शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे मराठमोळे, दबंग आयपीएस शिवदीप लांडे यांचा तडकाफडकी राजीनामा; एवढे काय घडले?
2
तिसऱ्या आघाडीच्या बैठकीला बच्चू कडू गैरहजर; "मनोज जरांगे, प्रकाश आंबेडकर...", पहा काय चर्चा केली जाईल
3
"स्वार्थी गद्दारावर विश्वास ठेवलात, तर...", ठाकरेंचं शिंदेंवर टीकास्त्र, भाजपाला सवाल
4
“बच्चू कडू यांनी तिसऱ्या आघाडीपेक्षा महाविकास आघाडीत यावे”; जयंत पाटील यांची खुली ऑफर
5
जम्मू-काश्मीरच्या विनाशाला तीन कुटुंबे जबाबदार; श्रीनगरमधून PM मोदींचा विरोधकांवर हल्लाबोल
6
"'वन नेशन वन इलेक्शन' म्हणजे भारतात अमेरिकेसारखी राष्ट्राध्यक्ष पद्धत आणण्याचा डाव"
7
दिल्ली सरकारच्या नव्या कॅबिनेटचं चित्र स्पष्ट, आतिशी यांच्यासह हे ५ मंत्री घेणार शपथ
8
लाच म्हणून मर्सिडीज, महिलेला दरमहिना २ लाख; IAS अधिकाऱ्याबाबत धक्कादायक खुलासा
9
मोठी बातमी: विधानसभेसाठी भाजपच्या ५० उमेदवारांची पहिली यादी जाहीर होणार; मुहूर्त ठरला!
10
Rate Cut चं सर्वसामान्यांना काय देणं-घेणं?; तुमच्या मासिक खर्चावर होतो थेट परिणाम
11
ठाकरेंच्या नेत्याची खासदारकी एका चुकीमुळे धोक्यात? प्रकरण पोहोचले उच्च न्यायालयात
12
Haryana Election : अग्निवीरला सरकारी नोकरी, महिलांना २१०० रुपये; भाजपकडून २० मोठी आश्वासने
13
पितृपक्ष: श्राद्ध, तर्पण विधी करताना ‘हे’ ८ मंत्र म्हणा, ठरतील उपयुक्त; पाहा, मान्यता
14
काश्मीर, कलम ३७० बाबत पाकिस्तान, काँग्रेस-NC सोबत, पाकिस्तानच्या संरक्षण मंत्र्यांचा दावा
15
मद्यप्रेमींना दिलासा, फक्त ९९ रुपयांत मिळणार दारू, आणखी ३ तास उघडी राहणार दुकानं, 'या' राज्यात नवीन मद्य धोरण
16
IND vs BAN : जैस्वालची 'यशस्वी' खेळी; फिफ्टीसह खास विक्रमाला घातली गवसणी
17
माजी पोलीस आयुक्त संजय पांडे काँग्रेसमध्ये प्रवेश करणार; ठाकरेंची डोकेदुखी वाढणार?
18
को-स्टारच्या प्रेमात वेडी झाली 'ही' अभिनेत्री; नातं वाचवण्यासाठी ठेवला काळ्या जादूवर विश्वास
19
पितृपक्ष: ५ कामे अवश्य करा, लक्ष्मी प्रसन्न होईल; कायम मेहेरबान राहील, पितरांची कृपा लाभेल!
20
कुछ बडा होने वाला है...! तेजस्वी यादवांनी बोलावली आमदार-खासदारांची तातडीची बैठक

बाबरी मशिदीचा बदला घेण्यासाठी 1993 साली मुंबईत घडवले बॉम्बस्फोट

By admin | Published: June 16, 2017 12:36 PM

मुंबई 1993 बॉम्बस्फोटा प्रकरणी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले.

 ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. 16 - मुंबई शहराला हादरवून सोडणा-या 1993 सालच्या साखळी बॉम्बस्फोट मालिका प्रकरणी विशेष टाडा न्यायालयाने शुक्रवारी अबू सालेम, मुस्तफा डोसा, ताहीर मर्चंट, करीमुल्ला खान, फिरोझ अब्दुल राशिद खान यांना दोषी ठरवले. गुन्हेगारी कट रचणे आणि दहशतवादी कारवायांसाठी सालेमला न्यायालयाने दोषी ठरवले. शस्त्रास्त्र कायद्याखालीही न्यायालयाने त्याला दोषी ठरवले. सबळ पुराव्याअभावी न्यायालयाने अब्दुल कय्यूमची सुटका केली. त्याची तात्काळ मुक्ततता करण्याचे न्यायालयाने आदेश दिले. 
 
