कांता हाबळे । लोकमत न्यूज नेटवर्कनेरळ : कर्जत तालुक्यातील पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत सुरु असलेल्या एझार्बिया प्रोजेक्टमधे अनेक दिवसांपासून ब्लास्टिंग केले जात आहेत. यामुळे दगड उडून आजूबाजूच्या घराचे मोठे नुकसान झाले आहे. नुकतीच एक लहान मुलगी दगडाच्या माऱ्यापासून थोडक्यात बचावली आहे. अनेक दिवसांपासून पाषाणेतील नागरिकांना ब्लास्टिंगचा त्रास सहन करावा लागत आहे. याबाबत येथील संदीप मालू डायरे यांनी नेरळ पोलीस, कर्जत तहसीलदार, जिल्हाधिकारी यांना कारवाई करण्यासंदर्भात तक्र ार केली आहे. नेरळ पोलिसांनी यासंदर्भात घटनास्थळाची पाहणी केली असली तरी अद्याप कारवाई करण्यात आलेली नाही. पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत काही अंतरावर एझार्बिया हा गृहनिर्माण प्रकल्प सुरु असून येथे मोठ्या प्रमाणात ब्लास्टिंग केले जात आहे. त्यामुळे मोठमोठे दगड दूरवर फेकले जात आहेत. शुक्र वार, २ जून रोजी दुपारी ब्लास्टिंग करताना मोठा दगड संदीप डायरे यांच्या घरावर पडून घराची कौले फुटली. यावेळी त्यांची दोन वर्षांची मुलगी घरात झोपली होती. सुदैवाने तिला कसल्याही प्रकारची इजा झाली नाही, परंतु घराचे प्रचंड नुकसान झाले आहे. या विकासकांचे आणि शासकीय यंत्रणेचे लागेबांधे असल्याचा तक्रारदाराचा आरोप आहे. कर्जत तालुक्यात अशा पद्धतीने टेकड्या जमीनदोस्त करण्याचे काम सुरु आहे. अनेकदा प्रशासन डोळ्यावर पट्टी बांधून अशा प्रकरणाकडे दुर्लक्ष करत असल्याचाही आरोप केला जात आहे. पाषाणे ग्रामपंचायत हद्दीत सुरू असलेल्या या ब्लास्टिंगच्या तक्र ारीची दखल घेऊन कारवाईची स्थानिकांची मागणी आहे. टेकड्या नामशेष करण्याची स्पर्धा कर्जत तालुक्यात गृहनिर्माण प्रकल्पाचे मोठे पेव फुटले आहे. यासाठी मोठ्या प्रमाणात जमिनींची खरेदी-विक्र ी झाली असून गृहनिर्माण प्रकल्प साकारताना जमीन सपाटीकरण करण्यासाठी कर्जत तालुक्यातील अनेक टेकड्या जमीनदोस्त करण्याची स्पर्धा सुरु असल्याचे चित्र सर्वत्र पाहावयास मिळत आहे. हे करताना परवानगी न घेणे, शासनाकडे स्वामित्वाची रक्कम न भरणे असे प्रकार देखील सुरु असून प्रशासनाचे याकडे अर्थपूर्ण दुर्लक्ष हा चर्चेचा विषय आहे. २ जून रोजी दुपारी मोठा दगड संदीप डायरे यांच्या घरावर पडून घराची कौले फुटली. यावेळी त्यांची दोन वर्षांची मुलगी घरात झोपली होती. सुदैवाने तिला कसलीही इजा झाली नाहीएझार्बिया प्रोजेक्टवर ब्लास्टिंग झाले असून त्या संदर्भात आमच्याकडे तक्र ार अर्ज प्राप्त झाला आहे. त्यानुसार नेरळ पोलिसांना कारवाईच्या सूचना देण्यात आल्या आहेत. - अविनाश कोष्टी, तहसीलदार कर्जतएझार्बिया प्रोजेक्टवर जाऊन सदर जागेची पाहणी केली आहे. परंतु या संदर्भात कर्जत तहसीलदार आणि जिल्हाधिकारी कार्यालयाकडे पत्रव्यवहार सुरु आहे. या संदर्भात अद्याप कारवाईचे कोणतेही लेखी आदेश आलेले नाहीत. - रमेश कदम, पोलीस उपनिरीक्षक नेरळ पोलीस ठाणेज्या घराचे नुकसान झाले आहे, त्या घराची पाहणी करण्यासाठी आमचे कॉन्ट्रॅक्टर यांना सांगितले होते. आमचा कोणालाही त्रास देण्याचा हेतू नाही. जे काही त्या घराचे नुकसान झाले असेल त्याची पाहणी करून त्यावर योग्य निर्णय घेतला जाईल. - अजय भाडके, व्यवस्थापक, एझार्बिया, प्रोजेक्टगेल्या अनेक दिवसांपासून येथे ब्लास्टिंग सुरु असल्याने मोठ्या प्रमाणात आवाज होत आहे. त्यामुळे घरातील लहान मुले घाबरत आहेत. शुक्र वारी दुपारी मोठा दगड आमच्या घरावर पडल्याने घराचे कौले घरात कोसळली . काही अंतरावर माझी दोन वर्षाची मुलगी झोपली होती. सुदैवाने तिला कोणतीही इजा झाली नाही. भविष्यात अशाच प्रकारे ब्लास्टिंग सुरु राहिल्यास आमच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे हे थांबले पाहिजे आणि अशा बिल्डरवर लवकरात लवकर कारवाई होणे गरजेचे आहे. - संदीप डायरे, तक्र ारदार, ग्रामस्थ
ब्लास्टिंगने ग्रामस्थ त्रस्त
By admin | Published: June 07, 2017 3:41 AM