शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मयुद्ध’, ‘व्होट जिहाद’वर स्वामी गोविंददेव गिरी स्पष्टच बोलले; म्हणाले, “हिंदू समाजाने...”
2
राज ठाकरेंशी चांगले संबंध होते, अचानक मिठाचा खडा पडून काय बिनसले? CM शिंदेंनी सगळेच सांगितले
3
“महाराष्ट्रद्रोही जिंकणार की महाराष्ट्रप्रेमी जनता हे ठरवणारी निवडणूक आहे”: उद्धव ठाकरे
4
मणिपूरमध्ये सत्ताधारी भाजपला धक्का; NPP ने पाठिंबा काढून घेतला, सरकार कोसळणार?
5
प्रियंका गांधींचे पंतप्रधान मोदींना खुले आव्हान; म्हणाल्या, “एकदा जाहीर करून दाखवा की...”
6
रेवंथ रेड्डींचे अजब आवाहन; म्हणाले, “त्यांच्याकडून भरपूर पैसे घ्या, पण मत काँग्रेसला द्या”
7
माझ्या वडिलांचा फोटो लावणं सोडा, हिंमत असेल तर...; उद्धव ठाकरेंचा पुन्हा घणाघात
8
ठाकरे सेनेच्या मुस्लिम उमेदवाराची मंदिरात पूजा, शिवलिंगाचा अभिषेक अन् आरती केली...
9
नागपूरमध्ये प्रियंका गांधींचा रोड शो; भाजप कार्यकर्त्यांनी दाखवले कमळ, परिसरात प्रचंड तणाव
10
विदर्भात ५४ टक्के जागांवर कुणबी, मराठा उमेदवार; भाजपानं काँग्रेसची केली कोंडी
11
Maharashtra Vidhan Sabha Election 2024 : उद्धव ठाकरे यांच्यासोबत पुन्हा जाणार का?; एकनाथ शिंदेंनी एका वाक्यात सांगितलं
12
सुपर-डुबर HOT!! भारतीय क्रिकेटपटूच्या बहिणीचा बोल्डनेस, घायाळ करणारा लूक Viral (Photos)
13
माहिमच्या सर्व समाजासह मला मुस्लिमांचाही पाठिंबा; महेश सावंतांना विजयाचा विश्वास 
14
दुगलाईच्या जंगलात पोलिस आणि नक्षलवाद्यांमध्ये चकमक, एक जवान जखमी
15
'मी मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाही, पण...', सीएम एकनाथ शिंदेंचं मोठं वक्तव्य
16
पाकिस्तानी लष्कराच्या चेक पोस्टवर दहशतवादी हल्ला, सात सुरक्षा जवान शहीद; १८ जखमी
17
“माझा नाद करायचा नाही, जोरात पाडायचे, संपूर्ण महाराष्ट्रात संदेश गेला पाहिजे”: शरद पवार
18
सतत निष्ठा बदलणारा हा व्यक्ती...; अजित पवारांनी अमोल कोल्हेंचा इतिहासच काढला
19
PM मोदींचे आव्हान राहुल गांधींनी स्वीकारले; बाळासाहेब ठाकरेंबाबत बोलले, पोस्ट करत म्हणाले...
20
हृदयद्रावक! साता जन्माची साथ अवघ्या ७ महिन्यांत सुटली; आक्रित घडलं अन् सारचं संपलं

बोंडअळ्यांच्या शत्रू चे संवर्धनही प्रयोगशाळेत!

By admin | Published: October 21, 2016 9:23 PM

कपाशीवरील गुलाबी बोंडअळीला प्रतिबंध घालणारी परोपजीवी कीड (ट्रायकोग्रामा) वाढविण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भर दिला

राजरत्न सिरसाट

अकोला, दि. २१ : कपाशीवरील गुलाबी बोंडअळीला प्रतिबंध घालणारी परोपजीवी कीड (ट्रायकोग्रामा) वाढविण्यावर डॉ. पंजाबराव देशमुख कृषी विद्यापीठाने भर दिला असून, या किडींची मोठ्या प्रमाणावर प्रयोगशाळेत निर्मिती व संवर्धन केले जात आहे. या किडींचा शेतकऱ्यांनी समूहाने कपाशीवर वापर केल्यास रासायनिक कीटकनाशकांचा वाढलेला अनावश्यक खर्च टाळता येईल,असा दावा कृषी शास्त्रज्ञांनी केला आहे.

कापूस हे नगदी पीक आहे, पण या पिकाचे सर्वाधिक नुकसान बोंडअळी प्रजातीची कीड करीत असते.बोंडअळीला प्रतिबंंधक रासायनिक कीटकनाशकांच्या फवारण्या करू नही ही कीड आटोक्यात येत नसल्याने दीड दशकापूर्वी एका विदेशी कंपनीने बोंडअळीला प्रतिबंधक जनुक टाकून बीटी कापूस तंत्रज्ञान भारतीय बाजारात आणले. या बीटीने बघता-बघता संपूर्ण देश व्यापून अख्ख्या बियाणे बाजारावर कब्जा केला. पण, अलीकडच्या दोन ते तीन वर्षांत बीटी कपाशीची बोंडअळीप्रतिची प्रतिकारक्षमता संपली असून, बीटी कपाशीवरही बोंडअळीने हल्ला केला आहे. पंजाब, हरियाणासारख्या कापूस उत्पादक राज्यातील बीटी कापसावर गुलाबी बोंडअळ््यांनी आक्रमण केले. त्यामुळे यावर्षी तेथील शेतकऱ्यांनी बीटी कापसाची पेरणी कमी केली.या सर्व पृष्ठभूमीवर अकोल्याच्या कृषी विद्यापीठाने गुलाबी बोंडअळीला प्रभावी प्रतिबंधक (ट्रायकोग्रामा) परोपजीवी किडींची मोठयाप्रमाणावर निर्र्मिती व संवर्धनावर भर दिला आहे. याकरिता तांदळातील अळींच्या पंतगांची अंडी गोळा करू न या अंडींच्या नर-माधीचे प्रयोगशाळेत संगोपन केले जात आहे. संगोपन केलेली अंडी एका पिवळ््या जाड्या कागदावर चिटकवून तो पिवळा कागद कापसाच्या फांदीला बांधला जातो. या कागदावरील अंडीतून सात ते आठ दिवसांनतंर किडी बाहेर येतात. ही कीड कापूस असलेल्या बोेंडात शिरू न कापसाचे कोणतेही नुकसान न होऊ देता गुलाबी बोंड अळ्यांना फस्त करते. विशेष म्हणजे हे तंत्रज्ञान एका एकारावर वापरण्यासाठी शेतकऱ्यांना फक्त ४० रुपये खर्च येतो. एका पिवळ््या कागदाच्या पट्टीवर वीस भाग असतात. एका भागावर जवळपास २,५०० अंडी ठेवली जातात. यामुळे शेतकऱ्यांचा खर्च वाचतो व पिक ाचे संरक्षण होते.- ट्रायकोग्रामा ही एक पर्यावरणपूरक व बिनविषारी पद्धत आहे. कपाशीवरील बोेंड अळीचे प्रभावी नियंत्रण करते आणि खर्चही कमी लागतो. सेंद्रिय शेतीमध्येदेखील याचा शेतकऱ्यांनी वापर केल्यास फायदाच होेईल.डॉ.डी.बी. उंदीरवाडे, विभागप्रमुख,डॉ. अनिल कोेल्हे, मुख्य पीक संरक्षण अधिकारी,