ऑनलाइन लोकमत/शेफाली परब
मुंबई, दि. 23 - युती तुटल्यामुळे मुंबई महापालिकेच्या २५ वर्षांच्या इतिहासात सत्तेची समीकरणे प्रथमच बदलण्याची चिन्हे आहेत़ अत्यंत चुरशीच्या ठरलेल्या मुंबई महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेनेची ताकद ८५ जागा मिळवत वाढली खरी़ मात्र भाजपानेही मुसंडी मारत ८२ जागा मिळवत दुसरे स्थान पटकावले. त्यामुळे सत्ता स्थापनेसाठी आता जोरदार रस्सीखेच सुरु होणार आहे. अपक्ष, मनसे, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांना गळ लावण्यास उभय पक्षांनी सुरुवात केली आहे़ महापालिकेतील त्रिशंकू अवस्था भविष्यातील संघर्षाची नांदी ठरणारी आहे. भाजपाने स्वबळावर निवडणूक लढविण्याचे जाहीर करुन शिवसेनेला आव्हान दिले़ तर शिवसेनेनेही युती तोडत मित्रपक्षाला धडा शिकविण्याचा निर्धार केला़ काँग्रेस-राष्ट्रवादीमध्येही फिस्कटले. शिवसेनेने देखील मनसेला झिडकारल्याने सर्वच राजकीय पक्ष स्वतंत्रपणे निवडणुकीच्या रिंगणात उतरले. त्यामुळे संपूर्ण राज्याचे लक्ष मुंबईकडे लागले होते. निवडणुकीच्या रिंगणात सर्वच पक्ष असूनही खरी लढत शिवसेना आणि भाजपामध्येच झाल्याचे दिसून आले. पहिल्या फेरीपासूनच ही चुरस दिसून येत होती़ कधी शिवसेनेचे उमेदवार पुढे तर कधी भाजपाचे अशी अटीतटीची लढत सुरु राहिल्याने रंगत वाढत गेली़ काही प्रभागात भाजपाच्या नवख्या उमेदवारांनीही आघाडी घेतली़ दुपारी १२ वाजेपर्यंत शिवसेना ९० जागांवर पुढे असल्याचे चित्र होते़ परंतु शेवटच्या क्षणी भाजपाने आघाडी घेत ८२ जागांवर विजय मिळवला़ तर शिवसेना ८५ जागांवर विजयी झाली़ २०१२ च्या तुलनेत शिवसेनेची ताकद वाढली़ मात्र भाजपाने तीनपट झेप घेऊन अद्याप भाजपाची जादू कायम असल्याचे दाखवून दिले.भाजपाचे मोठे यशमिशन शंभर घेऊन स्वबळावर महापालिका निवडणुकीत उतरलेल्या भाजपाने आपलाच महापौर निवडून आणण्याचा निर्धार केला़ त्यानुसार भाजपाने तब्बल ८२ जागांवर विजय मिळवून आपली जादू अद्यापही कायम असल्याचे दाखवून दिले़ १९९७ पासून शिवसेनेबरोबर सत्तेत असलेली भाजपा आतापर्यंत छोट्या भावाच्या भूमिकेत होती़ मात्र भाजपाची ताकद कालांतराने वाढत गेली आणि यावेळीस तीनपट मुसंडी घेत भाजप दुसरा मोठा पक्ष ठरला आहे़ भाजपाचे ३२ नगरसेवक २०१२ मध्ये निवडून आले होते. तर काँग्रेसला सत्तेची संधीगेल्या २५ वर्षांपासून काँग्रेस मुंबई महापालिकेच्या सत्तेपासून दूर आहे. सत्तेसाठी सतत प्रयत्नशील असलेल्या काँग्रेसला अंतर्गत गटबाजीचा दरवेळीस फटका बसला आहे़ यावेळीस गटतटाचे राजकारण उफाळून आल्याचा परिणाम काँग्रेस पक्षाच्या निकालावर झाला आहे.