बॉलिवूडची क्वीन कंगना रणौत पद्मश्री पुरस्कार मिळाल्यानं आनंद व्यक्त केला होता. कंगनाने इंस्टाग्राम अकाउंटवर एक व्हिडीओ शेअर केला . या व्हिडीओत तिने ट्रोलर्सनाही चांगलेच खडेबोल लगावले होते. तसेच तिने तिच्या चाहत्यांचे खूप आभारदेखील मानले. कंगनाने एका मुलाखतीदरम्यान आणखी एक वादग्रस्त विधान केलं. आपल्याला जे स्वातंत्र्य मिळाले ते भीक होती, देशाला खरं स्वातंत्र्य २०१४ मध्येच मिळालं, असं कंगनाने म्हटलं आहे. यानंतर अनेकांनी तिच्या वक्तव्यावर संताप व्यक्त केला. दरम्यान शिवसेना उपनेत्या डॉ.नीलम गोऱ्हे यांनी त्यांचा खरपूस समाचार घेतला असून तिला देण्यात आलेला पद्मश्री पुरस्कार काढून घेण्याची मागणी केली आहे.
"रणौत यांनी अतिशय बेजबाबदार, निराधार, स्वातंत्र्य योध्याचे अपमान करणारे हे त्याचे विधान असून त्याचा जाहीर निषेध आहे. प्रसिद्धीसाठी वरचा मजला रिकामा असलेली त्याच्यासाठी बेताल वक्तव्य करणारी रणौत ही अभिनेत्री आहे," असं निलम गोऱ्हे म्हणाल्या.