ऑनलाइन लोकमत
मुंबई, दि. 23 - मुंबईतल्या गिरगाव, माहिमसारख्या मराठीबहुल भागात भाजपानं घवघवीत यश मिळवलं आहे. मुंबईत शिवसेनेची वाढ फुटपट्टीत झाली तर भाजपाची वाढ पटींनी झाल्याचं आशिष शेलार म्हणाले आहेत. भाजपाला 81 जागा मिळाल्या असल्या तरी 4 अपक्षांनी आम्हाला पाठिंबा दिला आहे.त्यामुळे आमच्याकडे 85 जागा आहेत, अशी माहिती भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार यांनी दिली आहे.
काँग्रेस आणि शिवसेनेनं मिळून मॅच फिक्सिंग केली होती. तरीही शिवसेनेला अपेक्षित यश मिळवता आलं नाही. भाजपानं 32 जागांवरून 82 जागांपर्यंत मजल मारली आहे. भाजपाच्या जागेत गेल्या वेळीपेक्षा दुपटीनं वाढ झाली आहे. भाजपाचा विजय हा मुंबईकरांना समर्पित करत असल्याचंही भाजपाचे मुंबई अध्यक्ष आशिष शेलार म्हणाले आहेत.
40 जागा जिंकण्याची औकात नाही असे भाजपला म्हणणाऱ्यांना सणसणीत चपराक देत मुंबईकरांना 81 जागा भाजपाच्या पारड्यात टाकल्या...!— ashish shelar (@ShelarAshish) February 23, 2017
विक्रम! विक्रम!! 32 जागांवरून भाजपाची 81 जागांवर मुसंडी! मुंबईकरांचे आभार! हा कौल पारदर्शी कारभारासाठी आणि विकासासाठी! !— ashish shelar (@ShelarAshish) February 23, 2017
सेना फुटपट्टीने वाढली भाजप मात्र पटींनी वाढला !!— ashish shelar (@ShelarAshish) February 23, 2017