मंगरुळपीर : वाहनांच्या काचांना गडद काळी फिल्म लावण्यावर सर्वोच्च न्यायालयाने दीड वर्षांपूर्वी बंदी घातली असली तरी मंगरुळपीर शहरात मात्र काचेची पारदर्शकता तपासणारे कोणतेही ह्ययंत्रह्ण नसल्याची धक्कादायक माहिती समोर येत आहे. यंत्र नसल्याने आणि संबंधित यंत्रणा गाढ झोपी गेल्याने शहरामधून गडद काळी फिल्म लावलेली वाहने अजूनही सुपरफास्ट धावत आहेत. काळी फिल्म लावलेल्या बहुतांश गाड्या राजकीय मंडळी व वजनदार व्यक्तिंच्या असल्याने कशाला ह्यझंझटह्ण म्हणून संबंधित यंत्रणा कारवाई करण्याची जोखीम उचलत नसल्याचे चित्र आहे. वाहनांच्या काचांना काळय़ा गडद फिल्म लावून कोणतेही प्रकार घडू शकतात. चारचाकी वाहनांच्या काचांवर विविध प्रकारच्या फिल्म वापरल्यामुळे आतील व्यक्तींच्या हालचाली कळत नाहीत. अशा वाहनांतून आक्षेपार्ह वस्तूंची वाहतूक होण्याची शक्यता अधिक असते. या पार्श्वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने सात महिन्यांपुर्वी चारचाकी वाहनांवर काळय़ा फिल्मचा वापर करण्यावर बंदी घालून त्याऐवजी पारदर्शक फिल्मचा वापर करण्याचे आदेश दिले आहेत. या आदेशाची देशभरात अंमलबजावणीदेखील सुरु झाली आहे. या अंमलबजावणीतून मंगरुळपीर शहर सुटत असल्याचे रस्त्यांवर धावणार्या काळ्या काचांच्या वाहनांवरून स्पष्ट होते. काचेची पारदर्शकता तपासणारे यंत्र नसल्याने कारवाई करण्यात अडथळा येतो, असे संबंधित विभागाचे म्हणणे आहे. कायदा काय म्हणतो गाडीच्या आतील भागात काय आहे, हे स्पष्टपणे दिसण्यासाठी चारचाकी वाहनांच्या समोरील व मागील बाजूची काच ७0 टक्के तर दोन्ही बाजूच्या काचा ५0 टक्के पारदर्शक असाव्यात, असे मोटार वाहन कायदा सांगतो. कायद्याचे उल्लंघन करणार्यांवर दंडात्मक कारवाई करण्याचे अधिकार आरटीओ व वाहतूक पोलिसांना आहेत. फिल्मची पारदर्शकता तपासण्यासाठी लागणारे टिंट मीटर वाहतूक शाखा व आरटीओ विभागाकडे देण्याचे आदेश आहेत. मात्र, मंगरुळपीर येथे ह्यटिंट मीटरह्ण आले नाही. यामुळे डोळ्यानेच काचेची पारदर्शकता तपासण्याची वेळ आली आहे.
वाहनावरील काळी फिल्म उतरलीच नाही
By admin | Published: August 10, 2014 10:38 PM