सालेमने गुजरातला जाऊन नऊ एके-56 रायफल्स आणि 100 ग्रेनेडस घेतले. जानेवारी 1993 मध्ये अभिनेता संजय दत्त, झैबुनीसा काझीच्या घरी ही शस्त्रास्त्र उतरवण्यात आली होती. अनिस इब्राहिमच्या इशा-यावरुन ही शस्त्रास्त्रे या दोघांकडे ठेवण्यात आली होती. अबू सालेमला त्याच्या कृत्यासाठी फाशीची शिक्षा होऊ शकते पण पोर्तुगालकडून फाशीची शिक्षा न देण्याच्या अटीवर त्याचे प्रत्यर्पण झाले आहे. 
 
हवाला ऑपरेटर राहिलेल्या ताहीर मर्चंटलाही न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी दोषी धरले. हल्ल्यासाठी ज्यांना प्रशिक्षित करण्यात आले त्यांच्यासाठी मर्चंटच्या दुबईमधील घराचा वापर झाल्याचे न्यायालयाने आपल्या निकाल वाचनात सांगितले. 
 
न्यायालयाने कट रचल्या प्रकरणी मुस्तफा डोसाला दोषी ठरवले आहे. कट रचण्यासाठी दुबईत झालेल्या बैठकीला मुस्तफा त्याचा भाऊ मोहम्मद डोसा आणि दाऊद इब्राहिमसह उपस्थित होता असे न्यायाधीशांनी सांगितले. शस्त्रास्त्र उतरवण्यासाठी मुस्तफा डोसाने मदत केल्याचेही सिद्ध झाले आहे.कोर्टामध्ये सर्व आरोपी त्यांच्यासाठी खास बनवण्यात आलेल्या बेंचवर शेवटच्या रांगेत बसले होते. निकालापूर्वी डोसाने आपण तणावामध्ये असल्याचे सांगितले. 
 
 
6 डिसेंबर 1992 साली अयोध्येत बाबरी मशीद पाडली त्याचा बदला घेण्यासाठी 1993 मुंबई बॉम्बस्फोटाच्या कटात सहभागी झाल्याची आरोपींनी कबुली दिली. सोमवारपासून आरोपींना सुनावण्याच्या शिक्षेसंदर्भात सुनावणी सुरु होईल. 
 
या बॉम्बस्फोटांमध्ये 257 जणांचा बळी गेला होता तर, 713 लोक जखमी झाले होते. पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेमसह सात जणांसंबंधी टाडा कोर्ट निकाल देणार आहे. या निकालाकडे मुंबईकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले होते. कारण इतक्या मोठ्या बॉम्बस्फोट मालिकेने मुंबई तेव्हा पहिल्यांदाच हादरली होती.
 
पोर्तुगालवरून प्रत्यार्पण करून आणलेल्या अबू सालेमसह सात जणांचा यात समावेश आहे. या निकालाकडे मुंबईकरांसह संपूर्ण राज्याचे लक्ष लागले आहे. कारण इतक्या मोठ्या बॉम्बस्फोट मालिकेने मुंबई तेव्हा पहिल्यांदाच हादरली होती.
 
 
१२ मार्च १९९३ रोजी मुंबईतील १३ मुख्य ठिकाणांवर साखळी बॉम्बस्फोट करण्यात आले. त्या बॉम्बस्फोटांमध्ये २५७ लोकांचा मृत्यू झाला होता तर ७१३ लोक गंभीररीत्या जखमी झाले होते. सुमारे २७ कोटी रुपयांच्या सार्वजनिक मालमत्तेचे नुकसान झाले. पहिल्या खटल्याचा निकाल २००७ मध्ये लागला. १२३ आरोपींपैकी १०० आरोपींना विशेष टाडा कोर्टाने दोषी ठरवले तर २३४ जणांची पुराव्याअभावी सुटका केली. १९९३ मुंबई साखळी बॉम्बस्फोटातील मुख्य आरोपी याकुब मेमन याला ठोठावण्यात आलेल्या फाशीच्या शिक्षेवर जुलै २०१५ मध्ये अंमल करण्यात आला. सध्या सुरू असलेल्या केसमधील सात आरोपी मूळ खटला सुरू झाल्यानंतर पोलिसांच्या हाती लागल्याने न्यायालयाने आधी १२३ आरोपींवरील खटला पूर्ण केला.
 
