शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची युद्धात उडी, शेकडो क्षेपणास्त्रांद्वारे इस्राइलवर मोठा हल्ला, तेल अवीवमध्ये खळबळ
2
इराणच्या क्षेपणास्त्र हल्ल्यादरम्यानच भीषण दहशतवादी हल्ल्याने इस्राइल हादरले, ४ जणांचा मृत्यू, दोन दहशतवाद्यांचा खात्मा   
3
"एका पक्षाच्या बळावर सरकार येऊ शकत नाही", अमित शाहांच्या विधानावर अजित पवारांचं प्रत्युत्तर!
4
सनातन धर्माची रक्षा करणे ही आमची जबाबदारी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचं विधान  
5
'पृथ्वीवरील सर्व खोटारडे मेले, तेव्हा राहुल गांधींचा जन्म झाला', शिवराज सिंह यांची बोचरी टीका
6
हॉटेलमध्ये प्रियकरासोबत शरीरसंबंध ठेवत असताना तरुणीचा मृत्यू, समोर आलं धक्कादायक कारण  
7
...म्हणून माजी सैनिकाने १४ दिवसांपासून डीप फ्रिजरमध्ये ठेवलाय मुलाचा मृतदेह, समोर आलं धक्कादायक कारण
8
IPL संघाच्या मालकाने खरेदी केला इंग्लडचा क्रिकेट क्लब; कोट्यवधींचा झाला व्यवहार
9
चमचम करता है नशीला बदन.... युजवेंद्र चहलची पत्नी धनश्रीचा 'स्पेशल' लूक, पाहा Photos
10
कोल्हापूरमधील मुरगूड येथे शिक्षकाने प्राध्यापिका पत्नीचा केला खून, समोर आलं धक्कादायक कारण
11
राहुल गांधींनी गोहाना जिलेबीची चव चाखली; काय आहे तिची खासियत?
12
GST संकलनात 6.5 टक्क्यांची वाढ; सप्टेंबर महिन्यात 1.73 लाख कोटींची वसुली
13
Mumbai Local: ठाकुर्ली-कल्याण मार्गावर तांत्रिक बिघाडामुळे मध्य रेल्वेची वाहतूक मंदावली  
14
US Election: कमला हॅरिस यांना धक्का; डोनाल्ड ट्रम्प यांनी निर्णायक ५ राज्यांमध्ये घेतली आघाडी
15
मोसादच्या मुख्यालयावर 'Fadi-4' क्षेपणास्त्र डागले, हिजबुल्लाहचा दावा 
16
'भाऊबीजेची ओवाळणी ॲडव्हान्स देणार'; लाडक्या बहीणींसाठी अजित पवारांची मोठी घोषणा
17
कळव्यात शालेय विद्यार्थ्यांना अन्नातून विषबाधा; ४० जणांवर रुग्णालयात उपचार सुरु
18
शरद पवारांनी केला करेक्ट कार्यक्रम; २२ लाख कार्यकर्त्यांसह पक्ष गळाला, विधानसभेला कुणाचा गेम?
19
छत्रपती शिवरायांचा जो उदात्त हेतू होता, त्याच अपेक्षेने पंतप्रधान नरेंद्र मोदींची वाटचाल- मुख्यमंत्री मोहन यादव
20
रशियाचे लढाऊ विमान अमेरिकेत घुसले; थोडक्यात मोठा अनर्थ टळला, पाहा धक्कादायक व्हिडिओ

अंबरनाथमध्ये बोगस कॉल सेंटर

By admin | Published: June 10, 2017 3:04 AM

कर्जाचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या अंबरनाथ येथील बोगस कॉल सेंटरचा ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला.

लोकमत न्यूज नेटवर्कठाणे : कर्जाचे आमिष दाखवून अमेरिकन नागरिकांना लुबाडणाऱ्या अंबरनाथ येथील बोगस कॉल सेंटरचा ठाणे पोलिसांनी गुरुवारी रात्री पर्दाफाश केला. या प्रकरणी आठ आरोपींना अटक केली असून, आणखी १८ संशयितांची चौकशी सुरू आहे.अंबरनाथ (पूर्व) येथील रमेश एंटरप्रायजेसच्या इमारतीमध्ये माउंट लॉजिक सोल्युशन्स या नावाने सुरू असलेल्या बोगस कॉल सेंटरमध्ये हा उद्योग सुरू होता. कर्जाच्या नावाखाली या कॉल सेंटरमधून अमेरिकन नागरिकांची लुबाडणूक सुरू असल्याची गोपनीय माहिती पोलीस आयुक्तांना मिळाली होती. त्यानुसार, गुन्हे शाखेचे उपायुक्त अभिषेक त्रिमुखे यांनी तातडीने सूत्रे हलवून गुरुवारी रात्री ११च्या सुमारास येथे धाड टाकली. इमारतीच्या तळ मजल्यावर सुमारे तीन हजार चौरस फूट क्षेत्रामध्ये सुरू असलेल्या या कॉल सेंटरमधून रात्री ८.३० ते पहाटे ५ वाजेपर्यंत हा उद्योग चालायचा. येथील कॉलर्स अमेरिकन नागरिकांशी कोलंबस बँकेच्या नावे व्हीओआयपी कॉलद्वारे संपर्क साधायचे. त्यांना विविध प्रश्न विचारून कर्जाचे आमिष दाखवायचे. नागरिकाने तयारी दाखवली की, काही दिवसांनी पुन्हा संपर्क साधून कर्ज मंजूर झाले. परंतु, त्यासाठी १०० ते ५०० डॉलर्सपर्यंत प्रक्रिया शुल्काची (प्रोसेसिंग फी) मागणी केली जायची. हे प्रक्रिया शुल्क देण्यासाठी तेवढ्या रकमेचे आयट्यूनकार्ड विकत घेण्यास सांगून कार्डवरील १६ अंकी क्रमांक त्यांच्याकडून घेतला जायचा. हा १६ अंकी क्रमांक कॉल सेंटरच्या व्यवस्थापकास दिला जायचा. व्यवस्थापकामार्फत हा १६ अंकी क्रमांक ‘कॅश’ करण्यासाठी पुढे पाठवला जायचा. २०१५ सालापासून हा उद्योग सुरू असल्याची माहिती सहपोलीस आयुक्त मधुकर पांडेय यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. या वेळी ३१ संगणकाच्या हार्डडीस्क, ३ लॅपटॉप आणि काही कागदपत्रे हस्तगत केले आहेत. सर्व आरोपी २० ते २२ वर्षे वयोगटातील आहेत. येथे २५ कॉलर्स कामाला होते. त्यापैकी आठ आरोपींना पोलिसांनी अटक केली. बहुतांश आरोपी बारावीपर्यंत शिकलेले असून, कॉल सेंटरमध्ये काम करण्याचा अनुभव त्यांना होता. नवी मुंबईतील खारघर येथील गुरुप्रसाद श्रेयन, अंबरनाथ येथील देवेश येरलेकर, सचिन चिंचोळकर, प्रमोद दिनकर, वसीम शेख, मोहन कुळकर्णी, शरण राव आणि रोहन गेडाम ही आरोपींची नावे असून त्यापैकी श्रेयन, येरलेकर आणि चिंचोळकर हे यामागचे सूत्रधार असण्याची शक्यता आहे. या प्रकरणी शिवाजीनगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.