बुलडाणा : एका ५० वर्षीय इसमाचा केवळ ६० रुपयांच्या देवाण-घेवाणीवरून खून करण्यात आल्याची घटना शेगाव तालुक्यातील खातखेड येथे घडली. येथील शिवारात सोमवारी आढळलेल्या मृतदेहाची ओळख पटविल्यानंतर हे बाब उघडकीस आली. पोलिसांनी आरोपीला अटक केली असून त्याने गुन्ह्याची कबुली दिली आहे.खातखेड येथील जगन्नाथ तुळशीराम गुळभेले असे खून झालेल्या इसमाचे नाव आहे. जगन्नाथशी गावातील विष्णू दयाराम तलवारे (४५) याने ६० रुपयाच्या घेवाण-देवाणीवरून सोमवारी दुपारी वाद घातला होता. (प्रतिनिधी)
बुलडाण्यात ६० रुपयांसाठी खून
By admin | Published: June 15, 2016 3:15 AM