सातारा/पुणे : घरात काम करणाऱ्या महिलेला शिवीगाळ करत, मारहाण करून बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्या पुण्यातील आरोपीला पोलिसांनी अटक केल्यानंतर त्याच्या घरात स्फोटके सापडली. दरम्यान, त्याने या महिलेच्या पिशवीत परस्पर टाकलेली अजून एक बॉम्बसदृश्य वस्तू सातारा जिल्ह्यातील खटावमध्ये तिच्या नातेवाईकाच्या घरात पोलिसांना सापडली. लष्करातून निवृत्त झालेल्या चुलत्याकडून ही वस्तू मिळविल्याची कबुली आरोपीने दिली आहे.विश्वनाथ गणपती साळुंखे (५६, रा. औदुंबर कॉलनी, वाल्हेकरवाडी, चिंचवड) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे. विश्वनाथ हा वाहनचालक म्हणून काम करतो. आईची तब्येत बरी नसल्याने तिच्या देखभालीसाठी त्याने एका महिलेची ‘केअरटेकर’ म्हणून नेमणूक केली. शुक्रवारी रात्री तो केअरटेकर महिलेला मारहाण करत होता. बॉम्बने उडवून देण्याची धमकी देत होता. या घटनेची माहिती मिळताच पोलिस घटनास्थळी दाखल झाले. घराची झडती घेतली असता पोलिसांना एका पिशवीत संशयास्पद वस्तू आढळून आली. त्यावेळी बॉम्बशोधक व नाशक पथकाला (बीडीडीएस) पाचारण करण्यात आले. चेंडूच्या आकाराच्या दोन स्फोटकांची तपासणी केली असता ती लष्कराशी संबंधित असल्याचे निष्पन्न झाले. (प्रतिनिधी)या स्फोटकामुळेकेवळ रंगबाजी !युद्धकाळात जवानांना शत्रूपासून सावध करताना ‘सिग्नल’ म्हणून सर्रास वापरली जाणारी ही स्फोटके बॉम्बसदृश्य असली तरी त्याद्वारे हानी अथवा इजा होत नाही. तर केवळ रंगबाजी होते.
लष्करातील बॉम्बसदृश वस्तू खटावमध्ये !
By admin | Published: December 25, 2016 1:46 AM