आणखी वाचा 
तुरूंगात अबू सालेमची बडदास्त... पार्टीसाठी चिकन, २४ तास मोबाइल
 
त्यानंतर अबू सालेम, मुस्तफा डोसा, करीमुल्ला खान, फिरोज अब्दुल, रशीद खान, रियाझ सिद्दिकी, ताहीर मर्चंट आणि अब्दुल कय्यूम या सात जणांवर खटला चालवला. या सात जणांवरील खटला १९९३ मुंबई बॉम्बस्फोटाची ‘केस बी’ म्हणून चालवण्यात आला.
 
अबू सालेमला पोर्तुगालमधून आणण्यात आले, तर मुस्तफा डोसाला संयुक्त अरब अमिरातीमधून अटक करण्यात आले. मात्र आपणाला पोलिसांनी अटक केली नसून आपणच तपास यंत्रणेपुढे शरणागती पत्करल्याचा दावा डोसा करत आहे. या केसमधील आणखी काही आरोपी अद्यापही फरारी आहेत. या हल्ल्याचा सूत्रधार दाऊद इब्राहिम, मोहम्मद डोसा आणि टायगर मेमन हे अद्यापही फरारी आहेत.
 
बॉलीवूड अभिनेता व १९९३ च्या खटल्यातील आरोपी संजय दत्त याला शस्त्र पुरविल्याचा आरोप अबू सालेमवर आहे. तर मुस्तफा डोसावर कट रचल्याचा व शस्त्रास्त्रे उतरवल्याचा आरोप आहे. संजय दत्तच्या घरी शस्त्रास्त्रे पोहोचवल्याचा आरोप कय्युमवर ठेवण्यात आला आहे. तर अन्य आरोपींची पाकिस्तानमध्ये जाण्याची सोय केल्याचा आरोप ताहीरवर आहे.
 
 
२०१३ मध्ये अबू सालेमवरील काही आरोप वगळण्यात आले. कारण सीबीआयने हे आरोप भारत व पोर्तुगालच्या प्रत्यार्पण करारात बसत नसल्याचे म्हणत विशेष न्यायालयाकडे अर्ज केला होता. या संपूर्ण खटल्यात न्यायालयाने ७५० साक्षीदारांची साक्ष नोंदवली, तर ५० बचावपक्षाच्या साक्षीदारांचीही साक्ष नोंदवली. सालेमने त्याचा गुन्हा सीबीआय चौकशीत कबूल केला आहे. २००७ मध्ये या खटल्याला सुरुवात झाली होती. मात्र सालेम, डोसा आणि सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकांमुळे खटल्यास विलंब झाला. खटल्याला २०१२ मध्ये सुरुवात झाली आणि मार्च २०१७ मध्ये खटला संपला.
 
हा खटला सुरू असतानाच सर्वोच्च न्यायालयाने बॉम्बस्फोटाचा सूत्रधार याकुब मेमन याला विशेष टाडा न्यायालयाने दिलेल्या फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले. तसेच अन्य आरोपींच्या अपिलावरही निर्णय दिला.  त्यात बॉलीवूड अभिनेता संजय दत्तचाही समावेश आहे. संजय दत्तच्या शिक्षेत कपात करण्यात आली. मे २०१३ मध्ये संजय दत्तने विशेष टाडा कोर्टापुढे शरणागती पत्करली व त्यानंतर त्याची रवानगी येरवडा कारागृहात करण्यात आली. याकुबने फाशीची शिक्षा ठोठावल्यानंतर सर्वोच्च न्यायालयालयात अनेक अर्ज केले. सर्वोच्च न्यायालयाने मध्यरात्री बसून त्याच्या अर्जावर निर्णय दिला आहे. अखेरीस ३० जुलै २०१५ रोजी त्याला फाशी देण्यात आली.