धुळे : जिल्हा न्यायालयातील दिवाणी न्यायाधीशांच्या दालनात बॉम्ब ठेवल्याचे पत्र मिळाल्याने बुधवारी सकाळी खळबळ उडाली होती. बॉम्ब शोधक पथकाने परिसराची कसून तत्काळ झाडाझडती केली. मात्र ती अफवा असल्याचे निष्पन्न झाले.तिसरे वरिष्ठ स्तर न्यायाधीश एफ़ डी़ चव्हाण यांच्या दालनाचा दरवाजा बुधवारी सकाळी शिपाई नंदू सातभाई यांनी उघडला़ त्या वेळी त्यांना फरशीवर एक पाकीट आढळले. ‘८ फेब्रुवारी ही तारीख न्यायालयाच्या दृष्टीने धोकादायक असून न्यायालयाच्या आवारात बाँब ठेवला आहे,’ असा हिंदी भाषेतील मजकूर या पाकिटातील चिठ्ठीत लिहिलेला होता.ही माहिती पोलीस दलाच्या बॉम्बशोधक पथकाला देण्यात आली़ तब्बल दोन तासांपेक्षा अधिक वेळ या पथकाने सर्व न्यायालये आणि परिसराची कसून तपासणी केली.(प्रतिनिधी)
धुळे न्यायालयात बॉम्बची धमकी
By admin | Published: February 09, 2017 5:15 AM