मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 इमारती पाडा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2022 02:52 PM2022-07-29T14:52:40+5:302022-07-29T14:53:11+5:30

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेल्या टोलेजंग इमारतींबाबत उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. तसेच, डीजीसीएच्या आदेशाचे तातडीने पालन करण्यास सांगितले आहे.

Bombay High Court orders Collector, Mumbai Suburban, to demolish portions of 48 high-rise buildings near the Mumbai International Airport | मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 इमारती पाडा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 इमारती पाडा; मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश

googlenewsNext


मुंबई: मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या आसपास असलेल्या टोलेजंग इमारतींबाबत उच्च न्यायालयाने मोठा निकाल दिला आहे. विमानतळाच्या आजुबाजूला असलेल्या 48 इमारती पाडण्याचे आदेश मुंबई उच्च न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाने डीजीसीएच्या आदेशाचे तातडीने पालन करण्यास सांगितले आहे. ANI वृत्तसंस्थेने या वृत्ताला दुजोरा दिला आहे.


मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळ असलेल्या इमारतींबाबत हे आदेश आहेत. या इमारतींचे ते भाग पाडण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले आहेत, ज्यांची उंची परवानगी मर्यादेपेक्षा जास्त आहे. मुंबई उच्च न्यायालयाने मुंबई उपनगरच्या जिल्हाधिकाऱ्यांना नागरी विमान वाहतूक महासंचालनालयाच्या आदेशाचे पालन करून मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाजवळील 48 उंच इमारतींचे भाग तातडीने पाडण्याचे आदेश दिले आहेत.

मुंबई उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार ठराविक उंचीपेक्षा जास्त बांधकाम केलेले भाग पाडण्यात येणार आहेत. मुख्य न्यायमूर्ती दीपंकर दत्ता आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ही जबाबदारी बृहन्मुंबई महानगरपालिकेवर ठकवण्याचा प्रयत्न केल्याबद्दल जिल्हाधिकार्‍यांवर ताशेरे ओढले. तसेच, या धोकादायक इमारतींबाबत निर्णय घ्यावा असेही सांगितले. ज्या इमारतींना उंचीचे उल्लंघन केल्याप्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे, त्या इमारतींचा वीज आणि पाणीपुरवठा खंडित करण्याची सूचनाही न्यायालयाने अधिकाऱ्यांना केली आहे.
 

Web Title: Bombay High Court orders Collector, Mumbai Suburban, to demolish portions of 48 high-rise buildings near the Mumbai International Airport

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.