शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

दहा तासांचा आज ब्लॉक

By admin | Published: September 18, 2016 2:58 AM

मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत दहा तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे.

मुंबई : दिवा स्थानकातील डाऊन लोकल मार्गावरील कट कनेक्शनसाठी मध्य रेल्वेकडून रविवारी सकाळी ८.३० ते सायंकाळी ६.३० वाजेपर्यंत दहा तासांचा ट्रॅफिक व पॉवर ब्लॉक घेण्यात येणार आहे. ब्लॉकच्या कारणात्सव १० मेल-एक्स्प्रेस रद्द करण्यात आल्या आहेत. या काळात प्रवाशांना दिलासा देण्यासाठी मध्य रेल्वेकडून सहा बस भाड्याने घेण्यात आल्या असून, त्या ठाकुर्ली ते कोपरदरम्यान चालविण्यात येणार आहेत. तर रविवारी हार्बरवर ब्लॉक घेण्यात येणार नसल्याचे मध्य रेल्वेने स्पष्ट केले आहे.मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. परिणामी, ठाणे, दिवा (नवीन प्लॅटफॉर्म) आणि डोंबिवलीत लोकल थांबतील. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्लीत लोकल थांबणार नाहीत. मुंब्रा स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या लोकल या ९.३७ ते ५.१८ या कालावधीत डाऊन जलद मार्गावर दिवा ते कल्याणदरम्यान धावतील. या लोकलना दिवा (नवे फलाट) आणि डोंबिवली स्थानकात थांबा देण्यात येणार आहे. ब्लॉकच्या वेळेत कोपर आणि ठाकुर्ली स्थानकांत डाऊन धिम्या लोकल गाड्यांना थांबा देण्यात येणार नाही. डाऊन धिम्या लोकल सकाळी ८ ते ९.३०पर्यंत तर सायंकाळी ५.३० ते ७ या वेळेत कळवा आणि मुंब्रा स्थानकांत थांबणार नाहीत.सीएसटीहून सुटणाऱ्या जलद लोकलना सकाळी ७.५३ ते सायंकाळी ५.४१ या वेळेत दिवा स्थानकातील नव्या फलाटावर थांबा देण्यात येईल. सीएसटीकडे येणाऱ्या आणि सीएसटीहून सुटणाऱ्या सर्व धिम्या, जलद लोकल या १५ ते २० मिनिटे उशिराने धावतील. सीएसटी ते कुर्ला, ठाणेदरम्यान विशेष लोकल चालविल्या जातील, असे अधिकाऱ्यांनी सांगितले. (प्रतिनिधी)>मुलुंड ते कल्याणदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरील लोकल डाऊन जलद मार्गावर वळविण्यात येणार आहेत. परिणामी, ठाणे, दिवा आणि डोंबिवलीत लोकल थांबतील. कळवा, मुंब्रा, कोपर आणि ठाकुर्लीत लोकल थांबणार नाहीत. मुंब्रा स्थानकातून सुटणाऱ्या धिम्या लोकल डाऊन जलद मार्गावर दिवा ते कल्याणदरम्यान धावतील.