ऑनलाइन लोकमतऔरंगाबाद, दि. ५ : एक लाख रुपये दे, नाही तर आता आपले लग्नपूर्वी लफडे होते, हे तुझ्या नवऱ्यालाच सांगतोह्ण अशी धमकी देत एका तरुणीला ब्लॅकमेल करणाऱ्या मजनूविरुद्ध मुकुंदवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला.प्रवीण प्रभाकर कुलकर्णी (रा जैननगरी, पिसादेवी) असे आरोपीचे नाव आहे. घटनेबाबत माहिती देताना पोलिसांनी सांगितले की, आरोपी प्रवीणची काही महिन्यांपूर्वी मुकुंदवाडी परिसरात राहणाऱ्या एका २० वर्षीय तरुणीसोबत ओळख झाली. हळूहळू त्यांच्या ओळखीचे रुपांतर घट्ट मैत्रीत आणि नंतर प्रेमात झाले. दोघांमधील प्रेम चांगलेच बहरले. दोघांनीही सोबत जगण्यामरण्याच्या आणाभाकाही घेतल्या; परंतु अचानक त्यांच्या प्रेमाला ह्यब्रेकह्ण लागला. त्यानंतर तरुणीच्या घरच्यांनी तिच्यासाठी स्थळ पाहिले आणि नात्यातील एका तरुणासोबत २६ जानेवारी रोजी तिचा विवाहही लावून दिला. तिकडे धुमधडाक्यात लग्न झाल्यानंतर तरुणी सर्व काही विसरुन आपल्या संसारात रमली. गुण्यागोविंदाने ती नांदू लागली. इकडे प्रवीणच्या डोक्यात मात्र, वेगळेच विचार घोळू लागले. अखेर चक्क आपल्या प्रेमाचा व्यवहार करण्याचा निर्णय घेतला. फोन करून धमकाविलेप्रविणहा प्रेयसीच्या मागावरच होता. अखेर ती औरंगाबादला माहेरी आली आहे, हे त्याला समजले. मग त्याने तिच्या आईचा मोबाईल क्रमांक मिळविला आणि काल दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्याने ह्यत्याह्ण मोबाईलवर संपर्क साधला. योगायोगाने तो फोन तरुणीनेच उचलला. तिकडून प्रविणचा आवाज ऐकून तिला धक्काच बसला. त्याने फोनवर ह्यतू लग्न करून गेली. मला विसरली. आपले लग्नाआधीचे लफडे तुझ्या नवऱ्याला माहिती होऊ द्यायचे नसेल तर आता मला एक लाख रुपये दे, नाही तर आपल्या प्रेमसंबधाची माहिती तुझ्या नवऱ्याला सांगेल. तुझा संसार उध्वस्त करून टाकीलह्ण, अशी त्याने धमकी दिली. अखेर तरुणीने घेतली पोलिसांत धावप्रवीणच्या धमकीने तरुणी घाबरून गेली. त्याला इतके पैसे का द्यायचे अन् आज दिले तर तो पुन्हा उद्याची पैसे मागेल, आपल्याला सतत ब्लॅकमेल करील, असे तरुणीच्या लक्षात आले. तिने घडलेल्या प्रकार आईला सांगितले. मग घरच्यांनी अखेर तक्रार करण्याचा निर्णय घेतला. तरुणीने मुकुंदवाडी पोलीस ठाणे गाठले आणि आरोपी प्रवीणविरुद्ध ब्लॅकमेलिंगची फिर्याद दिली. त्यावरून गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
त्याने सोडलेल्या प्रेयसीला केले ब्लॅकमेल
By admin | Published: July 05, 2016 8:11 PM