लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : मुंबईतील गॅस्ट्रोच्या साथीनंतर कोकण विभागात अन्न व औषध विभागाने रस्त्यांवरील फेरीवाल तसेच हॉटेल्स् आणि बारमध्ये वापरण्यात येणारे खाद्यपदार्थ उच्चदर्जाचे आहेत का ? याच्या तपासणीचा धडाका लावला आहे. गेल्या नऊ दिवसात कोकणात विभागात १०२ ठिकाणी केलेल्या तपासणीत शरिरास घातक असणारा जवळपास २१ हजार ६०० किलो बर्फ नष्ट केला आहे. ठाणे (कोकण विभाग) अन्न आणि औषध विभागाने कोकणात १ मे पासून हाती घेतलेल्या या मोहिमेत ठाणे-पालघर आणि रायगड या जिल्ह्यात ८ मेपर्यंत जवळपास ११, ५८७.५ किलो बर्फ नष्ट केला असून त्याची किंमत ५४ हजार ४३८ रुपये आहे. तसेच १८ ठिकाणीहून बर्फ आणि त्या संबंधित पदार्थांचे नमुने घेऊन ते प्रयोग शाळेत तपासणी पाठवले आहेत. यामध्ये ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक ८७ ठिकाणी तपासणी केली असून त्यापैकी १६ ठिकाणच्या बर्फाचे नमुने घेतले आहेत. तर रायगड जिल्ह्यात ११ ठिकाणी तपासणी करीत २ ठिकाणाहून नमुने घेतले आहे. तसेच मंगळवारी मीरारोड परिसरात ६ हजार ६०० किलो बर्फ नष्ट केला. यामध्ये बर्फाची लादी आणि तुकडे होते. त्यात १३ हजार २०० रुपयांच्या मुद्देमालाचा समावेश आहे. तसेच नवी मुंबईतील ऐरोली येथेही २४०० रुपयांचा ६०० किलो बर्फ नष्ट केला. डहाणू येथील मासोळी नाका येथे आईस सप्लायर्स करून २९८ किलोबर्फ नष्ट केला आहे. त्याची किंमत ११९२ रुपये असून तेथेही नमुने घेतल्याची माहिती अन्न व औषध विभागांनी दिली. तसेच उल्हासनगर येथे २१२६ किलो बर्फ नष्ट केला आहे.
९ दिवसांत २१ हजार किलो बर्फ नष्ट
By admin | Published: May 10, 2017 3:13 AM