Malad Building Collapse: मुंबईतील अवैध बांधकामांबाबत BMC काय कारवाई करतेय? हायकोर्टाचा थेट सवाल
By ऑनलाइन लोकमत | Published: June 11, 2021 05:44 PM2021-06-11T17:44:08+5:302021-06-11T17:47:34+5:30
Malad Building Collapse: मुंबईतील अवैध बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत.
मुंबई: बुधवारी रात्री मुसळधार पावसामुळे मालाडच्या न्यू कलेक्टर कपाऊंड येथील रहिवासी इमारत ढासळली. यात ११ जणांचा मृत्यू झाला आहे. या घटनेची मुंबईउच्च न्यायालयाने स्वतःहून दखल घेत स्यू मोटो याचिका दाखल करून घेतली आहे. तसेच मुंबईतील अवैध बांधकामांबाबत मुंबई उच्च न्यायालयाने महानगरपालिकेवर तीव्र शब्दांत ताशेरे ओढले आहेत. या घटनेची न्यायालयीन चौकशी करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत. (bombay high court takes suo motu cognizance of malad building collapse)
मालाड येथील रहिवासी इमारत कोसळल्यानंतर मुंबई उच्च न्यायालयाने स्यू मोटो याचिका दाखल करून घेत त्यावर शुक्रवारी सुनावणी घेतली. यावेळी या प्रकरणाची आयुक्त स्तरावरील अधिकाऱ्यांमार्फत चौकशी करून २४ जूनपर्यंत या चौकशीचा प्राथमिक अहवाल सादर करण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. या सुनावणीवेळी उच्च न्यायालयाने मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनाही फटकारले.
"What is BMC doing about this illegal construction," asks Bombay High Court. The Court ordered action against those responsible for such illegal constructions and criminal action, if required.
— ANI (@ANI) June 11, 2021
तुमचा महाराष्ट्र पोलिसांवर विश्वास नाही? हे धक्कादायक; सुप्रीम कोर्टाने परमबीर सिंगांना फटकारले
मुंबई महानगरपालिकेला सुनावले
मुंबईतील अवैध बांधकामांबाबत मुंबई महानगरपालिका काय कारवाई करतेय, असा सवाल मुंबई उच्च न्यायालयाने यावेळी विचारला. तसेच अशा प्रकारच्या बेकायदा बांधकामांसाठी जबाबदार असणाऱ्यांवर कारवाई करा. जर आवश्यकता भासली, तर फौजदारी स्वरुपाची कारवाई करा, असे निर्देश देत मुंबई महानगरपालिकेला चांगलेच सुनावले आहे. बेकायदा बांधकामं कशी होतात, त्याची सविस्तर माहिती लेखी स्वरुपात द्यावी. अशी बांधकामे इतका काळ कशी काय उभी राहतात आणि पालिकेच्या नगरसेवकांनी हा मुद्दा पुढे का आणला नाही? यासंदर्भात माहिती सादर करण्याचे निर्देशही न्यायालयाने दिले आहेत.
“भारतीय जनता पक्ष म्हणजे ‘डूबती नैया’, काही झालं तरी NDA सोबत जाणार नाही”
महापौरांना सुनावले खडेबोल
किशोरी पेडणेकर यांनी न्यायालयाचे आदेश असल्याने अनधिकृत बांधकामांविरोधातील कारवाई थांबली असल्याचे म्हटले होते. यावर न्यायालयाने संताप व्यक्त केला असून, स्वतःच्या चुकांसाठी न्यायालयाला जबाबदार धरू नका. मोडकळीस आलेल्या इमारतींबाबत आपला आदेश नव्हता. जर्जर इमारती रिकाम्या करण्यासाठी परवानगी घेण्याची मुभा दिलेली होती, असे न्यायालयाने यावेळी स्पष्ट केले.
कोव्हॅक्सिनला धक्का! अमेरिकेने आपत्कालीन वापरासाठी मंजुरी नाकारली; आता WHO कडे लक्ष
दरम्यान, मालाड येथील मालवणी परिसरात अब्दुल हमीद रोडवर बुधवारी रात्री ११ च्या सुमारास ही दुर्घटना घडली. अग्निशमन दलाच्या गाड्या तातडीने घटनास्थळी पोहचल्या त्यानंतर शोधकार्याला सुरूवात झाली. ढिगाऱ्याखालून काढण्यात आलेल्या जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल केले. सहपोलीस आयुक्त विश्वास नांगरे पाटील यांनी घटनास्थळाची पाहणी केली. तौक्ते वादळात इमारतीला तडा गेला होता. त्यानंतर चुकीच्या पद्धतीने बांधकाम केले, अशी माहिती नांगरे पाटील यांनी दिली.