शहरं
Join us  
Trending Stories
1
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
4
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
5
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
6
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
7
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
8
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
9
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
10
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
11
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
12
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
13
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
14
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
15
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
16
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
17
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
18
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं
19
Pushpa 2 Trailer: "पुष्पा नाम नही ब्रँड है", अल्लू अर्जुनचा रुद्रावतार आणि धमाकेदार ॲक्शन, 'पुष्पा २'चा ट्रेलर प्रदर्शित
20
"ऑस्ट्रेलियातच थांबा, तुमची गरज लागू शकते"; दोन IPL स्टार्स ना BCCIचा महत्त्वाचा निरोप

ठाण्यात खंडणीखोराचा खून

By admin | Published: December 15, 2014 4:00 AM

खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या मोनू टपाल या सराईत खंडणीखोराचा तिघांनी मिळून खून केला. ही घटना वागळे इस्टेट भागात घडली.

ठाणे : खंडणीसाठी ठार मारण्याची धमकी देणाऱ्या मोनू टपाल या सराईत खंडणीखोराचा तिघांनी मिळून खून केला. ही घटना वागळे इस्टेट भागात घडली. विशेष म्हणजे ज्या कोयत्याची भीती दाखवून त्याने एक हजाराच्या खंडणीची मागणी केली होती, त्याच कोयत्याने त्याचा खून करण्यात आला.मोनू हा अश्विनीकुमार द्विवेदी यांना अडीच महिन्यांपासून हप्ता देण्यासाठी धमकावत होता. कंटाळून अश्विनीकुमार यांनी श्रीनगर पोलीस ठाण्यात १३ डिसेंबरला रात्री ८.२० वा. तक्रारही दाखल केली होती. हा प्रकार झाल्यानंतर मोनू आणि त्याच्या साथीदारांनी रिक्षाचालक राजेश कुरेकर, वीरू सिंग आणि संतोष जनेवाल (रा. हनुमाननगर) यांच्याकडे एक हजार रुपयांची खंडणी मागितली. त्यांनी त्याकडे दुर्लक्ष केले. १४ डिसेंबर रोजी पहाटे २ वा.च्या सुमारास हे तिघेही मामाभाचे डोंगराच्या पायथ्याशी असलेल्या उद्यानाजवळ दारू पिण्यासाठी बसले होते. तेव्हा मोनू तिथे आला आणि कोयत्याने मारण्याची धमकी देऊ लागला. या तिघांनी मोनूच्या हातातला कोयता घेऊन त्याच कोयत्याने त्याचा खून केला. नंतर, मात्र हे तिघेही पसार झाले. विशेष म्हणजे ज्या ठिकाणी मोनूचा खून करण्यात आला, त्याच ठिकाणी मोनूने चार ते पाच वर्षांपूर्वी याकूब याचा खून केला होता. मोनूवर सात ते आठ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असल्याची माहिती श्रीनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक एस.जी. खैरनार यांनी दिली. (प्रतिनिधी)