२०१२ च्या महापालिका निवडणुकीत ५२ जागांवर निवडून आलेल्या काँग्रेसला यावेळीस घसरुन ३१ जागांवर आली आहे. मात्र महापालिकेत त्रिशंकू अवस्था निर्माण झाल्याने काँग्रेसलाही सत्तेची संधी निर्माण झाली आहे.एमआयएमने खाते उघडले.विधानसभेत एमआयएम या पक्षाचा एक आमदार निवडून आला़ त्यावेळीच या पक्षाची ताकद दिसून आली होती़ मुंबई महापालिका निवडणुकीत ५५ जागांवर लढणाºया एमआयएमने दोन जागांवर विजय मिळवला आहे़ एमएमआयच्या उमेदवारीचा फटका सर्वाधिक काँगे्रस आणि समाजवादीला बसला़ या पक्षाने काँग्रेस आणि समाजवादीचे नगरसेवक आपल्याकडे खेचून घेतले़ काँग्रेस आणि समाजवादी पक्षाचे पारंपरिक मतदार असलेल्या मुस्लिम समाजाची मते एमआयएमकडे वळल्याचे दिसून येते़ तरीही समाजवादीने सहा जागांवर विजय मिळवून आपला अस्तित्व कायम ठेवले आहे़ मात्र आक्रमकतेमुळे एमआयएम पक्ष भविष्यात महापालिकेतील सत्ताधारी पक्षासाठी डोकेदुखी ठरु शकते. पालिकेतील पक्ष निहाय संख्याबळ २०१२शिवसेना ७५भाजपा ३२आरपीआय ०१अखिल भारतीय सेना ०२अपक्ष १५ विरोधी पक्षकाँग्रेस ५२राष्ट्रवादी १३महाराष्ट्र नवनिर्माण सेना २८समाजवादी ९एकूण २२७पालिकेतील पक्ष निहाय संख्याबळ २०१७शिवसेना ८५भाजपा ८२काँग्रेस ३१राष्ट्रवादी ०९मनसे ०७समाजवादी ०६ एमआयएम ०२अपक्ष ०५एकूण २२७अशी असतील सत्तेची समीकरणे.मुंबई महापालिकेत २२७ जागा असल्याने ११४ हा जादुई आकडा गाठणारा पक्षच सत्ता स्थापन करण्यासाठी दावेदार ठरतो़ मात्र यावेळीस शिवसेना ८५ आणि भाजपा ८२ जागांवर विजयी झालेले आहेत़ त्यामुळे दोन्ही पक्षांना सत्ता स्थापनेची समान संधी आहे़ युती तुटल्यानंतर उभय पक्षांमध्ये जोरदार आरोप-प्रत्यारोप झाले आहेत़ दोन्ही पक्षांच्या नेत्यांनी एकमेकांची उणीधुणी काढली आहेत़ त्यामुळे शिवसेना आणि भाजपा एकत्र येण्याची शक्यता धूसर आहे़ भाजपाने आपल्याकडे चार नगरसेवकांचा पाठिंबा असल्याचा दावा आधीच केला आहे़ तर शिवसेनेकडेही दोनजणांचे समर्थन आहे़ अशावेळी अपक्ष आणि छोटे पक्षच किंगमेकर ठरु शकतात़ यासाठी राष्ट्रवादी ०९, समाजवादी ०६, मनसे ०७, एमआयएम दोन आणि अपक्ष पाच यांना गळ लावण्यास उभय पक्षांकडून सुरुवात झाली आहे़ मात्र अपक्षांचे कौल मिळवण्यासाठी आर्थिक व मोठे पदांचीही वाटाघाटी होत असते़ त्यामुळे या सर्व पक्षांची मनधरणी करण्यापेक्षा ३१ नगरसेवकांचे बळ असलेला काँग्रेस पक्ष किंगमेकर ठरु शकतो.