Corona Vaccination: लसीकरणाची किंमत समान हवी; मुंबई हायकोर्टाचा सुनावणी करण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Published: April 29, 2021 02:18 PM2021-04-29T14:18:33+5:302021-04-29T14:20:12+5:30

Corona Vaccination: कोरोना लसींच्या किमती समान हव्यात, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे.

bombay high court refuses plea seeking directions to ensure corona vaccine supplied at the uniform rate | Corona Vaccination: लसीकरणाची किंमत समान हवी; मुंबई हायकोर्टाचा सुनावणी करण्यास नकार

Corona Vaccination: लसीकरणाची किंमत समान हवी; मुंबई हायकोर्टाचा सुनावणी करण्यास नकार

googlenewsNext
ठळक मुद्देकोरोना लसीसंदर्भातील याचिकेवर सुनावणीस मुंबई उच्च न्यायालयाचा नकारयाचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा दिला सल्लातुम्ही सतत याचिका करु शकत नाही; मुंबई उच्च न्यायालयाने फटकारले

मुंबई: संपूर्ण देशात कोरोना लसीकरणाच्या तिसऱ्या टप्प्याला १ मेपासून सुरुवात होत आहे. कोरोना विषाणू संसर्गाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर कोरोना लसीकरणावर सर्वाधिक भर दिला जात आहे. कोरोना लसीकरणाच्या तिसरा टप्पा अतिशय महत्त्वाचा असून, १८ वर्षांवरील सर्वांचे लसीकरण करण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर कोरोना लसींच्या किमती समान हव्यात, अशी मागणी करणारी याचिका मुंबईउच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. मात्र, या याचिकेवर सुनावणी करण्यास न्यायालयाने नकार दिला आहे. (bombay high court refuses plea seeking directions to ensure corona vaccine supplied at the uniform rate)

सीरम इन्स्टिट्यूटने अलीकडेच कोरोना लसींची किंमत जाहीर केली होती. त्यानंतर त्यात १०० रुपयांची कपातही केली. मात्र, देशभरात कोरोना प्रतिबंधक लस प्रतीडोस १५० च्या समान दराने पुरविली जावी, असे आदेश द्यावेत, अशी मागणी करणारी याचिका मुंबई उच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश दीपांकर दत्ता यांनी या याचिकेवरील सुनावणीस नकार देत याचिकाकर्त्यांना सर्वोच्च न्यायालयात दाद मागण्याचा सल्ला दिला आहे. 

ठाकरे सरकार युवाविरोधी, तरुणांना लसीकरणापासून ठेवले वंचित; भाजपची टीका

याचिकाकर्त्यांना न्यायालयाने फटकारले

सर्वोच्च न्यायालयाने आधीच देशभरासाठी महत्वाचे असणारे मुद्दे आम्ही ग्राह्य धरू असे स्पष्ट केले आहे. किंमती संपूर्ण भारतभर लागू होतात. तुम्ही याचिका दाखल करण्याआधीच सर्वोच्च न्यायालयाने दखल घेतली आहे. तुम्ही त्यांच्याकडे दाद मागू शकता, असे न्या. दीपांकर दत्ता यांनी स्पष्ट केले. तसेच तुम्ही सतत याचिका करु शकत नाही. आम्हाला परिस्थितीची कल्पना आहे आणि लोकांना चांगले उपचार मिळावेत, यासाठी सतत केंद्र आणि राज्य सरकारला सांगत आहोत, या शब्दांत उच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना फटकारले. 

१३५ शिक्षकांच्या मृत्यूला कोण जबाबदार? हायकोर्टाचे निवडणूक आयोगावर ताशेरे

दरम्यान, देशात लसीकरणावर भर दिला जात असून, १ मेपासून १८ वर्षांपुढील सर्वांचे लसीकरण होणार आहे. राज्यात मात्र लसीकरणास सुरुवात होणार नसल्याचे राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी बुधवारी मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितले. लसीचे डोस उपलब्ध होण्याचे प्रमाण कमी असल्यामुळे नाईलाजास्तव हा निर्णय घ्यावा लागला, असेही टोपे म्हणाले. 
 

Read in English

Web Title: bombay high court refuses plea seeking directions to ensure corona vaccine supplied at the uniform rate

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.