ऑनलाईन लोकमत
वसई, दि. २८ - वसईमध्ये लग्नाच्या वहा-डाला घेऊन जाणारी एक फेरी बोट रविवारी दुपारी बुडाली. नायगावहून पाणजू बेटावर जात असताना ही दुर्घटना घडली. क्षमतेपेक्षा जास्त प्रवासी भरल्याने ही बोट एकाबाजूला कलंडून उलटली. या बोटीमध्ये ५० ते ६० प्रवासी होते. या बोटीची क्षमता २५ प्रवाशांना वाहून नेण्याची आहे.
या दुर्घटनेत खाडीतून बाहेर काढताना अनेक प्रवासी जखमी झाले. रामचंद्र बाबाजी म्हात्रे या प्रवाशाचा वसई येथील रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला आहे.
चौघांवर वसईतील रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरु आहेत. नायगावच्या किना-याजवळ असताना ही बोट उलटली. मध्यभागी ही बोट बुडाली असती तर, मोठा अनर्थ घडला असता.
जखमींची नावे -
मनपा रुग्णालय, वसई
१) मधुकर दाजी तंगडी, भिवंडी
२)भावना द्वारकानाथ शिंदे, पाणजू
३) निलेश रघुनाथ पाटील, अर्नाळा
४) मोहिनी प्रकाश पाटील, भाईंदर
५) प्रतिभा बाळकृष्ण घरत, केळवे
६) आनंद लोकम, विरार
७) भीमा शशिकांत पाटील
८) हर्षांगी द्वारकानाथ शिंदे
९) संजीत निलेश पाटील
अलायन्स हॉस्पिटल, नालासोपारा
१) फाल्गुनी पाटील, १ वर्ष
२) प्रीत वर्तक
३) दिपांशू घरत
कार्डिनल ग्रेशस हॉस्पिटल, बांगली
१) बिंदू हरिदास
२) हितांशी पाटील
३) गीता पाटील
४) नलिनी पाटील
५) नूतन भरत घरत
६) प्रतीक्षा डी वर्तक
७) भरत भोईर
८) करुणा धनाजी पाटील
९) दिलीप वर्तक