शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्रातील आठ लाख नोकऱ्या गुजरातला गेल्या; प्रियांका गांधींचा महायुतीवर हल्ला
2
प्रचाराच्या आसमंतात हेलिकॉप्टरची भिरभिर; निवडणुकीच्या हंगामात होणार ५५० कोटींची उलाढाल
3
बहिणींना पैसे देताय, पण त्यांच्या सुरक्षेचे काय?, शरद पवार यांचा सरकारला सवाल
4
एक तरी आयकॉनिक प्रोजेक्ट दाखवा; देवेंद्र फडणवीस यांचे ठाकरेंना आव्हान
5
अमेरिकेतील सरकारी नोकऱ्यांमध्ये होणार कपात, रामास्वामींकडून संकेत
6
...म्हणूनच ‘बटेंगे तो कटेंगे’ची घोषणा; केंद्रीय मंत्री पीयूष गोयल यांची भूमिका
7
काँग्रेसने प्रसिद्ध केला मुंबईकरांसाठी स्वतंत्र जाहीरनामा; हाउसिंग सोसायट्यांना ६ महिन्यांत देणार ओसी
8
मतांच्या ढिगाऱ्यात चंगू, मंगू बुडाले पाहिजे; मुख्यमंत्री शिंदे यांची राऊत बंधूंवर टीका
9
मुंबईत तब्बल आठ हजार किलो चांदीचे घबाड केले जप्त; निवडणूक आयोगाची कारवाई
10
"लोकसभेत गुडघ्यावर आणले, आता महायुतीस पाताळात गाडणार"; उद्धव ठाकरेंचा इशारा
11
"मला हलक्यात घेतलं, त्याचे परिणाम आता दिसतायत"; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा राऊतांना इशारा
12
"केंद्र बिंदूच्या बुडाला आग लावायची वेळ आली"; उद्धव ठाकरेंचा ठाण्यातून महायुतीवर घणाघात
13
भविष्यात दोन ठाकरे एकत्र येऊ शकतात का? मनसेसोबत युती होऊ शकते का...? उद्धव ठाकरे म्हणाले...
14
...म्हणून उद्धव ठाकरे यांनी थेट फोनद्वारे घेतली सभा; "नाराज होवू नका एकत्र येवून..."
15
२०१४ ला भाजपाला त्यांची खरी ताकद कळली, अन् त्यानंतर वाढतच गेली!.. जाणून घ्या काय घडलं?
16
"साईबाबांच्या आशीर्वादामुळे उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाले, अन्यथा..."; दीपक केसरकरांचा पलटवार
17
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 :'महाराष्ट्रात पैशाच्या जोरावर सरकार चोरले, तुम्ही संविधानाच्या गोष्टी करता'; प्रियांका गांधींचा हल्लाबोल
18
गावाकडे पण, इकडे शहरातपण यादीत नाव ...! राज्यातील दहा मतदारसंघात नवी मुंबईकरांची नावे
19
Champions Trophy Tour: पाकचा डाव फसला! BCCI च्या आक्षेपानंतर ICC नं सेट केला कार्यक्रम
20
मणिपूरमधील जिरीबाममध्ये तीन मृतदेह सापडले, मंत्री आणि आमदारांच्या निवासस्थानाबाहेर गोंधळ; संचारबंदी लागू

बेळगावात काळ्या दिनी एल्गार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2016 4:56 AM

बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी मंगळवारी बेळगाव शहर दणाणून गेले.

बेळगाव : बेळगावसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, अशा घोषणांनी मंगळवारी बेळगाव शहर दणाणून गेले. एक नोव्हेंबर या काळ्यादिनानिमित्त महाराष्ट्र एकीकरण समितीच्यावतीने मंगळवारी काढण्यात आलेल्या सायकल फेरीत पुन्हा एकदा मराठी अस्मितेचे दर्शन घडले.संपूर्ण सीमाभाग अन्यायाने कर्नाटकात सामील केल्याच्या निषेधार्थ मराठी भाषिक १ नोव्हेंबर हा दिवस ‘काळा दिवस’ म्हणून पाळतात. या निमित्ताने कर्नाटक शासन ‘राज्य उत्सव दिवस,’ तर मराठी भाषक ‘सूतक दिन’ म्हणून पाळतात. गेली दोन वर्षे काळ्यादिनाच्या सायकल फेरीस दांडी मारणाऱ्या मराठी भाषिक महापौर, उपमहापौरांनी यावर्षी मात्र सायकल फेरीस हजेरी लावली. सकाळी नऊला संभाजी उद्यानातून सायकल फेरीस सुरुवात झाली. नंतर बेळगाव उत्तर भागातील काही भाग, शहापूर भागातून पुढे मराठा मंदिरात रॅली विसर्जित करण्यात आली. बेळगावमध्ये काळ्यादिनानिमित्त काढण्यात आलेल्या सायकल फेरीच्या मार्गात ठिकठिकाणी कानडी आस्मितेचे लाल, पिवळे ध्वज लावल्याने अनेक ठिकाणी सायकल फेरी मार्गात तणावाचे वातावरण निर्माण झाले होते.लाल, पिवळा ध्वज पाहून घोषणाबाजी करणाऱ्या मराठी युवकांवर बेळगाव पोलिसांनी सौम्य लाठीमार केला.सोशल मीडियावरून जनजागृती आणि मराठा क्रांती मोर्चा यामुळे बेळगावातही ५० हजारांहून अधिक लोकांची झालेली गर्दी ऐतिहासिक ठरली. (प्रतिनिधी)