा हिटलर, तर भारत..."
2
“भाजपाने आधीच हार मानली, २०२४ च्या विधानसभेला मविआचेच सरकार येणार”; नाना पटोलेंचा दावा
3
शरद पवार शिंदे गटाला धक्का देणार! तानाजी सावंतांचे पुतणे अनिल सावंत राष्ट्रवादीत प्रवेश करणार
4
विरुष्काचे अनोखे 'क्रिकेट'! अनुष्काने वाचला नियमांचा पाढा; विराटने डोक्यालाच हात लावला
5
इस्त्रायलचे 'ते' ३ मित्र जे संकटात बनतात सुरक्षा कवच; ज्यांनी इराण हल्ल्यातून वाचवले
6
IPO News : आयपीओंचा महापूर येणार, एकाच दिवसात १३ कंपन्यांनी सेबीकडे केले अर्ज
7
बिहार : हवाई दलाचे हेलिकॉप्टर पुराच्या पाण्यात पडले; अंगावर काटा आणणारे दृश्य, पूरस्थिती कायम
8
Mohammad Shami, Team India, IND vs AUS: टीम इंडियाला मोठा धक्का! मोहम्मद शमी रूग्णालयात, ६ ते ८ आठवड्यांसाठी सक्तीची विश्रांती
9
काही लोक गांधीजींचा विचार विसरले, फक्त त्यांच्या नावाने मते घेतली; मोदींचा टोला
10
खळबळजनक! नागपूर जिल्ह्यात कुटुंबाची सामूहिक आत्महत्या; पती-पत्नीसह दोन मुलांनी घेतला गळफास
11
अरे बापरे! 2000 कोटींचे ड्रग्ज जप्त, दिल्लीत चार जणांना अटक
12
५० वर्षानंतर अमेरिकेत पहिल्यांदाच 'असं' काय घडलं?; चीन-पाकिस्तानही चिंताग्रस्त
13
अरे बापरे! लोकांच्या डोळ्यातून येतंय रक्त; खतरनाक इबोलासारखा जीवघेणा आहे 'हा' व्हायरस
14
लाडक्या बहि‍णींची दिवाळी; भाऊबीजेची ओवाळणी ऑक्टोबरलाच, सरकार नोव्हेंबरचे पैसे आधीच देणार
15
प्रशांत किशोर : UN मध्ये ८ वर्षे नोकरी, निवडणूक रणनीतीकार ते राजकीय पक्ष... आठ पक्षांसोबत केलंय काम!
16
56 वर्षांनंतर सापडला हवाई दलातील शहीद जवानाचा मृतदेह; 23व्या वर्षी आलेले हौतात्म्य
17
"हानिया अन् हसन नसरल्लाह...", इस्रायलवरील मिसाइल हल्ल्यानंतर काय म्हणाला इराण?
18
Numerology: ‘या’ ७ मूलांकांवर देवीची कृपा, सुख-समृद्धीचा लाभ; कामात यश, अचानक धनलाभ!
19
भयानक! रोलर कोस्टरवरची मजा बेतली जीवावर; ५ वर्षांच्या मुलाला आला कार्डिएक अरेस्ट
20
सणासुदीत विना टेन्शन खरेदी करू शकाल इलेक्ट्रिक गाड्या, सरकारनं सुरू केली नवी सब्सिडी स्कीम

राज्यात भाजपची दुहेरी रणनीती; चार नव्या केंद्रीय मंत्र्यांवर सोपवली मोठी जबाबदारी

By ऑनलाइन लोकमत | Published: August 14, 2021 9:42 AM

भाजपच्या नव्या केंद्रीय मंत्र्यांची १६ पासून जनआशीर्वाद यात्रा

मुंबई: केंद्रात नव्याने मंत्री झालेल्या महाराष्ट्रातील चार नेते १६ ऑगस्टपासून राज्याच्या विविध भागात जनआशीर्वाद यात्रा काढणार आहेत. केंद्र सरकारचे चांगले निर्णय जनतेपर्यंत पोहोचवितानाच राज्यातील आघाडी सरकारवर टीकास्र सोडणे, अशी या यात्रेची दुहेरी रणनीती असेल.प्रदेश भाजपचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी या यात्रेविषयी पत्र परिषदेत माहिती दिली. केंद्रीय लघु उद्योगमंत्री नारायण राणे, राज्यमंत्री डॉ. भारती पवार, डॉ. भागवत कराड आणि कपिल पाटील हे चार नवनियुक्त मंत्री जनआशीर्वाद यात्रेद्वारे जनतेशी संवाद साधणार आहेत. या यात्रेचे प्रमुख समन्वयक आमदार संजय केळकर असतील.कपिल पाटील यांची यात्रा १६ ते २० ऑगस्ट दरम्यान ठाणे व रायगड जिल्ह्यात ५७० किलोमीटरची यात्रा काढतील. याच काळात डॉ. भारती पवार या नाशिक, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात ४३१ किलोमीटरची यात्रा काढतील. डॉ. भागवत कराड मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खा. प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल. वसई- विरार महापालिका क्षेत्र आणि रत्नागिरी, सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही यात्रा २५ ऑगस्टपर्यंत ६५० किलोमीटरचा प्रवास करेल. या यात्रेत चारही मंत्री समाजाच्या विविध घटकांचे प्रश्न जाणून घेतील. तसेच केंद्र सरकारी योजनांच्या लाभार्थींशीही संवाद साधतील.भागवत कराड हे मराठवाड्यात ६२३ किलोमीटर यात्रा काढतील. पक्षाच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे व खासदार प्रीतम मुंडे प्रारंभाला सोबत असतील. नारायण राणे यांची यात्रा मुंबईतून १९ ऑगस्टला सुरू होईल. 

टॅग्स :Narayan Raneनारायण राणे Bhagwat Karadडॉ. भागवतKapil Patilकपिल मोरेश्वर पाटीलBJPभाजपा