शहरं
Join us  
Trending Stories
1
बेडी काढताच अक्षयने खेचले पोलिस अधिकाऱ्याचे पिस्तूल; पोलिसांच्या दिशेने गोळ्या झाडल्या
2
Today Daily Horoscope आजचे राशीभविष्य; आर्थिक लाभ संभवतात, मान-सन्मान होतील
3
कोणी अंगावर आला, तर त्याला आता शिंगावर घेणारच; आरक्षण म्हणजे 'गरिबी हटाव' नव्हे
4
लैंगिक अत्याचाराचे प्रकरण होणार बंद; मृत्यूमुळे अबेटेड समरी दाखल करणार
5
"खोलीत क्षेपणास्त्रे, गॅरेजमध्ये रॉकेट ठेवणाऱ्यांकडून...", हवाई हल्ल्यादरम्यान नेतन्याहू यांचा लेबनॉनला संदेश
6
भाजपच्या 'इलेक्शन मोड'साठी अमित शाहांची दहा सूत्री 'ब्ल्यू प्रिंट'!
7
'लाडक्या बहिणी' कमळाला मत देतील, म्हणून हा जुगाड; भाजप आमदाराचा व्हिडीओ वडेट्टीवारांकडून पोस्ट!
8
...अन् बलात्कारी, मर्डरर अमरसिंग ठाकूरचे एन्काऊंटर थोडक्यात हुकले!
9
राहुल गांधींचा पासपोर्ट रद्द करा... भाजप खासदाराचे लोकसभा अध्यक्षांना पत्र 
10
अंगावर डिझेल ओतून पेटवून घेण्याचा प्रयत्न, घरकुलाच्या जागेच्या मोजणीवरून वाद
11
अक्षय शिंदेच्या एन्काउंटरची सीआयडी व न्यायालयीन चौकशी केली जाणार 
12
माजी पोलीस महासंचालक म्हणाले, तर हे एन्काऊंटरच घडले नसते!
13
सर्वसामान्यांचे ₹ 1.8 लाख कोटी लुटणाऱ्यांची नावे उघड करा; राहुल गांधींचा SEBI वर हल्लाबोल
14
रशिया-युक्रेन युद्ध संपणार का? PM मोदी आणि झेलेन्स्कींची तीन महिन्यांत तिसऱ्यांदा भेट...
15
"मग नंतर तो कधी शिकणार?"; यशस्वी जैस्वालबद्दल पाकिस्तानी माजी क्रिकेटरचं रोखठोक मत
16
बदलापूर प्रकरणातील आरोपी अक्षय शिंदेचा मृतदेह अखेर नातेवाईक घेणार ताब्यात
17
"...तर विरोधकांचाही 'त्या' एन्काउंटरला पाठिंबा असेल"; नाना पटोलेंनी शिंदे सरकारला दिलं चॅलेंज
18
निवडणुकीदरम्यान मतभेद बाजूला ठेवा, गटबाजी खपवून घेणार नाही, अमित शाहांनी टोचले कान
19
Gayatri Shingne : राजेंद्र शिंगणेंविरोधात पवारांचा उमेदवार ठरला? गायत्री शिंगणे लढवणार विधानसभा!
20
राज्यातील विविध तीर्थक्षेत्र विकासांच्या ३०५ कोटी रुपयांच्या आराखड्यांना मंजुरी

बोगस डॉक्टरने घेतला जीव

By admin | Published: August 12, 2014 1:06 AM

कळमना परिसरात पुन्हा एका बोगस डॉक्टरने एका मजुराचा बळी घेतला. अनिल जगणे असे या बोगस डॉक्टरचे नाव असून, तो केवळ दहावी पास असल्याचे सांगितले जाते. कृषी कार्यातील

कळमन्यातील घटना : कृषी डिप्लोमाच्या आधारे उपचार नागपूर : कळमना परिसरात पुन्हा एका बोगस डॉक्टरने एका मजुराचा बळी घेतला. अनिल जगणे असे या बोगस डॉक्टरचे नाव असून, तो केवळ दहावी पास असल्याचे सांगितले जाते. कृषी कार्यातील डिप्लोमा आणि नॅचरोपॅथीच्या बोगस प्रमाणपत्राच्या आधारावर तो गेल्या पाच वर्षांपासून कळमन्यातील नवीननगर येथे दवाखाना चालवीत होता. जगणेच्या अटकेमुळे मनपा आरोग्य विभागाचे पितळ पुन्हा एकदा उघडे पडले आहे. जगणेद्वारा उपचारात निष्काळजीपणा केल्याने गेल्या ८ आॅगस्ट रोजी २२ वर्षीय योगेश ठाकूर नावाच्या मजुराचा मृत्यू झाला होता. रविवारी योगेशचे घरमालक ज्ञानेश्वर चौधरी यांनी पोलिसात दाखल केलेल्या तक्रारीनंतर खरा प्रकार उघडकीस आला. योगेश हा मूळचा फेटरी येथील रहिवासी असून तो मजूर होता. त्याचे कुटुंबीय कळमेश्वर रोडवरील फेटरी येथे राहतात. ८ आॅगस्ट रोजी सकाळी ७ वाजता योगेशला उलटी होऊ लागली. त्यामुळे घरमालक चौधरी यांनी त्याला जगणे याच्या दवाखान्यात नेले. जगणे याचा दवाखाना त्याच्या घरीच आहे. जगणे याने योगेशची प्रकृती गंभीर असून त्याला सलाईन लावावी लागेल, असे सांगितले. ९०० रुपये घेऊन तीन सलाईन आणि दोन इंजेक्शन दिले. यानंतरही त्याच्या प्रकृतीत सुधारणा झाली नाही. त्यामुळे चौधरी त्याला घेऊन मेयो रुग्णालयात गेले. तिथे डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. कळमना पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद करून तपास सुरू केला होता. पोलिसांनी रविवारी जगणेच्या दवाखान्यावर धाड टाकली. तिथे स्टेथॅस्कोप, औषधी आणि उपचाराचे साहित्य मिळाले. जगणेजवळून कृषी कामाचा डिप्लोमा आणि नॅचरोपॅथीची बोगस डिग्री मिळाली. याच्या आधारावरच तो लोकांवर अ‍ॅलोपॅथीने उपचार करीत होता. यानंतर त्याच्याविरुद्ध सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून त्याला अटक करण्यात आली. (प्रतिनिधी)