शहरं
Join us  
Trending Stories
1
"अशोक चव्हाणांनी काँग्रेसच्या जीवावर स्वतःची घरं भरली अन् पक्ष संकटात असताना भाजपात गेले"
2
"भाजपने डॉग स्क्वाड पाळलेत"; जयंत पाटलांचा सदाभाऊ खोतांवर पलटवार; फडणवीस यांचं नाव घेत म्हणाले...
3
"धारावीची पुनर्निविदा काढून भूखंड गिळण्याचा ठाकरेंचा प्रयत्न"; आशिष शेलारांचा गंभीर आरोप
4
Maharashtra Election 2024: कोणत्या मतदारसंघात काँग्रेसच्या नेत्यांनी केलीये बंडखोरी?
5
रिटायर्ड जजच्या घरात चोरी; ग्रामस्थांना पाहताच चोरांनी काढला पळ, तलावात पडून एकाचा मृत्यू
6
CSK ची टीम इंडियाशी गद्दारी? Rachin Ravindra च्या मुद्यावरुन उथप्पाची 'सटकली'
7
"महाराष्ट्र लुटेंगे और हमारे दोस्तोंको बाटेंगे हा भाजपचा अजेंडो"; अमरावतीमध्ये उद्धव ठाकरेंची बोचरी टीका
8
Maharashtra Vidhan Sabha Election 2024: नवाब मलिकांना भाजपाचा विरोध, अजित पवार मलिकांसाठी मैदानात, थेट रोड शोमध्ये दाखल
9
भाजपने खोटी जाहिरात छापून आणली; काँग्रेसची मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांकडे तक्रार 
10
एकनाथ शिंदे विधानसभा निवडणूक लढणार नव्हते, पण...; नरेश म्हस्केंचा गौप्यस्फोट
11
"उगाच काही सांगायचं, पटेल असं तरी..."; विरोधकांच्या योजना किती कोटींपर्यत जातायत? अजित दादांनी गणितच सांगितलं
12
प्रयागराजमध्ये महाकुंभ मेळ्याच्या बैठकीत राडा; साधुसंतांनी एकमेकांवर चालविल्या लाथाबुक्क्या
13
"याबाबत फडणवीस यांचं काय मत आहे?"; फोटो दाखवत पृथ्वीराज चव्हाणांचा सवाल
14
नवऱ्याला सोडलं अन् बॉयफ्रेंडशी लग्न ठरवलं; वधू वाट पाहत होती पण वरात आलीच नाही, कारण...
15
भारतीय अधिकाऱ्यांनी घेतली अफगाणी संरक्षण मंत्र्याची भेट; पाकिस्तानची उडाली झोप...
16
धक्कादायक! लॉरेन्स बिश्नोई अन् दाऊद इब्राहिमच्या फोटोंचे टी-शर्ट;फ्लिपकार्टसह 'या' साईटविरोधात गुन्हा दाखल
17
टेम्पो-कारचा भीषण अपघात; आईसह दोन लेकी, नातीचा जागीच मृत्यू
18
"सरकारचे शेवटचे १५ दिवस; मविआ भाजपासारखी फसवणूक करणार नाही", काँग्रेसचा टोला
19
वंदे भारतने मुंबई सुरतला जोडणार; फायद्यातील ट्रॅक ठरण्याची शक्यता, ट्रायल पूर्ण
20
निर्लज्जपणाचा कळस! ऋतुराज पंचांसह खेळाडूंवर संतापला; 'महाराष्ट्रा'साठी आवाज उठवला

‘बीएमएम २०२४’ सान होजेमध्ये : अमेरिकेत मराठी बांधव विचारणार, ‘काय बे?’

By ऑनलाइन लोकमत | Published: September 14, 2023 6:31 AM

'BMM 2024' : आयटीपासून स्टार्टअप्सपर्यंत विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने मान आणि धन दोन्ही बक्कळ कमावलेल्या मराठी माणसांचे अमेरिकेतील  ‘पुणे’ म्हणजे सॅनफ्रान्सिस्कोच्या कुशीतला श्रीमंत, उद्योगी ‘बे एरिया’! जून २०२४ मध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी अधिवेशनाचा मांडव सजणार आहे.

पुणे : आयटीपासून स्टार्टअप्सपर्यंत विविध क्षेत्रात आपल्या कर्तृत्वाने मान आणि धन दोन्ही बक्कळ कमावलेल्या मराठी माणसांचे अमेरिकेतील  ‘पुणे’ म्हणजे सॅनफ्रान्सिस्कोच्या कुशीतला श्रीमंत, उद्योगी ‘बे एरिया’! जून २०२४ मध्ये बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या मराठी अधिवेशनाचा मांडव सजणार आहे. लक्ष्मी आणि सरस्वतीच्या आशीर्वादाने गेल्या ५० वर्षांपासून जगाच्या जगण्या-वागण्याची दिशा बदलण्यात अग्रभागी असलेल्या या प्रांतात भारताबाहेरील सर्वांत मोठे मराठी संमेलन थाटात भरणार आहे. त्यात किमान ७ हजार प्रतिनिधी उपस्थित राहणार असल्याची माहिती संमेलनाचे प्रमुख निमंत्रक आणि अमेरिकेतील ख्यातनाम मराठी उद्योजक प्रकाश भालेराव यांनी  ‘लोकमत’शी बोलताना दिली.

बृहन्महाराष्ट्र मंडळ ही उत्तर अमेरिकेतील सर्व मराठी मंडळांची मातृसंस्था दर दोन वर्षांनी मराठी संमेलन आयोजित करते. २७ ते ३० जून २०२४ दरम्यान सान होजे कन्व्हेन्शन सेंटर परिसरात बीएमएम संमेलनाची मुहूर्तमेढ रोवली जाणार आहे.  ‘काय बे?’ असे मिश्कील घोषवाक्य माहिती-तंत्रज्ञानाच्या या जन्म-कर्मभूमीत मराठी माणसाने स्वकर्तृत्वाने कमावलेले अढळ स्थान अधोरेखित करणारे आहे.

‘काय बे’ संमेलनाबाबत...- सिलिकॉन व्हॅलीत तब्बल चार दिवस मराठी कला, संस्कृती, परंपरा व खाद्यसंस्कृतीचा उत्सव- बिझिनेस कॉन्फरन्समध्ये जगभरातील  आघाडीचे मराठी उद्योजक एकत्र - चित्रपट महोत्सवासह व्याख्याने,  चर्चासत्रे, मुलाखती - अमेरिकन मराठी विवाहेच्छुक  मुला-मुलींसाठी ‘रेशीमगाठी’ - २० आयोजक समित्या,  ३२० स्वयंसेवकांचे काम सुरू 

अमेरिकेत स्थायिक असलेल्या सर्व मराठी माणसांना एकाच व्यासपीठावर एकत्र आणण्यासाठी एका विशेष ॲपची निर्मिती करण्यात आली आहे. त्या आधारे विविध सेवा उपलब्ध करून दिल्या जातील.     - प्रकाश भालेराव, निमंत्रक, बीएमएम २०२४ 

टॅग्स :marathiमराठीMaharashtraमहाराष्ट्रUnited Statesअमेरिका