नांदेड : विदेशात पळालेला नीरव मोदी आणि मेहुल चोकसी यांच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष विचलित करण्यासाठी भाजपाकडून सुडाचे राजकारण करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून कार्ती चिदंबरम यांना सकाळी विमानतळावर अटक करण्यात आली, परंतु भाजपाच्या अशा दबावतंत्रापुढे काँग्रेसचे नेते कधीही खचणार नाहीत, अशी प्रतिक्रिया माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष खा. अशोकराव चव्हाण यांनी व्यक्त केली.माजी अर्थमंत्री चिदंबरम यांनी सरकारच्या चुकीच्या निर्णयावर सातत्याने कठोर शब्दात टीका केली आहे़ याबाबत त्यांनी लेखणीद्वारेही सरकारच्या धोरणावर निर्भीडपणे मत मांडले आहे़ त्याचा भाजपाच्या नेत्यांमध्ये अनेक दिवसांपासून राग होता़ दुसरीकडे देशवासीयांचे हजारो कोटी रुपये घेऊन पळालेल्या नीरव मोदी याच्या प्रकरणावरून जनतेचे लक्ष वळण्यासाठी कार्ती यांच्यावर कारवाई करण्यात आली़ काँग्रेसचे नेते आणि त्यांच्या नातेवाइकांना वेगवेगळ्या प्रकरणात गुंतवून त्यांच्यावर कारवाई ही सूडबुद्धीने करण्याचा भाजपाचा उद्योग सुरू आहे़ चिदंबरम यांच्यावर केलेली कारवाई वरवर वाटत असली, तरी त्यामागे फार मोठे षड्यंत्र आहे, असेही ते म्हणाले़दबावाला बळी पडणार नाही-चिदंबरम यांच्यावर केलेली कारवाई वरवर वाटत असली, तरी त्यामागे फार मोठे षड्यंत्र आहे़, परंतु अशा कुठल्याही दबावाला काँग्रेसचे नेते बळी पडणार नाहीत, असेही चव्हाण म्हणाले़
भाजपाकडून सुडाचे राजकारण : अशोक चव्हाण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 01, 2018 3:14 AM