मनीषा म्हात्रे, पूजा दामले , मुंबई मुंबईसारख्या शहरात नामवंत ब्रॅण्डेड सौंदर्यप्रसाधनांची ‘कॉपी’ करून त्या नावाखाली भेसळयुक्त दुय्यम सौंदर्यप्रसाधने स्वस्तात विकण्याचा धंदा तुफान तेजीत आहे. शहरातील विविध मार्केटमध्ये, रेल्वेत या बोगस सौंदर्य प्रसाधनांची विक्री सर्रास सुरू आहे. या धंद्यात अक्षरश: कोट्यवधींची उलाढाल होत आहे. सौंदर्यप्रसाधने विकण्यासाठी सध्याच्या घडीला कोणत्याही प्रकारची नोंदणी आवश्यक नाही. ब्रॅण्डेडच्या नावाखाली विकल्या जाणाऱ्या या काळ््याधंद्याचे धक्कादायक वास्तव ‘लोकमत’ने केलेल्या ‘स्टिंग आॅपरेशन’मधून उघड झाले. ‘लोकमतच्या प्रतिनिधींनी क्रॉफर्ड मार्केट, दादर रानडे रोड, वांद्रे लिंक रोड, मालाड पश्चिम आणि मुलुंड आरटीटी मार्केटमधील विक्रेत्यांशी संवाद साधला. त्यात हा सौंदर्यप्रसाधनांचा धंदा कसा चालतो? याविषयी धक्कादायक माहिती समोर आली. मुख्य म्हणजे गिऱ्हाईक फक्त एकदाच ‘बॅ्रण्ड’चे नाव पाहतो. आणि ‘कस्टमचा माल’ म्हणून मूळ किमतीपेक्षा कमीला माल मिळतो, असे म्हटल्यावर हुरळून जात खरेदी करतो. ‘कस्टमचा माल’ किंवा ‘ड्यूटी फ्री’ म्हणून विकल्या जाणाऱ्या रस्त्यावरच्या मालाचे वास्तव धंद्यापेक्षा भयावह आहे. विमान अथवा जहाजातून माल आल्यानंतर गोदामात साठवून ठेवला जातो. तिथून या मालाची चोरी केली जाते. या चोरीत पोलिसांचा, कस्टमच्या अधिकाऱ्यांचाही वाटा असतो. आणि हाच माल बाहेर आणून त्यात भेसळ करून ‘ब्रॅण्डेड’ माल म्हणून बाजारात थाटला जातो, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली. एका रात्रीत कंटेनर खाली करण्यासाठी पोलिसांना २५ ते ३० हजार रुपये मोजावे लागतात. तर, दुसरीकडे रस्त्यावर धंदा चालवण्यासाठी दरमहा विविध भागात ५ ते १५ हजार रुपये द्यावे लागतात. रस्त्यावर सौंदर्यप्रसाधने विकणाऱ्यांचा एक दिवसाचा धंदा हा ५ ते १५ हजार रुपये आहे.सौंदर्यप्रसाधने उत्पादन करण्याचा परवाना राज्यात सुमारे १ हजार जणांकडे आहे. मात्र, त्यापेक्षाही अधिक ठिकाणी परवान्याशिवाय बनावट सौंदर्यप्रसाधने बनवण्याचे छोटे कारखाने घरात, झोपड्यांमध्ये सुरू आहेत. असे आहे रेट कार्ड मॅबलिन काजळ मूळ किंमत : १९९ रुबोगस उत्पादन किंमत : १२०-१५० रु.५० काजळ घेतल्यास : ६० रु. लॅकमे आयकॉनिक मूळ किंमत : २१० रु. बोगस उत्पादन किंमत : १२० रु.५० काजळ घेतल्यास : ८० रु.
सौंदर्य प्रसाधनांचा ‘काळा’ बाजार
By admin | Published: April 06, 2016 5:21 AM